Advertisement

मंगळवार, २७ जानेवारी, २०१५

शब्दयोगी अव्यय Śabdayōgī avyaya

"जो शब्द वाक्यातील एखाद्या शब्दाला जोडून येतो व ज्या शब्दाला तो जोडून येतो; त्या शब्दाचा त्याच वाक्यातील दुसऱ्या एखाद्या शब्दाशी संबंध दर्शवतो,

त्या अविकारी शब्दाला शब्दयोगी अव्यय म्हणतात."

जी अव्यये नाम, सर्वनाम किंवा तत्सम शब्द यांना जोडून येतात आणि त्यांचा (वाक्यातील) इतर शब्दांशी संबंध दर्शवितात त्यांना शब्दयोगी अव्यय म्हणतात.

योग म्हणजे जोड, जुळणी, शब्दयोगी म्हणजे शब्दाला जोडून आलेले.

उदा., 'घरावर कैले टाकूया' या वाक्यातील 'वर' हा शब्द.
तो शब्द 'घर' या मूळ शब्दाला जोडून आला आहे व त्यामुळे 'घर' या शब्दाचा 'टाकूया' या शब्दाशी संबंध जोडला गेला आहे.

- नाम सर्वनामांप्रमानेच कधी कधी क्रियापदे व क्रियाविशेषणे यांनाही जोडून शब्दयोगी अव्यये येतात.
उदा.
गाणे (क्रियापद) - गाण्यासाठी
इथे (क्रियाविशेषण) - इथपासून
तिथे (क्रियाविशेषण) - तिथपर्यंत
जाईपर्यंत, आल्यावर, बोलण्यापेक्षा (क्रियापदांना जोडून शब्दयोगी अव्यये)
कालपासून उद्यापर्यंत, कधीही, मुळीच, जरासुद्धा (अव्ययांना जोडून शब्दयोगी अव्यये)