Advertisement

सोमवार, २२ जून, २०१५

स्वरसंधीचे नियम Swarsandhi niyam

नियम १ : दोन सजातीय स्वर एकापुढे एक आले असता त्यांचा संधी होऊन त्या दोहोंबद्दल त्याच जातीतील दीर्घ स्वर होतो.
१) सूर्य + अस्त       अ + अ = आ    सूर्यास्त
२) हिम + आलय     अ + आ = आ    हिमालय
३) विद्या + अर्थी      आ + अ = आ    विद्यार्थी
४) विद्या + आलय    आ + आ = आ    विद्यालय                                                                                   
५) कवी + इच्छा     इ + इ = ई       कवीच्छा
६) गिरी + ईश       इ + ई = ई       गिरीश
७) रावी + इंद्र       ई + इ = ई       रवींद्र
८) मही + ईश       ई+ ई  = ई       महीश
९) गुरू+ उपदेश      उ +उ =  ऊ       गुरुपदेश
१०) भू + उद्धार      ऊ + उ = ऊ       भूद्दार

नियम २ : अ किंवा आ यांच्यापुढे इ किंवा ई आल्यास त्या  दोहोंऐवजी 'ए' येतो.
१) ईश्वर + इच्छा अ + इ = ए  ईश्वरेच्छा
२) गण + ईश   अ + ई = ए गणेश
३) महा + इंद्र   आ + इ = ए महेंद्र
४) रमा + ईश   आ + ई = ए रमेश

नियम ३ : अ किंवा आ यांच्यापुढे उ किवा ऊ आल्यास त्या दोहोंऐवजी 'ओ' येतो.
१) सूर्य + उदय   अ + उ = ओ    सूर्योदय
२) समुद्र + ऊर्मी  अ + ऊ = ओ   समुद्रोमी
३) गंगा + उदक  आ + उ = ओ   गंगोदक
४) गंगा + ऊर्मी  आ + ऊ = ओ   गंगोर्मी

नियम ४ : अ किंवा आ यांच्यापुढे ए किंवा ऐ आल्यास त्या दोहोंऐवजी 'ऐ' होतो.
१) एक + एक     अ + ए  = ऐ   एकैक
२) मत + ऐक्या   अ + ऐ  =  ऐ  मतैक्य
३) सदा + एव    आ + ए  = ऐ   सदैव
४) प्रजा + ऐक्य   आ + ऐ =  ऐ  प्रजैक्य

नियम ५ : अ किंवा आ यांच्यापुढे ओ किंवा औ आल्यास त्या दोहोंऐवजी 'औ' येतो.
१) जल + ओघ      अ + ओ = औ  जलौघ
२) वृक्ष + औदार्य    अ + औ = औ  वृक्षौदर्य
३) गंगा + ओघ     आ + ओ = औ  गंगौघ
४) महा + औदार्य   आ + औ = औ  महौदार्य

नियम ६ : अ किंवा आ यांच्यापुढे ऋ आल्यास त्या दोहोंऐवजी 'अर्' येतो.
१) देव + ऋषी   अ + ऋ = अर्  देवर्षी
२) महा + ऋषी  अ + ऋ = अर्  महर्षी

नियम ७ : इ, उ, ऋ या ह्रस किंवा दीर्घ स्वरांपुढे कोणताही विजातीय स्वर आल्यास 'त' च्या जागी अनुक्रमे य्, व् र् हे येतात आणि त्यांत पुढील स्वर मिळतो.
१) प्रीति + अर्थ    इ + अ  = य् + अ  = य    प्रीत्यर्थ 
२) अति + उत्तम    इ + उ = य् + उ = यु    अत्त्युतम
३) किती + एक    ई + ए = य् + ए = ये    कित्येक
४) सु + अल्प     उ + अ = व् +अ = व    स्वल्प
५) मनु + अंतर    उ + अ = व् + अ = व    मन्वंतर
६) भानू + ईश्वर    ऊ + ई = व् + ई = वी   भान्वीश्वर
७) पितृ + आज्ञा   ऋ + आ = र् + आ = रा    पित्राज्ञा

नियम ८ : ए, ऐ, ओ, औ यांच्यापुढे कोणताही स्वर आल्यास त्यांच्या जागी अनुक्रमे आय्, अव्, आव् हे येतात आणि त्यांत पुढील स्वर मिळतो.
१) ने + अन    ए + अ = अय्  +अ = अय   नयन
२) गै + अन    ऐ + अ = आय् + अ = आय  गायन
३) गो + ईश्वर  ओ + ई = अव् + ई = अवी   गावीश्वर
४) नौ + इक   औ + इ = आव् + इ = आवि  नाविक

शनिवार, २० जून, २०१५

धर्मवीर संभाजीराजे sambhajiraje

धर्मवीर संभाजीराजे ! अत्यंत तेजस्वी आणि महापराक्रमी प्रजापालक होते. औरंगजेबाला २७ वर्षे हिंदुस्तानपासून दुर ठेवणार्या संभाजीराजांनी जी अलौकिक कामे त्यांच्या अल्पाआयुष्यात केली. त्याच्या दूरगामी परिणाम संपूर्ण हिंदुस्तानावर झाला. त्यामुळे त्यांच्याविषयी प्रत्येक हिंदू बांधवाने कृतज्ञ असले पाहिजे. त्यांनी औरंगजेबाच्या आठ लाख सैन्याला न डगमगता तोंड दिले आणि कित्येक मोगल सरदारांना लढाईत पराभूत करून पाळता भुई थोडी केली, त्यामुळे औरंगजेब दीर्घकाळ महाराष्ट्रात राहिला आणि संपूर्ण उत्तर हिंदुस्तान त्याच्या दडपणापासून मुक्त राहिला ही संभाजीराजांची सगळ्यात मोठी कामगिरी म्हणावी लागेल. संभाजीराजांच्या संघर्षामुळे  २७ वर्षे औरंगजेब दक्षिणेत अडकून राहिला आणि त्यामुळे उत्तरेस बुंदेलखंड, पंजाब आणि राजस्थान अशा ठिकाणी हिंदूंच्या नवीन सत्ता उदयास येऊन हिंदू समाजाला सुरक्षितता लाभली. संभाजीराजांनी गोव्यावर आक्रमण करून धर्मवेड्या पोर्तुगीजांना नमवले, त्यांचाशी तह करून त्यांना बांधून टाकले . गोव्यातील पोर्तुगिजांचा धर्मप्रसाराला संभाजीराजांनी पायाबंद घातला, त्यामुळे गोवा प्रदेशातील हिंदूंचे रक्षण झाले. १ फेब्रुवारी  १६८९ या दिवशी सख्खा मेहुणा गणोजी शिर्के याच्या फितुरीमुळे संगमेश्वर ठिकाणी संभाजीराजे काही वतनदारांची गार्हाणी ऐकत असतांना पकडले गेले. संभाजीराजांच्या बलिदानामुळे संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला आणि मराठ्यांचा स्वाभिमान पुन्हा जागा झाला ही तीनेशे वर्षांपूर्वीच्या राष्ट्रजीवनातील अतिशय महत्त्वाची बाब ठरली त्यामुळे इतिहासाला कलाटणी मिळाली. १४ मे १६५७ हा संभाजीराजांचा जन्मदिवस त्यांना नमन करूया.

मंगळवार, २४ मार्च, २०१५

संधी, Sandhī

आपण बोलताना एका पाठोपाठ येणाऱ्या काही शब्दांमधील अक्षरे एकामागोमाग उच्चारताना, एकमेकांत मिसळली जातात.
उदाहरणार्थ - या वर्गात विद्यार्थी किती?
या वाक्यात वर्ग + आत तसेच विद्या + अर्थी असे शब्द एकत्र येऊन वर्गात, विद्यार्थी हे शब्द उच्चारले जातात. वर्ग मधल्या अंत्य 'अ' मध्ये 'आत' मधल्या आद्य (पहिला वर्ण) 'आ' मिसळून एकत्रित वर्णोच्चार होतो.
एका पुढे एक येणारे जवळजवळचे वर्ण एकमेकात मिसळून जाण्याच्या या प्रक्रियेला संधी म्हणतात.  एकापाठोपाठ एक आलेले दोन वर्ण एकत्र होण्याच्या प्रकाराला संधी म्हणतात.
संधीचे तीन प्रकार
१) स्वरसंधी : जेव्हा एकापाठोपाठ येणारे दोन स्वर एकत्र मिळतात; तेव्हा त्या संधीला स्वरसंधी असे म्हणतात. (स्वर + वर) उदा. सुर + ईश = सुरेश.
२) व्यंजनसंधी : एकापाठोपाठ येणाऱ्या दोन वर्णांपैकी पहिला वर्ण हा जेव्हा व्यंजन असतो व दुसरा वर्ण हा स्वर किंवा व्यंजन असतो, तेव्हा त्या संधीला व्यंजनसंधी असे म्हणतात. (व्यंजन + स्वर किंवा व्यंजन). उदा. सत् + आचार = सदाचार; उत् + लंघन = उल्लंघन.
३) विसर्गसंधी : एकापाठोपाठ येणाऱ्या दोन वर्णांपैकी पहिला वर्ण हा जेव्हा विसर्ग असतो व दुसरा वर्ण हा स्वर किंवा व्यंजन असतो, तेव्हा त्या संधीला विसर्गसंधी असे म्हणतात. (विसर्ग + स्वर किंवा व्यंजन) उदा. नि: + आधार = निराधार; दु: + काळ = दुष्काळ.

शुक्रवार, २० फेब्रुवारी, २०१५

जिल्ह पुणे माहिती Jil'ha puṇē māhitī

पुणे

जिल्हा व प्रशासकीय विभागाचे मुख्यालय : पुणे

क्षेत्रफळ : 15,642 km2 (6,039 sq mi)

स्थान : अहमदनगर, आग्नेयेस : सोलापुत, दक्षिणेस : सातारा, पश्चिमेस : रायगड, वायव्येस : ठाणे जिल्हा.

तालुके : १५
पुणे शहर, पुरंदर, आंबेगाव, इंदापूर, बारामती, भोर, हवेली, खेड, जुन्नर, शिरूर, दौंड, वेल्हे, मुळशी, मावळ.

विस्तार : पुण्याच्या उत्तर व पूर्वेस

लोकसंख्या २०११ ची : ९,४२६,९५९

नद्या :
भीमा ही मुख्य नदी, इंद्रायणी, घोड, मुळा, मुठा, नीरा या अन्य नद्या

धरणे : वेळवंडीवरील भाटघर धरण, आंबी नदीवरील पानशेत धरण, मोसी नदीवरील वरसगाव धरण

पिके : ऊस, बाजरी, गहू, जुन्नर येथील कांदा.

औद्योग :
बजाज, टेल्को, टेम्पो, किर्लोस्कर नामांकित कंपन्यांचे कारखाने.
तळेगाव येथे काच उद्योग, खडकी - संरक्षण साहित्य निर्मिती कारखाना, मुंढवा येथे कागद गिरणी

शैक्षणिक :
पुणे विद्यापीठ स्थापना: १९४९ (पूर्वेकडील ऑक्सफर्ड)
टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे (स्थापना: १९९५)
श्री शिवछत्रपती क्रीडा विद्यापीठ, पुणे

पर्यटन स्थळे :
आळंदी येथे इंद्रायणीतिरी, खेड तालुक्यात, संत ज्ञानोबारायांनी संजीवन समाधी येथे घेतली.
देहू : हवेली तालुक्यात जगद्गुरू संत तुकोबारायांची जन्मभूमी.
भिमाशंकर : आंबेगाव तालुक्यात भीमा नदीचे उगमस्थान, बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग, थंड हवेचे ठिकाण.
आर्वी : 'विक्रम' हे दळणवळण केंद्र आहे.
जेजुरी : खंडोबा हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत
बारामती : कऱ्हा नदीकाठी द्राक्षांपासून मद्यनिर्मिती प्रकल्प
वढू : छ. संभाजी राजांची समाधी
सासवड : सोपानदेवांची समाधी
उरुळी-कांचन : भारतीय अॅग्रो इंडस्ट्रीज फौंडेशन ही संस्था
अष्टविनायक पैकी पाच गणपती पुणे जिल्हात आहे.
भिमिशंकर येथे अभयारण्य आहे.
(विद्येचे माहेरघर गणला गेलेला पश्चिम महाराष्ट्रातील पुणे एक जिल्हा)

रविवार, १५ फेब्रुवारी, २०१५

ल.सा.वि. l.sa.vi. Laghutama sāmā'īka vibhājya

लघुतम सामाईक विभाज्य

- ल.सा.वि. म्हणजे लघुतम सामाईक विभाज्य किंवा लहानात लहान सामाईक विभाज्य.

- विभाज्य म्हणजे ज्याला पूर्ण भाग जातो; बाकी उरत नाही असा भाज्य. उदा. ४५० / ९ = ५० (divide)
या उदा. ४५० हा भाज्य, त्याला ९ ने पूर्ण भाग गेला; बाकी उरली नाही; म्हणून ४५० हा ९ चा विभाज्य आहे.

- सामाईक विभाज्य म्हणजे दोन किंवा अधिक संख्यांचा सामाईक असणारा विभाज्य. उदा. ४५ / ५ = ९ आणि
४५ / ९ = ५ म्हणून ४५ हा ५ आणि ९ चा सामाईक विभाज्य आहे.
१२ चे विभाज्य = १२, २४, ३६, ४८, ६०, ७२, ८४, ९६, १०८......
१६ चे विभाज्य = १६, ३२, ४८, ६४, ८०, ९६, ११२, १२८, १४४,.......
वरीलपैकी १२ आणि १६ यांचा सर्वांत लहान विभाज्य ४८ आहे.

- १२ आणि १६ चा ल.सा.वि. अवयव पद्धतीने पुढीलप्रमाणे काढता येईल-
१२ = २ x २ x ३
१६ = २ x २ x २ x २
ल.सा.वि. = सामाईक अवयव x असामाईक अवयव
(२ x २) x (२ x २ x ३) = ४८

बुधवार, ११ फेब्रुवारी, २०१५

विभक्ती (vibhakti)

नाम, सर्वनाम किंवा तत्सम विकारी शब्द यांचे वाक्यातील क्रीयापादशी किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखविले जातात. त्यांना विभक्ती म्हणतात.
वाक्यातील एकमेकांशी असलेले संबंध ज्या विकारांनी दाखवले जातात, त्या विकारांना विभक्ती म्हणतात.
शब्दांना जी अक्षरे जोडली जातात, त्यांना विभक्तीचे प्रत्यय म्हणतात.
जी काही क्रिया घडलेली असते, ती सांगितलेली असते. म्हणून वाक्यातील क्रियापद सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुख्यपद मानले जाते. त्या मानाने इतर पदे

असतात. यावरून विभक्ती व विभक्तीचे अर्थ याबद्दल साधारणपणे असे म्हणतात.

विभक्त्यार्थ दोन प्रकार
१) कारकार्थ - कारक व कारकार्थ
२) उपपदार्थ - कर्ता, करण, कर्म

विभक्तीची आठ नावे
१) प्रथमा (The first)      २) द्वितीया (accusative)   ३) तृतीया (blocks)    ४) चतुर्थी  (chaturthi)   ५) पंचमी (panchami)    ६) षष्ठी (genitive)   ७) सप्तमी  (Sapthami) ८)  संबोधन (Speaking)
विभक्तीतीचे प्रत्यय - नी, ट, चा
विभक्ती  -  (एकवचन)  -  (अनेकवचन)

१) प्रथमा  -  प्रत्यय नाही  -  प्रत्यय नाही      
२) द्वितीया  -  स, ला, ते  -  स, ला, ना, ते   
३) तृतीया  -  ने, ए, शी  -  नी, शी, ही    
४) चतुर्थी  -  स, ला, ते  -  स, ला, ना, ते    
५) पंचमी  -  ऊन, हून  -  ऊन, हून    
६) षष्ठी  -  चा, ची, चे  -  चे, च्या, ची  
७) सप्तमी  -  त, ई, आ  -  त, ई, आ  
८) संबोधन  -  प्रत्यय नाही  -  नो

विभक्तीतील रूपे
विभक्ती  -  (एकवचन)  -  (अनेकवचन)
१) प्रथमा -  फूल  -  फुले
२) द्वितीया  -  फुला, दुलाला  -  फुलां, फुलांना
३) तृतीया  -  फुलाने, फुलाशी  -  फुलांनी, फुलांशी
४) चतुर्थी  -  फुला, फुलाला  -  फुलां, फुलांना
५) पंचमी  -  फुलातून, फुलाहून  -  फुलांतून, फुलांहून
६) षष्ठी  -  फुलाचा, फुलाची, फुलाचे  -  फुलांचा, फुलांची, फुलांचे
७) सप्तमी  -  फुला  -  फुलां
८) संबोधन  -  फुला  -  फुलांनी

मंगळवार, २७ जानेवारी, २०१५

शब्दयोगी अव्यय Śabdayōgī avyaya

"जो शब्द वाक्यातील एखाद्या शब्दाला जोडून येतो व ज्या शब्दाला तो जोडून येतो; त्या शब्दाचा त्याच वाक्यातील दुसऱ्या एखाद्या शब्दाशी संबंध दर्शवतो,

त्या अविकारी शब्दाला शब्दयोगी अव्यय म्हणतात."

जी अव्यये नाम, सर्वनाम किंवा तत्सम शब्द यांना जोडून येतात आणि त्यांचा (वाक्यातील) इतर शब्दांशी संबंध दर्शवितात त्यांना शब्दयोगी अव्यय म्हणतात.

योग म्हणजे जोड, जुळणी, शब्दयोगी म्हणजे शब्दाला जोडून आलेले.

उदा., 'घरावर कैले टाकूया' या वाक्यातील 'वर' हा शब्द.
तो शब्द 'घर' या मूळ शब्दाला जोडून आला आहे व त्यामुळे 'घर' या शब्दाचा 'टाकूया' या शब्दाशी संबंध जोडला गेला आहे.

- नाम सर्वनामांप्रमानेच कधी कधी क्रियापदे व क्रियाविशेषणे यांनाही जोडून शब्दयोगी अव्यये येतात.
उदा.
गाणे (क्रियापद) - गाण्यासाठी
इथे (क्रियाविशेषण) - इथपासून
तिथे (क्रियाविशेषण) - तिथपर्यंत
जाईपर्यंत, आल्यावर, बोलण्यापेक्षा (क्रियापदांना जोडून शब्दयोगी अव्यये)
कालपासून उद्यापर्यंत, कधीही, मुळीच, जरासुद्धा (अव्ययांना जोडून शब्दयोगी अव्यये)