धर्मवीर संभाजीराजे ! अत्यंत तेजस्वी आणि महापराक्रमी प्रजापालक होते. औरंगजेबाला २७ वर्षे हिंदुस्तानपासून दुर ठेवणार्या संभाजीराजांनी जी अलौकिक कामे त्यांच्या अल्पाआयुष्यात केली. त्याच्या दूरगामी परिणाम संपूर्ण हिंदुस्तानावर झाला. त्यामुळे त्यांच्याविषयी प्रत्येक हिंदू बांधवाने कृतज्ञ असले पाहिजे. त्यांनी औरंगजेबाच्या आठ लाख सैन्याला न डगमगता तोंड दिले आणि कित्येक मोगल सरदारांना लढाईत पराभूत करून पाळता भुई थोडी केली, त्यामुळे औरंगजेब दीर्घकाळ महाराष्ट्रात राहिला आणि संपूर्ण उत्तर हिंदुस्तान त्याच्या दडपणापासून मुक्त राहिला ही संभाजीराजांची सगळ्यात मोठी कामगिरी म्हणावी लागेल. संभाजीराजांच्या संघर्षामुळे २७ वर्षे औरंगजेब दक्षिणेत अडकून राहिला आणि त्यामुळे उत्तरेस बुंदेलखंड, पंजाब आणि राजस्थान अशा ठिकाणी हिंदूंच्या नवीन सत्ता उदयास येऊन हिंदू समाजाला सुरक्षितता लाभली. संभाजीराजांनी गोव्यावर आक्रमण करून धर्मवेड्या पोर्तुगीजांना नमवले, त्यांचाशी तह करून त्यांना बांधून टाकले . गोव्यातील पोर्तुगिजांचा धर्मप्रसाराला संभाजीराजांनी पायाबंद घातला, त्यामुळे गोवा प्रदेशातील हिंदूंचे रक्षण झाले. १ फेब्रुवारी १६८९ या दिवशी सख्खा मेहुणा गणोजी शिर्के याच्या फितुरीमुळे संगमेश्वर ठिकाणी संभाजीराजे काही वतनदारांची गार्हाणी ऐकत असतांना पकडले गेले. संभाजीराजांच्या बलिदानामुळे संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला आणि मराठ्यांचा स्वाभिमान पुन्हा जागा झाला ही तीनेशे वर्षांपूर्वीच्या राष्ट्रजीवनातील अतिशय महत्त्वाची बाब ठरली त्यामुळे इतिहासाला कलाटणी मिळाली. १४ मे १६५७ हा संभाजीराजांचा जन्मदिवस त्यांना नमन करूया.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा