Advertisement

सोमवार, २२ जून, २०१५

स्वरसंधीचे नियम Swarsandhi niyam

नियम १ : दोन सजातीय स्वर एकापुढे एक आले असता त्यांचा संधी होऊन त्या दोहोंबद्दल त्याच जातीतील दीर्घ स्वर होतो.
१) सूर्य + अस्त       अ + अ = आ    सूर्यास्त
२) हिम + आलय     अ + आ = आ    हिमालय
३) विद्या + अर्थी      आ + अ = आ    विद्यार्थी
४) विद्या + आलय    आ + आ = आ    विद्यालय                                                                                   
५) कवी + इच्छा     इ + इ = ई       कवीच्छा
६) गिरी + ईश       इ + ई = ई       गिरीश
७) रावी + इंद्र       ई + इ = ई       रवींद्र
८) मही + ईश       ई+ ई  = ई       महीश
९) गुरू+ उपदेश      उ +उ =  ऊ       गुरुपदेश
१०) भू + उद्धार      ऊ + उ = ऊ       भूद्दार

नियम २ : अ किंवा आ यांच्यापुढे इ किंवा ई आल्यास त्या  दोहोंऐवजी 'ए' येतो.
१) ईश्वर + इच्छा अ + इ = ए  ईश्वरेच्छा
२) गण + ईश   अ + ई = ए गणेश
३) महा + इंद्र   आ + इ = ए महेंद्र
४) रमा + ईश   आ + ई = ए रमेश

नियम ३ : अ किंवा आ यांच्यापुढे उ किवा ऊ आल्यास त्या दोहोंऐवजी 'ओ' येतो.
१) सूर्य + उदय   अ + उ = ओ    सूर्योदय
२) समुद्र + ऊर्मी  अ + ऊ = ओ   समुद्रोमी
३) गंगा + उदक  आ + उ = ओ   गंगोदक
४) गंगा + ऊर्मी  आ + ऊ = ओ   गंगोर्मी

नियम ४ : अ किंवा आ यांच्यापुढे ए किंवा ऐ आल्यास त्या दोहोंऐवजी 'ऐ' होतो.
१) एक + एक     अ + ए  = ऐ   एकैक
२) मत + ऐक्या   अ + ऐ  =  ऐ  मतैक्य
३) सदा + एव    आ + ए  = ऐ   सदैव
४) प्रजा + ऐक्य   आ + ऐ =  ऐ  प्रजैक्य

नियम ५ : अ किंवा आ यांच्यापुढे ओ किंवा औ आल्यास त्या दोहोंऐवजी 'औ' येतो.
१) जल + ओघ      अ + ओ = औ  जलौघ
२) वृक्ष + औदार्य    अ + औ = औ  वृक्षौदर्य
३) गंगा + ओघ     आ + ओ = औ  गंगौघ
४) महा + औदार्य   आ + औ = औ  महौदार्य

नियम ६ : अ किंवा आ यांच्यापुढे ऋ आल्यास त्या दोहोंऐवजी 'अर्' येतो.
१) देव + ऋषी   अ + ऋ = अर्  देवर्षी
२) महा + ऋषी  अ + ऋ = अर्  महर्षी

नियम ७ : इ, उ, ऋ या ह्रस किंवा दीर्घ स्वरांपुढे कोणताही विजातीय स्वर आल्यास 'त' च्या जागी अनुक्रमे य्, व् र् हे येतात आणि त्यांत पुढील स्वर मिळतो.
१) प्रीति + अर्थ    इ + अ  = य् + अ  = य    प्रीत्यर्थ 
२) अति + उत्तम    इ + उ = य् + उ = यु    अत्त्युतम
३) किती + एक    ई + ए = य् + ए = ये    कित्येक
४) सु + अल्प     उ + अ = व् +अ = व    स्वल्प
५) मनु + अंतर    उ + अ = व् + अ = व    मन्वंतर
६) भानू + ईश्वर    ऊ + ई = व् + ई = वी   भान्वीश्वर
७) पितृ + आज्ञा   ऋ + आ = र् + आ = रा    पित्राज्ञा

नियम ८ : ए, ऐ, ओ, औ यांच्यापुढे कोणताही स्वर आल्यास त्यांच्या जागी अनुक्रमे आय्, अव्, आव् हे येतात आणि त्यांत पुढील स्वर मिळतो.
१) ने + अन    ए + अ = अय्  +अ = अय   नयन
२) गै + अन    ऐ + अ = आय् + अ = आय  गायन
३) गो + ईश्वर  ओ + ई = अव् + ई = अवी   गावीश्वर
४) नौ + इक   औ + इ = आव् + इ = आवि  नाविक

शनिवार, २० जून, २०१५

धर्मवीर संभाजीराजे sambhajiraje

धर्मवीर संभाजीराजे ! अत्यंत तेजस्वी आणि महापराक्रमी प्रजापालक होते. औरंगजेबाला २७ वर्षे हिंदुस्तानपासून दुर ठेवणार्या संभाजीराजांनी जी अलौकिक कामे त्यांच्या अल्पाआयुष्यात केली. त्याच्या दूरगामी परिणाम संपूर्ण हिंदुस्तानावर झाला. त्यामुळे त्यांच्याविषयी प्रत्येक हिंदू बांधवाने कृतज्ञ असले पाहिजे. त्यांनी औरंगजेबाच्या आठ लाख सैन्याला न डगमगता तोंड दिले आणि कित्येक मोगल सरदारांना लढाईत पराभूत करून पाळता भुई थोडी केली, त्यामुळे औरंगजेब दीर्घकाळ महाराष्ट्रात राहिला आणि संपूर्ण उत्तर हिंदुस्तान त्याच्या दडपणापासून मुक्त राहिला ही संभाजीराजांची सगळ्यात मोठी कामगिरी म्हणावी लागेल. संभाजीराजांच्या संघर्षामुळे  २७ वर्षे औरंगजेब दक्षिणेत अडकून राहिला आणि त्यामुळे उत्तरेस बुंदेलखंड, पंजाब आणि राजस्थान अशा ठिकाणी हिंदूंच्या नवीन सत्ता उदयास येऊन हिंदू समाजाला सुरक्षितता लाभली. संभाजीराजांनी गोव्यावर आक्रमण करून धर्मवेड्या पोर्तुगीजांना नमवले, त्यांचाशी तह करून त्यांना बांधून टाकले . गोव्यातील पोर्तुगिजांचा धर्मप्रसाराला संभाजीराजांनी पायाबंद घातला, त्यामुळे गोवा प्रदेशातील हिंदूंचे रक्षण झाले. १ फेब्रुवारी  १६८९ या दिवशी सख्खा मेहुणा गणोजी शिर्के याच्या फितुरीमुळे संगमेश्वर ठिकाणी संभाजीराजे काही वतनदारांची गार्हाणी ऐकत असतांना पकडले गेले. संभाजीराजांच्या बलिदानामुळे संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला आणि मराठ्यांचा स्वाभिमान पुन्हा जागा झाला ही तीनेशे वर्षांपूर्वीच्या राष्ट्रजीवनातील अतिशय महत्त्वाची बाब ठरली त्यामुळे इतिहासाला कलाटणी मिळाली. १४ मे १६५७ हा संभाजीराजांचा जन्मदिवस त्यांना नमन करूया.