आपण आपले विचार बोलून किंवा लिहून दाखवितो. आपल्या या बोलण्याला म्हणतात 'भाषा', व तेच लिहून दाखविण्याला म्हणतात 'लेखन'. आपण बोलताना शब्दांचे उच्चार करतो. त्यांतील काही अक्षरे -हस्व असतात, काही दीर्घ असतात, तर काहींचा उच्चार नाकातून होतो. शब्दांतील या -हस्व - दीर्घ व सानुस्वार अक्षरांच्या उच्चाराप्रमाणे बोलणे म्हणजे शुद्ध बोलणे; व बोलण्यातील शुद्ध उच्चाराप्रमाणे ते अक्षरांत लिहून दाखविणे याला स्थूलमानाने 'शुद्धलेखन' म्हणायला हरकत नाही. आपण जे लिहितो ते शुद्ध म्हणजे निर्दोष असावे असे सर्वांना वाटते. हे लेखन शुद्ध व बिनचूक असावे याबद्दल काही नियम घालून देण्यात आलेले असतात. यांनाच 'शुद्धलेखनविषयक नियम' असे आपण म्हणतो. शुद्धलेखनाबाबतचे आजचे नियम पूर्वीपेक्षा कितीतरी सोपे झालेले आहेत. ते नीट समजावून घेतले की आपले लेखन निश्चित सुधारते.
आपले विचार जसे इतरांना समजले पाहिजेत, तसे इतरांचे विचार आपल्याला समजायला हवेत. यासाठी आपली भाषा एका विशिष्ट ठरलेल्या पद्धतीनेच बोलली किंवा लिहिली गेली तरच ती 'शुद्ध' समजली जाते. त्यात काही चूक झाली तर ती अशुद्ध ठरते. जसे 'तो पुस्तक वाचतो', 'त्याने पुस्तक वाचले', 'त्याने पुस्तके वाचली' अशा ठरावीक पद्धतीनेच आपण बोलायला हवे. याऐवजी 'तो पुस्तक वाचला', 'त्याने पुस्तक वाचली', 'त्याने पुस्तके वाचतो' अशा पद्धतीने जर आपण बोललो तर ते चुकीचे ठरते. आपण लिहितो त्या शब्दाचे किंवा वाक्याचे शुद्ध स्वरूप कोणते व अशुध्द स्वरूप कोणते यांबाबत काही नियम ठरविण्यात आले आहेत. हे नियम हाच व्याकरणाचा विषय, व्याकरणातील नियमांना अनुसरून केलेले निर्दोष लेखन म्हणजेच शुद्धलेखन. 'शुध्दलेखन' हा वेगळा असा विषय नाहीच. व्याकरणाचाच एक भाग आहे.
शुद्धलेखनात शब्दांतील -हस्व - दीर्घ अक्षरे व अनुस्वार यांचाच आपण प्रामुख्याने विचार करतो; पण शुद्धलेखन याचा एवद्याचाच विचार करतो; पण शुद्धलेखन याचा एवढाच मर्यादित अर्थ नाही. शब्दांतील अक्षरांचे लेखन एवद्याचाच विचार यांच्याही शुद्धलेखनात कारवायचा नसून वाक्यात येणाऱ्या शब्दांचा क्रम व त्यांची अचूक योजना, जोडाअक्षरातील वर्णांची अचूक रचना, विरामचिन्हाचा योग्य वापर यांच्याही शुद्धलेखनात समावेश होतो. तसेच जोडशब्द तयार करताना शेजारचे वर्ण एकमेकांत मिसळतात; अनेक शब्दांचा एक शब्द करताना त्यातले काही शब्द कसे गळतात; व नवीनच शब्द कसे तयार केले जातात ( म्हणजेच संधी, समास व शब्दसिद्धी) यांच्याही विचार शुद्धलेखनात अवश्य करावा लागतो.
आधी भाषा, मग व्यकरण : 'शुद्धलेखन' हा शब्दच थोडा फसवा आहे. आपले लेखन कशा प्रकारे करावे याबद्दल प्रारंभीच्या व्याकरणकारणी काही नियम ठरविले. त्याप्रमाणे जे लिहिले जाई ते त्या वेळी शुद्ध समजले जात असे. पूर्वी मराठीत अनुस्वार बऱ्याच ठिकाणी दिले जात. उदा. 'नाही' वर अनुस्वार द्यावा लागे. 'काही' मधल्या दोन्ही अक्षरांवर अनुस्वार देत. 'मी कामे केली' हे वाक्य 'मी कामें केली' असे सानुस्वार लिहावे लागे. याचे कारण त्या वेळच्या लोकांच्या बोलण्यात नासोच्चार खूप होते. त्यास अनुसरून, त्यात व्याकारणीक अनुस्वरांची भर घालून, तसेच अर्थभेद, व्युत्पत्तीने व परंपरा यांचाही विचार करून अनुस्वार कोठे द्यावेत व -हस्व - दीर्घ केव्हा लिहावे हे ठरविण्यात आले होते. आता आपण तसा उच्चार कलारत नाही. आपल्या उच्चारात आता खूप बदल झाला आहे. म्हणून हे अनुस्वार आजच्या लेखनातून नाहीसे झाले आहेत. पूर्वीच्या लेखनावर संस्कृतचा पगडा विशेष होता. त्यामुळे शब्दामध्ये येणारे इ-कार व उ-कार संस्कुतपामने -हस्व लिहिले जात. आता आपण मराठीचे लेखन मराठीच्या उच्चारानुसार लिहू लागलो आहे. प्रारंभी केलेल्या नियमांत आतापर्यंत वेळोवेळी बदल होत राहणार. भाषा बदलत चालली म्हणजे तिच्या लेखनपध्दतीतही बदल होणे साहजिक आहे. आधी भाषा बनते; मग तिचे व्याकरण ठरते. भाषेत बदल होत गेला की व्यकरणकारकाला शरणागती पत्करावी लागते व पूर्वीच्या नियमांना मुरड घालावीच लागते. परिणामतः लेखनविषयक ठरलेल्या नियमांतही बदल करावाच लागतो. लिहिण्याची शास्त्रशुद्ध पद्धत म्हणजे आपण बोलताना वर्णाचा जसा उच्चार करतो तसे लिहिणे. पण बोलण्यातील उच्चाराप्रमाणे लेखन करावयाचे तर आपली वर्णमाला अपुरी पडते. मराठीतील सगळे उच्चार लिहून दाखविण्याची सोय आपल्या वर्णमालेत नाही. तसेच, प्रत्येकजण आपल्या स्वतःच्या उच्चारपद्धतीप्रमाणे लिहू लागला तर मोठा कठीण प्रसंग निर्माण होईल. एकमेकांचा विचार एकमेकांना समजायला हवा असेल तर एक विशिष्ट लेखनपध्दतीचा अनुसरणे भाग आहे. म्हणजेच लेखनाबाबत काही नियम ठरवून ते सर्वांनी आचरणात आणणे योग्य ठरते. अशा नियमांचा आपण 'शुद्धलेखनाचे नियम' म्हणत आलो. पूर्वी अनुस्वार तहेने हे 'शुद्ध' समजले जाई. आज त्यांतले बरेच अनूस्वर कमी झाले आहेत. पूर्वीचे जे 'शुद्ध' होते ते 'अशुद्ध' झाले असा त्याचा अर्थ नव्हे. पूर्वी बोलण्याची तशी पद्धत होती; त्या वेळी तसे लिहिणे शुध्द म्हणजे शिष्टमान्य व व्याकारनासंमत मानले जात असे. म्हणजे त्या वेळच्या सुविद्य व सुसंस्कृत व्यक्तींना मान्य असलेले व व्याकरणाच्या नियमांस वनुसरून केलेले असेच ते लेखन असे. आज आपली लेखनपद्धती बदलली; त्यामुळे आजच्या लेखनविषयक नियमांत बदल करावा लागला म्हणून या नियमांना 'शुद्धलेखनाचे नियम' असे न म्हणता 'लेखनविषयक नियम' म्हणणे अधिक समर्पक होईल. काहींनी या शुद्धलेखन-विचारला 'लेखनशुद्धी', 'लेखननियाम', 'लेखनपद्धती' अशी विविध नावे सुचविली आहेत. पण शास्त्रापेक्षा रूढी श्रेष्ठ या न्यायाने लेखनातील शुध्दस्वरूपविषयक चर्चेला आपण आजवर 'शुद्धलेखन' असेच संबोधित आलो आहोत. सोय म्हणून आपण तोच शब्द वापरू. पण त्याचा खरा अर्थ 'लेखनविषयक आजचे नियम' असा आहे, हे विसरता कामा नये. आजचे हे नियम पुढे असेच राहतील असे नाही. कालांतराने त्यात बदल होणे शक्य आहे. त्या त्या वेळच्या लेखनविषयक, शिष्टमान्य व व्याकरणसंमत नियमांना अनुसरून लेखन करणे याचे नाव 'शुद्धलेखन.'

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा