मेवाड नरेश महाराणा प्रताप याचे नाव भारतीय इतिहासात देशभक्ती, साहस, संघर्ष, ठाम संकल्प आणि मातृभूमीसाठी अमर बलिदान याला पर्याय आहे. त्यांच्या वंशात अनेक थोर योद्धे झाले. जसे राणा सांगा, बप्पा रावल, राणा हमिरा. महाराणा ही पदवी मात्र फक्त प्रताप यांनाच मिळाली. ९ मे १५४९ रोजी त्यांची सुंदर राणी जयंवत बाई हिने कुभंलगढ किल्ल्यात एका पुत्राला जन्म दिला. राजा उदय सिंग याने आपल्या पुत्राचे नाव 'राणा प्रताप' ठेवले. महाराणा प्रताप एक वीर बालक होते. ते लहानपणापासूनच स्वातंत्र्य, शौर्य आणि स्वाभिमान याला महत्त्व देत होते. लहानपणी महाराणा प्रतापला खेळ आणि घोडेस्वारी याची खूप आवड होती. त्यांनी विविध शस्त्रास्त्रे चालविण्याचे प्रशिक्षण लहानपणीच घेतले होते. जायंवंती बाई राजा उदयसिंगाची सर्वात पहिली पत्नी होती. सर्वात लहान असलेली राणी धीरबाई महाराजांची सर्वात लाडकी राणी होती.
महाराणा प्रताप याचे शौर्य आणि कौशल्य याने राजाचे मन जिंकले होते. हे पाहून राणी धीरबाईला चांगले वाटत नसे. आपला मुलगा जगमाल याला राज्याचा वारस म्हणून नेमावे, अशी तिची इच्छा होती. ती राजाला म्हणाली, "महाराज, माझा मुलगा जगमाल याचा राज्याचा वारस म्हणून नेमावे, अशी माझी इच्छा आहे. १५६७ साली मेवाडची राजधानी चितौडवर आक्रमण करण्याची सम्राट अकबराने योजना आखली. मोगल सेना संख्येने खूप मोठी आणि भंयकर होती. अर्थात राजपूतही काही कमी नव्हते. विशाल मोगल सैन्याशी ते शौर्याने लढले. शेवटी चितौडला वेढा घालण्यात मोगल सैन्याला यश आले.
राजा उदय सिंग खूप स्वाभिमानी होता. त्याला आपला देश आणि जनता खूप प्रिय होती. त्याने अकबरासमोर शरणागती पत्करायला नकार दिला. आपल्या कुटुंबासह गोगुंडाला गेल्यावरही राजा उदयसिंगाच्या मनाला शांतता मिळाली नाही. सम्राट अकबराने आपल्या मातृभूमिवर केलेल्या अत्याचाराचा त्यांना बदला घ्यायचा होता. अनेक वर्षे राजा आपली राजधानी आणि जनता यांच्यासाठी युद्ध करीत राहिला. १५७२ मध्ये राजा उदय सिंग यांचे गोगुंदा येथे निधन झाले. एक चांगल्या राजासाठी आवश्यक असणारे सर्व गुण प्रतापमध्ये असल्याचे जनतेला माहीत होते. राजकुमार जगमाल याच्यात ही सर्व वैशिष्ट्ये नव्हती. महाराणा प्रताप यांना आपली मातृभूमी चितौड विषयी खूप प्रेम होते. मोगलच्या ताब्यातून त्याला तिची सुटका करायची होती. जन्मभर मोगलांशी संगर्ष करीत राहण्याची महाराणा प्रतापने शपथ घेतली. त्यांनी आपली राजधानी कुंभलगड येथे हलविली. त्यांनी मेवाडमधील जनतेच्या मनात मेवाडविषयी प्रेम निर्माण केले.
लोक कोणत्याही प्रकारे महाराणा प्रतापला मदत करण्यासाठी तयार होते. सर्व प्रकारच्या सुख सुविधांचा त्याग करून अनेक लोक बिलदानासाठी सज्ज झाले. १५७२ मध्ये अकबराने महाराणा प्रतापला मैत्रिचा संदेश पाठविला. त्याने आपले काही कुटनीतीज्ञ महाराणा प्रतापला हे समजावून सांगण्यासाठी पाठविले, की महाराणा प्रतापाने या करारावर स्वाक्षरी करावी. पण महाराणा आपल्या निर्णयापासून ढळले नाही.
सम्राट अकबर कोणत्याही प्रकारे महाराणा प्रतापशी तह करू शकला नाही तेव्हा त्यानेही युद्ध करण्याचा पर्याय निवडला. १५७६ च्या अखेरीस अकबराने मेवाडविरूद्ध युद्ध सुरू केले. हे युद्ध इतके सोपे असणार नाही, हे महाराणाला माहीत होते. त्यानेही एक योजना आखली. त्याने सर्व दरबारी आणि सैनिकांना सैनिकांना अरवली पर्वत रांगात जाण्याचा आदेश दिला. हल्दीघाटावर युद्ध करण्याची महाराणा प्रतापची इच्छा नव्हती; पण त्यांचे दरबारी म्हणाले, "महाराणा, अकबराच्या सैन्याला मैदानात युध्द करणे माहीत आहे. या घाटीत ते आपले कौशल्य दाखवू शकणार नाहीत. आपण त्यांना इथेच पराभूत करू शकतो." प्रतापला ही योजना आवडली. खूप दीर्घकाळ वाट पाहिल्यानंतर दोन्ही सैन्य २१ जून १५७६ रोजी हल्दिघाटीच्या मैदानात समोर समोर आले. हल्दिघाटातील युद्धाच्या वेळी महाराणा प्रताप चेतक नावाच्या उंच आणि शक्तिमान घोड्यावर स्वार झाले होते. या युद्धात चेतक गंभीररित्या जखमी झाला होता. तरीही त्याने हिमत सोडली नव्हती. तो दोन मैल आपल्या मालकाला घेऊन सुखरूप गेला. लवकरच ते बलिया नावाच्या गावात पोहचेले.
शूर असलेल्या चेतकने एका उडीत नाला पार करण्याचा प्रयत्न केला. पायाला झालेली जखम गंभीर होती. नाली पार केल्या बरोबर त्याचे प्राण गेले. त्याचा मृत्यू झाल्याचे पाहून महाराणा खूप दुःखी झाले. कोणत्याही किमतीवर अकबरापासून आपले राज्य परत मिळविणे आणि आपल्या प्रजेला मुक्ती मिळवून देणे यासाठी प्रताप यांनी ठाम निश्चय केला होता. मजहेडा येथे गेल्यावर महाराणाची भिल्लांसी भेट झाली. महाराणाने वेळ वाया घालविला नाही. त्यांनी भिल्ल सैन्याच्या मदतीने अतिशय वेगाने गोगुंदावर हल्ला केला. त्यांनी २३ जून १९७६ ला भिल्ल सैन्याच्या मदतीने गोगुंदावर ताबा मिळविला. महाराणाने आपल्या शौर्याच्या बळावर गोगुंदा आणि उदयपूर पुन्हा आपल्या ताब्यात घेतले. लवकरच त्यांनी आपली राजधानी आपले जन्म ठिकाण असलेल्या कंभलगडच्या डोंगरात घेऊन गेले.
महारानाचे सर्व लक्ष आपल्या ध्येयावर केंद्रित झाले होते. आपल्या जवळ आर्थिक पाठबळ नाही तरीही त्यांनी धीर सोडली नाही. महाराणासारख्या खऱ्या देशभक्ताजवळ आपल्या शत्रूशी लढण्यासाठी पुरेसे मानसिक बळ आणि धाडस होते. धनाचा अभाव ही मोठी समस्या होती. किती तरी महिने त्याचे कुटुंब जंगलात झाडाची पाने आणि बोरे खाऊन उदर निर्वाह करीत होते. महाराणा प्रताप जमिनीवर झोपत असे आणि पातेल्यात जेवण जेवत असे. त्या थोर राजाने आपल्या प्रजेच्या सुखासाठी आपल्या सुखाचा त्याग केला होता. हा त्यांचा जीवनातील भयानक संकटाचा काळ होता. भामाशाह हे प्रताप यांच्या मंत्र्यांपैकी एक होते. भामाशाहणे प्रताप याला पंचवीस हजार अशर्फिया आणि दोन लाख पन्नास हार रुपये देऊन मदत केली. त्याने भामाशाहकडून धन घेतले. एक विशाल सेना निर्माण केली. त्याने मोगलाविरुध्द एक अतिशय शक्तिशाली सेना तयार केली. मग त्याने दीवर, हमीरसरा, जावर, बागड आणि चावंदवर ताबा मिळविला. १५५८ पर्यंत महाराणाने जवळपास सर्व मेवाडवर नियंत्रण मिळविण्यात यश मिळविले. मेवाडवाशी अतिशय आनंदी होते. आता त्यांना काही भीती नव्हती. सत्ता महाराणाच्या हातात होती. आता आपण मोगलांपासून सुरक्षित असल्याची त्यांच्यात भावना निर्माण झाली होती. वृद्धावस्थेतही महाराणाला शौर्य आणि देशभक्तीची भावना प्रभावित करू शकली नाही. ते सक्रियपणे आपले राज्य कारभार करीत होते. प्रजेचे कल्याण सदैव लक्षात ठेवले होते. १९ जानेवारी १५९७ ला महाराणा प्रताप यांचे निधन झाले. 'मुलाला म्हणत, तू नेहमी मोगलांपासून मेवाडचे रक्षण करशील असे मला वचन दे'.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा