भारताचे महान रसायनशास्त्रज्ञ आणि वैज्ञानिक आचार्य डॉ. प्रफुल्लचंद्र रे यांचा जन्म २ ऑगस्ट, १८६१ रोजी तत्कालीन पूर्व बंगालमधील (सध्याच्या बांग्लादेशमधील) रादौली काठीपाढा (kathipadha) या गावात एका समृध्द व सुसंस्कृत कुटुंबात झाला. त्यांचे वडील हरिश बाबू हे बंगालमधील पाश्चात्त्य शिक्षणाच्या प्रवर्तकांपैकी एक होते. त्यांनी मॉडेल इंग्रजी शाळेची (Modal english school) स्थापना केली. त्या वेळेचे समाजसुधारक जतींद्र मोहन ठाकूर, ईश्वरचंद्र विद्यासागर
विज्ञानाचा अभ्यास केल्यानंतर इ.स. १८८२ मध्ये रे यांनी इंग्लंडला जाऊन, एडिनबरो विद्यापीठात प्रवेश घेतला. तेथे प्रसिध्द रसायनशास्त्रज्ञ अलेक्झांदर ब्राडन यांच्या संपर्कात ते आले. त्यामुळे रसायनशास्त्रातील त्यांना असणारी आवड अधिकच वाढली. तेथे ते डॉक्टर गिब्सन, डॉक्टर डोबीन आणि अन्य प्रसिद्ध विद्यानांच्या संपर्कात आले. त्यांनी जर्मन भाषा आणि जर्मन वैज्ञानिकांच्या ग्रंथांचा अभ्यास केला. भारतातील तत्कालीन प्रसिध्द वैज्ञानिक जगदीशचंद्र बोस यांचीही त्यांनी भेट घेतली. ते दोघे एकमेकांचे चांगले मित्र झाले. इ.स. १८८५ मध्ये एडिनबरो विद्यापीठातून बी.एस्सी. पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी मूळ धातूंच्या विश्लेषणासाठी संशोधन कार्य सुरू केले. इ.स. १८८७ मध्ये डी. एस्सी. ही पदवी प्राप्त केली. एडिनबरो विद्यापीठात त्यांनी काही पुरस्कार आणि काही शिष्यवृत्याही मिळवल्या. इ.स. १८८८ मध्ये विद्यापीठाच्या 'केमिकल्स सोसायटी' चे उपाध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. या देदीप्यमान यशप्राप्तीनंतर इ.स. १८८८ मध्ये कलकत्ता येथे ते परत आले. त्यांनी रु. २५० प्रतिमाह पगारावर सहाय्यक प्राध्यापक म्हणून तेथील प्रेसिडेन्सी महाविद्यालयात नोकरीस प्रारंभ केला.
महाविद्यालयातील अध्यापन कामाव्यतिरिक्त निरनिराळ्या नायट्रेटस्वर (nayatretas on) त्यांनी संशोधन सुरू केले. त्यांचे राहणीमान अतिशय साधे होते. पाश्चात्त्य पेहरावाचा त्याग करून त्यांनी भारतीय वेशभूषा (सदरा व लेंगा) स्वीकारली होती. जी काही बचत त्यांना शक्य होती, ती ते विज्ञानविषयक कामावर आणि गरजू लोकांच्या मदतीसाठी खर्च करत. आपल्या घरातच त्यांनी एक लहानशी प्रयोगशाळा बनवली होती. इ.स. १८९५ मध्ये त्यांनी संशोधन केलेल्या 'मर्क्युरिक नायट्रेट' या अत्यंत महत्त्वाच्या पहिल्या संशोशानाची घोषणा करण्यात आली. त्यांच्या या संशोधनाने रसायनशास्त्रात संशोधन करणाऱ्या जगातील सर्व विज्ञानिकांचे लक्ष वेधून घेतले. भारताच्या गरिबीमुळे नेहमी चिंतित असणाऱ्या प्रफुल्लचंद्रांचा असा ठाम विश्वास होता की, रासायनिक आणि औषध उद्योगांची स्थापना केल्याने केवळ चांगले रोजगार निर्माण होतील असे नाही; तर या क्षेत्रात आपला देश स्वयंपूर्णही बनेल. याशिवाय अशा प्रयत्रामुळे औषधांच्या अभावी प्राणघातक ठरणाऱ्या रोगांपासून अनेक रोग्यांचे जीवन देखील वाचू शकेल.
बेरोजगार पदवीधर विज्ञान स्नातकांसाठी लहान-मोठे उद्योग स्थापन करण्याची त्यांची इच्छा होती. इ.स. १९०१ मध्ये चिनी मातीची भांडी बनविणाऱ्या 'कलकत्ता पॉटरी वर्स्क' ची स्थापना करण्यात त्यांनी मदत केली. याशिवाय त्यांनी 'बंगाल केमिकल्स अँड फार्मास्युटिकल वर्क्स लि.' ची स्थापना केली.
यासाठी त्यांनी एका ट्रस्टची स्थापनाही केली. देशासाठी आणि विशेषकरून बंगालसाठी ही संस्था एक वरदान ठरली. सुरुवातीला प्रेसिडेन्सी महाविद्यालयातील रसायनशास्त्र पदवीधरांना व त्यांच्यासारख्या इतर विद्यार्थांना रोजगार प्राप्त करण्यासाठी आणि स्वयंपूर्ण बनण्यासाठी मदत केली. त्यांचा दुसरा शोध अमोनिअम नायट्रेट हा होता. नायट्राइटमधील यशस्वी संशोधनासाठी प्राध्यापक आर्मस्ट्राँग यांनी 'मास्टर ऑफ नायट्राइट' ही पदवी त्यांना दिली. नायट्राइटमधील त्यांच्या संशोधनाने जगाचे लक्ष वेधले. या प्रभावी यशाने प्रेरित होऊन इ.स. १९०४ मध्ये बंगाल सरकारने त्यांना युरोपियन देशांमधील विविध प्रयोगशाळांना भेट देण्यासाठी पाठवले. या शैक्षणिक दैऱ्याच्या काळात त्यांनी आपल्या शोधांच्या संदर्भात व्याख्यानेही दिली. याशिवाय इ.स. १९०२ मध्ये प्रकाशित झालेले त्यांचे पुस्तक 'इंडियन केमिकल हिस्टरी' जगभरात चर्चेचा विषय ठरले. डरहॅम विद्यापीठच्या कुलपतींनी देखील या पुस्तकाची स्तुती केली. डॉ. रे यांनी १३ व १४ व्या शतकांत भारतीय रसायनशास्त्रज्ञांनी केलेल्या कार्याबद्दल विस्ताराने लिखाण केले आहे. या पुस्तकात त्यांनी भारतीय संस्कृतीचे यथार्थ आणि वास्तव चित्रण सादर केले.
इ.स. १९११ साली सरकारने त्यांना 'नाइट हुड' ही पदवी प्रदान केली. इ.स. १९१२ मध्ये विद्यापीठांच्या प्रथम संमेलनात सहभागी होण्यासाठी कलकत्ता विद्यापीठाचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी दुसऱ्यांदा युरोपचा दौरा केला. त्याच वर्षी डरहॅम विद्यापीठाने त्यांना डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी देऊन सन्मानित केले. इ.स. १९१८ मध्ये व्याख्यान देण्यासाठी मद्रास विद्यापीठाचे (आताचे चेन्नई) निमंत्रण त्यांनी स्वीकारले. विद्यापीठांकडून जे मानधन मिळाले, ते त्यांनी शिष्यवृत्तीच्या रूपात विद्यार्थ्यांना देऊन टाकले. इ.स. १९१७ मध्ये कोलकाता येथे झालेल्या भारतीय सामाजिक संमेलनाच्या अध्यक्षपदी (The chairman of the Indian social gathering) त्यांची नेमणूक झाली. इ.स. १९२० साली झालेल्या भारतीय विज्ञान कॉंग्रेसचे ते सभापती झाले. त्याच वर्षी त्यांना गांधीजींना भेटण्याची संधी मिळाली. गांधीवादी आदर्श आणि खादीप्रधान जीवनशैली यांनी प्रभावित होऊन अहिंसा आंदोलनाचे ते कट्टर समर्थक बनले. खुलना जिल्ह्यात जेव्हा कडकडीत दुष्काळ पडला, तेव्हा सर्व कामे सोडून मदतकार्यात सहभागी होण्यासाठी रे तेथे पोहोचले. त्यांनी रोजगाराचे एक साधन म्हणून गरीब लोकांत चरख्याचा उपयोग लोकप्रिय बनवला. चरख्याचे अर्थशास्त्र नवीन पद्धतीने त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवले.
इ.स. १९२१ मध्ये त्यांनी वयाची ६० वर्षे पूर्ण केली, तेव्हा आपला संपूर्ण पगार विज्ञान व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या विकासासाठी विद्यापीठाला देणगी म्हणून दिला. दरवर्षी मिळणाऱ्या १,३०,२०० रुपयांवर व्याजातून दोन विद्यार्थ्यांना डॉ. पी. सी. रे. शिष्यवृत्ती दिली जाई. इ.स. १९२२ मध्ये त्यांनी अनुक्रमे मायक्रो बायोलॉजी आणि जीवाश्स्त्र या विषयांमधील सर्वोत्तम विद्यार्थ्याला १२,००० रुपयांचा 'नागार्जुन पुरस्कार' आणि ११,००० रुपयांचा 'सर आशुतोष मुकर्जी पुरस्कार' जाहीर केला. विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी देणगी देणारे लोक असतात; परंतु, दुसऱ्यांच्या नावाने शिष्यवृत्तीसाठी आपला पैसा देणारे लोक कमी असतात; खरोखरच, असे लोक महान होत.
सर आशुतोष मुकर्जी कलकत्ता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते. नंतर त्यांची नेमणूक कलकत्ता विद्यापीठाचे कुलपती म्हणून करण्यात आली. त्यांनी विद्यापीठामध्ये विज्ञान शिक्षणाच्या प्रगतीसाठी केलेल्या प्रयत्नांचे आणि विज्ञानात केलेल्या योगदानाचे महत्त्व लक्षात घेऊन प्रफुल्लचंद्र रे यांनी त्यांच्या सन्मानार्थ एक शिष्यवृत्ती जाहीर करण्याचा निर्णन घेतला. इ.स. १९२४ मध्ये डॉक्टर पी. सी. रे, जे. एन, मुकर्जी, जे. सी. घोष आणि शांतीस्वरूप भटनागर यांनी 'इंडियन केमिकल सोसायटी' (Indian Chemical Society) ची स्थापना केली. संस्थेच्या खर्चासाठी १२,००० रु. चे सुरुवातीचे योगदान रे यांनी दिले. या संस्थेचे ते दोन वर्षे अध्यक्ष होते.
इ.स. १९३२ मध्ये 'एका बंगाली रसायनतज्ज्ञाचे जीवनचरित्र व त्यांचे अनुभव' (द लाइफ-स्केच अँड एक्सपीरियन्सेस ऑफ अ बंगाली केमिस्ट) या शीर्षकाचे आत्मचरित्र त्यांनी लिहिले. इ.स. १९३४ मध्ये लंडन केमिकल सोसायटीने त्यांना सन्माननीय सदस्यत्व प्रदान केले. इ.स. १९३६ साली 'रसायनशास्त्राचे वयोवृद्ध प्राध्यापक' म्हणून ते विद्यापीठातून निवृत्त झाले. त्यांच्या सेवाकाळाची स्तुती करत विद्यापीठाने त्यांची तहहयात सन्माननीय विद्वान प्राध्यापक म्हणून नियुक्ती केली. ते मुलत: संत स्वभावाचे प्राध्यापक होते. शिवाय ते अतिशय मृदुभाषी (Soft spoken) आणि दयाळू (clement) होते. १४ जून, १९४४ रोजी या वैज्ञानिकाचे विद्यापीठाच्या वास्तूतच निधन झाले. रवींद्रनाथ टागोरांवर ज्या ठिकाणी अंतिम संस्कार केले गेले होते, त्या स्थानाच्या जवळच या महान वैज्ञानिकावर अंतिम संस्कार करण्यात आले. आपण या बहुआयामी व्यक्तीमत्त्व असणाऱ्या आणि देशासाठी सर्वस्वाचा त्याग करणाऱ्या थोर पुरुषाला श्रद्धांजली वाहू या.

आदींशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. नाजूक प्रकुतीचे असले तरी, प्रफुल्लचंद्र अतिशय बुद्धिमान व प्रतिभाशाली होते. जन्मगावी प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर इ.स. १८७० साली कलकत्ता येथील हैयर स्कूलमध्ये ते दाखल झाले. शिक्षणात चांगली गती असूनही प्रकृती अस्वास्थ्यामुळे इ.स. १८७४ साली त्यांना शिक्षण थांबवावे लागले. पण उपजत आवड असल्यामुळे वाचनाचा छंद त्यांनी चालूच ठेवला. प्रकृती सुधारल्यानंतर त्यांना पुन्हा कलकत्ता येथील अल्बर्ट शाळेत घालण्यात आले. इ.स. १८७९ मध्ये त्यांनी महाविद्यालयात दाखल होण्यासाठी असणारी प्रवेश परीक्षा दिली आणि उत्तीर्ण होऊन कलकत्ता विद्यापीठाशी संलग्न असलेल्या एका महाविद्यालयात त्यांनी प्रवेश घेतला. पुढील अभ्यासासाठी त्यांनी ईश्र्वरचंद्र विद्यासागर यांनी स्थापन केलेल्या मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यु (Metropolitan instityu) मध्ये प्रवेश घेतला. नंतर त्यांनी कलकत्त्यामधील प्रेसिडेन्सी महाविद्यालयात प्रवेश घेतला. साहित्यात त्यांना खूप रस होता. इंग्रजी बरोबरच त्यांनी लॅटिन (Latin), फ्रेंच (French) आणि संस्कृतमध्येही प्रावीण्य संपादन केले. महान व्यक्तींची चरित्रे वाचण्यात त्यांना रस होता. एकदा त्यांना 'स्थितिक विद्युत' (static electricity) या विषयावर प्रयोग करणारे अमेरिकेतील वैज्ञानिक बेंजामिन फ्रँकलीन यांचे चरित्र वाचण्यास मिळाले. ते वाचून ते खूप प्रभावित झाले. त्यानंतर विज्ञानाची त्यांची आवड वाढली. याच दरम्यान, ते भारतात झालेल्या गिलख्रिस्ट शिष्यवृत्ती स्पर्धा (scholarships) परीक्षेला बसले आणि शिष्यवृत्तीसाठी निवडले गेले. परदेशी जाण्यासाठी मोठ्या कष्टाने त्यांनी आपल्या आईची परवानगी मिळवली. त्यांचे वडील मात्र या निर्णयाने आनंदित झाले होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा