Advertisement

मराठी कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मराठी कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, ८ जून, २०१४

स्त्री-पुरुष समानता

स्त्री आणि पुरुष स्तंभ प्रपंचाची।
एकाच रथाची, दोन चाके।।१।।
तरी का मानीती, पुरुषा प्रधान।
दुय्यम हे स्थान, नारीलागी।।२।।
स्त्रीयांनी ऐकावे, घरात बसावे।
स्वच्छंदी फिरावे, पुरुषाने।।३।।
नारीमध्ये असे काय कमी दीसे।
उपेक्षित असे, अजुनिया।।४।।

शुक्रवार, २१ मार्च, २०१४

अनुताई वाघ

आदिवासीसाठी जिव तळमळे।
मनी हळहळे अनुताई।।१।।
शिक्षणाचे वैर पिढीजात ज्यांना।
आखली योजना विकासाची।।२।।
शाळा, रात्रशाळा, प्रौढांशी शिक्षण।
आणि संगोपन बालकांचे।।३।।
शासनाने केला उचित सन्मान।
पदमश्री देउन, गौरविले।।४।।

मेधा पाटकर

समाज सेविका, मेधा पाटकर।
नाव देशभर, गाजतसे।।१।।
नर्मदा बचाव जन आंदोलन।
नेतृत्व करून चालविले।।२।।
दु:खी पिचलेल्या आदिवासीसाठी।
श्रमिकांच्या पाठी, उभी सदा।।३।।
दु:खीतांची सेवा, मानीयला धर्म।
आदर्श हे कर्म, जगापुढे।।४।।

सिंधुताई सपकाळ

झाली उपेक्षित अनाथांची आई।
एक सिंधुताई सपकाळ।।१।।
अंगी साधेपण साडी नऊवारी।
कुंकू भाळावरी, लावी मोठी।।२।।
अनाथ मुलांचा करिते सांभाळ।
वेदने चे वळ झाकुनिया।।३।।
सोसुनिया उन, देवसे सावली।
धन्य ती माउली, अनाथांची।।४।।

अंतराळवीर : कल्पना चावला antralvir - kalpana chavla

अंतराळवीर कल्पना चावला।
अखिल जगाला स्फुर्तीदायी।।१।।
झाली संशोधन नासा या संस्थेत।
स्वप्न वास्तवात, आणावया।।२।।
कल्पनाचे यान उडाले आकाशी।
प्रचंड साहसी, इच्छाशक्ती।।३।।
परतीच्या वेळी, पृथ्वीच्या कक्षेत।
जळाले स्फोटात, कोलंबिया।।४।।
धरतीच्या लेकीची यशोगाथा व्योमी।
तीची जन्मभूमी, भारतात।।५।।

मंगळवार, ११ मार्च, २०१४

उंच उंच गगन हे

उंच उंच गगन हे आज पृथ्वीला मिळे
रंग रंग मिसळूनी, एक रंग हा जुळे।।
संपले उन्हातले ते अखंड चालणे
चालतो इथे आता, थंड थंड चांदणे
पाखरास हरवल्या, घर फिरून हे मिळे।।
सर्व सर्व एक ह्या जाहल्या दिश दिशा
एक आमुची उषा, एक आमुची निशा
शिशिर हि वसंत ही, आमुचे नये गळे।।
यापुढे न कोणीही, राहणार एकटे
पाश सर्व आमुचे तोलणार संकटे
आम्ही जिथे आसू तिथे,
नयन नयन ओखळे।।
असे जगू जया मुळे धन्य होय माय ती
असे मरू ज्यामुळे विश्व गायी आरती
सर्व नाथ हे जिथे अनाथ कोण राहिले।।

रविवार, ९ मार्च, २०१४

देवी शारदे माता (devi sharde mata)

देवी शारदे शारदे, नानाविद्या,
कलानिधे आम्हास ज्ञान दे।।धृ।।
विद्यादेवी तू जगजननी,
आम्ही बालके तव आज्ञानी
तुझ्या चिंतनी, स्तवनी,
भजनी आनंद लाभू दे।।१।।
तव तेजाची प्रसन्न किरणे,
आज उजळती तिन्ही भुवने
हीच आम्हास होवोत भूषणे,
आम्हास तेज दे।।२।।
देई नम्रता निर्मळ वाणी,
विद्या-धन-बल देई जननी
हेच मागणे तुझिया चरणी,
सुविचार सौख्य दे।।३।।

आईस..... (mother)

आईस.....
आई तुझ्या कुशीत
जन्मू दे तुझीच लेक
तुझ्यापरी मिळावा
मजला स्त्रीजन्म एक।।धृ।।
तू जन्मदात्री आई
झालीस का कठोर
उदरात वाढते मी
नको करूस वर
येणा-या तुझ्या मुलीची
तू ऐक आर्त हाक।।१।।
पुत्र हा वंश दिवा
मी तर एक पणती
विझवू नकोस मजला
उजळीलं सर्व नाती
कण्याच वंशवेल
तू मान ग नि:शंक।।२।।
मी सान पावलांनी
खेळील अंगणात
विद्या-कला गुणांनी
भूषविल या घरास
आदर्श थोर महिला
जगती मला अनेक।।३।।

स्वागतगीत..... (swagatagit git)

आज इथल्या थोरविला, चंदनाचा गंध आला,
वाळवंटाचा किनारा पाउलांनी धन्य झाला।।धृ।।
हीच माती पायरीची, ज्यावरी चढला तुम्ही
भाग्य अमुचे थोर झाले, आज अमुच्या जीवनी
भेट होता काळजाची, पंढरीचा योग आला।।१।।
रंगथेबाच्या सरीने, बोलकी झाली उषा
अंतरीच्या पाहुण्यांचा, दर्शनाने योग आला।।२।।

हर्षभराने करितो आम्ही (harshabharane karito aamhi)

हर्षभराने करितो आम्ही स्वागतम् स्वागतम्
सुंदर सरगम अर्पण करितो स्वागतम्(२)।।धृ।।
पुष्पसुगंधी गुंफुनी मला भावगीतांची हि स्वरमाला
अर्पण हे करितो आम्ही स्वागतम्।।१।।
स्वागत अपले पुष्प गुंफण्या गुरुजनांचा आदर करण्या
प्रार्थना हि करिता आम्ही स्वागतम्।।२।।

गर्जा जयजयकार (garja jayajaykar)

गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार
अनद्य वज्राचे छातीवरती घ्या झेलून प्रहार।।धृ।।
श्र्वासानों जा वायुसंगे ओलांडून भिंत
अन आईला कळला अमुच्या हृद्यातील खंत
सांगा वेडी तुझी मुले हि या अंधारात
बद्ध करांनी अखेरचा तुज करिती प्रणिपात
तुझ्या मुक्तीचे एकच होते वेड परी अनिवार।।१।।
कशास आई भिजवीशी डोळे उजळ तुझे भाल
रात्रीच्या गर्भात उद्याचा वसे उष:काल
सरणावरती आज आमुची पेटतच प्रेते
उठतील त्या ज्वालांतून भावी क्रीन्तीचे नेते
लोहदंड तव पाया मधले खळाखळा तुटणार।।२।।
आता कर ओकांर तांडव गिळावया घास
नाचत गर्जत टाक बळींच्या गळ्यावरी फास
रक्तमांस लुटण्यास गिधाडे येऊ देत क्रूर
पहा मोकळे केले आता त्यासाठी ऊर
शरीराचा कर सुखेनैव या सुखेनैव संहार।।३।।
कुसुमाग्रज