Advertisement

रविवार, ९ मार्च, २०१४

गर्जा जयजयकार (garja jayajaykar)

गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार
अनद्य वज्राचे छातीवरती घ्या झेलून प्रहार।।धृ।।
श्र्वासानों जा वायुसंगे ओलांडून भिंत
अन आईला कळला अमुच्या हृद्यातील खंत
सांगा वेडी तुझी मुले हि या अंधारात
बद्ध करांनी अखेरचा तुज करिती प्रणिपात
तुझ्या मुक्तीचे एकच होते वेड परी अनिवार।।१।।
कशास आई भिजवीशी डोळे उजळ तुझे भाल
रात्रीच्या गर्भात उद्याचा वसे उष:काल
सरणावरती आज आमुची पेटतच प्रेते
उठतील त्या ज्वालांतून भावी क्रीन्तीचे नेते
लोहदंड तव पाया मधले खळाखळा तुटणार।।२।।
आता कर ओकांर तांडव गिळावया घास
नाचत गर्जत टाक बळींच्या गळ्यावरी फास
रक्तमांस लुटण्यास गिधाडे येऊ देत क्रूर
पहा मोकळे केले आता त्यासाठी ऊर
शरीराचा कर सुखेनैव या सुखेनैव संहार।।३।।
कुसुमाग्रज

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा