Advertisement

मंगळवार, ११ मार्च, २०१४

विश्व वंद्य भारता (vishv vandya bharata)

विश्ववंद्य भारता प्रणाम घे अनेकदा अनेकदा।।धृ।।
किरोट शोभतो शिरी, सुरेख दिव्य भव्य तो
मेखला कटीवरी, सुरम्य साज भासतो।।
सिंधू धन्य मानतो, पायधूळ संपदा
विश्ववंद्य भारता, प्रणाम घे अनेकदा अनेकदा।।१।।
गर्जना जगी तुझी, दुमदूमोनी राहिली
दुन्दुभि झरोनी कीर्ती, दूरवर गाजली।।
जाग ना पुन्हा तसा, पाहदेच एकदा
विश्ववंद्य भारता, प्रणाम घे अनेकदा अनेकदा।।२।।
वर्णहीन जाहले तुझे सवर्ण पाहुनी
स्तोत्र गाईले तुझे विनम्र दीन होऊनी।।
नेत्र दिपवी अपार दिव्य ज्ञान संपदा
विश्ववंद्य भारता, प्रणाम घे अनेकदा अनेकदा।।३।।
शौर्य तेज या बघा पहा कसे झकळते
त्याग प्रेम शांतता, इथेच मात्र नांदते।।
एक होऊनी करा खुशाल गर्जना सदा
विश्ववंद्य भारता, प्रणाम घे अनेकदा अनेकदा।।४।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा