Advertisement

सोमवार, ३१ मार्च, २०१४

गुढी पाडवा Gudhi Padva

गुढी पाडवा



हिंदू धर्मियांच्या नवीन वर्षाची सुरुवात गुढीपाडवा या सणाने होत असते. मनाला प्रसन्न वाटणाऱ्या चैत्र महिन्यात हा सण साजरा करतात. चैत्र महिन्यात सर्वत्र प्रसन्नतेचे वातावरण असते.
वृक्षांना नवीन पालवी फुटते. लहान बाळाप्रमाणे झाडे सुंदर दिसतात. या महिन्यात सर्वत्र  पर्णरुपी रंगाची उदळण सुरू असते आणि याच महिन्यात नववर्षाला प्रारंभ होतो, हा साडेतीन मुहूर्तापैकी एक असल्यामुळे ह्या दिवशी नवे काम करण्यात शुभारंभ करीत असतात. नवीन वर्षाचा आनंद वक्त करण्यासाठी गुढी घरोघरी उभारली जाते. म्हणून या सणाला 'गुढीपाडवा' म्हणून ओळखतात. हा सण ज्या वाराच्या अधिपतीची पूजा केली जाते. या दिवशी पहाटे उठून घर स्वच्छ केले जाते. सुबकशी रांगोळी काढून घरातील वडीलधारी ,मंडळी वेळूची काठी स्वच्छ धुवून तिच्या टोकास तांबडे वस्त्र व फुलांची माळ बांधतात. वर लोटी ठेवतात. फुलांच्या माळेबरोबर साखरेची पदके असलेली माळ असावी मग ती काठी रांगोळी घातलेल्या जागेवर उंच उभी करावी आणि पूजा करून कडुलिंबाच्या कोवळ्या पानात, हरभऱ्याची डाळ, ओवा, मीठ, गुळ, घालून हे मिश्रण वाटले जाते. नंतर हा प्रसाद सर्वांना देतात. सूर्यास्तापूर्वी गुढी उतरावयची असते. पण यापूर्वी परत एकदा हळदकुंकू-अक्षता वाढून गुढीची पूजा करावी. या दिवशी ऐतिहासिकरित्यासुद्धा खूप महत्व आहे.
पण त्यापूर्वी अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या. काही आख्यायिक प्रचलित आहेत.याच दिवशी प्रभू श्रीरामचंद्रांनी लंकाधीश रावणाला ठार करून विजयी होऊन आयोध्या नगरात प्रवेश केला होता. तोच हा दिवस वर्षप्रतिपदेचा होता. या दिवशी नवीन वस्तू खरेदी करण्याची पद्धत आहे. ब्रम्हदेवाने या सृष्टीला निर्माण करण्यास या दिवसापासूनच सुरुवात केली होती तो मास चैत्र होता. बसू नावाचा राजा तपश्चर्या करून मनुजेंद्र झाला व अमरेंद्राने या दिवशी वस्त्रालंकार देऊन त्याचा गौरव केला तो हाच दिवस होता. इंद्राने वृत्तसुरास ठार मारले तो दिवसही चैत्रशुद्ध प्रतिपदेचा होता. शालिवाहनाने शकाचा पराभव करण्यासाठी मातीचे सहा हजार सैनिक तयार केले, त्यात प्राण निर्माण करून फौज तयार केली. थंड निर्जीव समाजाला पुनःजीवनदान देण्याचे कार्य याच मासात झाले. त्याची आठवण राहण्याची इसवी सन व शालिवाहन शक यात ७८ वर्षाचा फरक आहे. या सगळ्या शुभ कृत्यांचा आरंभ या मुहूर्तावर झाला म्हणून हा पाडवाच आहे. या दिवसापासूनच आपण आपले आचरण पवित्र ठेवण्याच्या संकल्प करायला पाहिजे. आपण शेजारी, मित्र-मैत्रीणी नातेवाईक यांना प्रेमाने व नवीन वर्ष सगळ्यांना आनंद व भराभराटीचे जावो अशी शुभेच्छा वक्त करावी विद्यार्थांनी दररोज नियमित अभ्यास करण्यात, आईवडिलांचा मान ठेवण्याचा संकल्प करावा. आलेल्या परिस्थितीत आनंदी राहण्याचे व्रत घ्यावे.
आनंद, उल्हास चैतन्य देणारी गुढी नेहमीच आकाशाला भिडू दे!
(थोडक्यात : चैत्र हा मराठीच्या कालगणनेनुसार वर्षातला पहिला महिना. या महिन्यापासून आपल्या नव्या वर्षाची सुरुवात होते. आपण या नवीन वर्षाचे स्वागत मोठ्या आनंदाने, उत्साहाने करतो. घराला आंब्याच्या झाडाच्या पानाचे तोरणे लावतो वर्षच्या या पहिल्या सणाला गुढीपाडवा किंवा वर्षप्रतिपदा असे म्हणतात.
सूर्योदयाच्या वेळी सगळीकडे आनंद पसरलेला असतो अशा वेळी गृहिणी अंगन झाडून स्वच्छ करतात त्यावर रांगोळी काढतात. नववर्षाच्या स्वागताला गुढी उभारली जाते. बांबूची उंच काळी, रेशमी वस्त्राने सजवतात. त्यावर तांब्या पितळेचे पात्र ठेवले जाते हार, गाठी, कडू लिंबाची डहाळी त्याला लावली जाते अशा प्रकारे तयार केलेल्या गुढीची पूजा करतात आणि अंगणात उभारतात. उंच उभारलेली ही गुढी उंच आहे, तशी तुमची प्रगती होऊ द्या. या दिवशी आपल्या मित्र मैत्रिणींना भेटून मुले नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतात. )  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा