Advertisement

सोमवार, ३१ मार्च, २०१४

छडी लागे छम् छम् Chhadi Lage Chham Chham

छम् छम् छम् छम् छम् छम्
छडी लागे छम् छम्  विद्या येई घम् घम्
छम् छम् छम् छम् छम् छम्।।ध्रु.।।
मोठ्या मोठ्या मिश्या डोळे एवढे एवढे लाल
दंताजीचा पत्ता नाही खप्पड दोन्ही गाल
शाळेमधल्या पोरांना हा वाटे दुसरा यम।।१।।
तंबाखूच्या पिचकार्यांनी भिंती झाल्या घाण
पचापचा शिव्या देई खाता खाता पान
मोर्या, मूर्खा, गोप्या, गध्ध्या देती सर्व दम।।२।।
तोंडे फिरवा पुस्ती गिरवा बघू नका कोणी
हसू नका रडू नका बोलू नका कोणी
म्हणा सारे एकदम ओ नामा सिद्धम्
ओ नाम सिद्धम् ओ नाम सिद्धम्।।३।।

गुढी पाडवा Gudhi Padva

गुढी पाडवा



हिंदू धर्मियांच्या नवीन वर्षाची सुरुवात गुढीपाडवा या सणाने होत असते. मनाला प्रसन्न वाटणाऱ्या चैत्र महिन्यात हा सण साजरा करतात. चैत्र महिन्यात सर्वत्र प्रसन्नतेचे वातावरण असते.
वृक्षांना नवीन पालवी फुटते. लहान बाळाप्रमाणे झाडे सुंदर दिसतात. या महिन्यात सर्वत्र  पर्णरुपी रंगाची उदळण सुरू असते आणि याच महिन्यात नववर्षाला प्रारंभ होतो, हा साडेतीन मुहूर्तापैकी एक असल्यामुळे ह्या दिवशी नवे काम करण्यात शुभारंभ करीत असतात. नवीन वर्षाचा आनंद वक्त करण्यासाठी गुढी घरोघरी उभारली जाते. म्हणून या सणाला 'गुढीपाडवा' म्हणून ओळखतात. हा सण ज्या वाराच्या अधिपतीची पूजा केली जाते. या दिवशी पहाटे उठून घर स्वच्छ केले जाते. सुबकशी रांगोळी काढून घरातील वडीलधारी ,मंडळी वेळूची काठी स्वच्छ धुवून तिच्या टोकास तांबडे वस्त्र व फुलांची माळ बांधतात. वर लोटी ठेवतात. फुलांच्या माळेबरोबर साखरेची पदके असलेली माळ असावी मग ती काठी रांगोळी घातलेल्या जागेवर उंच उभी करावी आणि पूजा करून कडुलिंबाच्या कोवळ्या पानात, हरभऱ्याची डाळ, ओवा, मीठ, गुळ, घालून हे मिश्रण वाटले जाते. नंतर हा प्रसाद सर्वांना देतात. सूर्यास्तापूर्वी गुढी उतरावयची असते. पण यापूर्वी परत एकदा हळदकुंकू-अक्षता वाढून गुढीची पूजा करावी. या दिवशी ऐतिहासिकरित्यासुद्धा खूप महत्व आहे.
पण त्यापूर्वी अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या. काही आख्यायिक प्रचलित आहेत.याच दिवशी प्रभू श्रीरामचंद्रांनी लंकाधीश रावणाला ठार करून विजयी होऊन आयोध्या नगरात प्रवेश केला होता. तोच हा दिवस वर्षप्रतिपदेचा होता. या दिवशी नवीन वस्तू खरेदी करण्याची पद्धत आहे. ब्रम्हदेवाने या सृष्टीला निर्माण करण्यास या दिवसापासूनच सुरुवात केली होती तो मास चैत्र होता. बसू नावाचा राजा तपश्चर्या करून मनुजेंद्र झाला व अमरेंद्राने या दिवशी वस्त्रालंकार देऊन त्याचा गौरव केला तो हाच दिवस होता. इंद्राने वृत्तसुरास ठार मारले तो दिवसही चैत्रशुद्ध प्रतिपदेचा होता. शालिवाहनाने शकाचा पराभव करण्यासाठी मातीचे सहा हजार सैनिक तयार केले, त्यात प्राण निर्माण करून फौज तयार केली. थंड निर्जीव समाजाला पुनःजीवनदान देण्याचे कार्य याच मासात झाले. त्याची आठवण राहण्याची इसवी सन व शालिवाहन शक यात ७८ वर्षाचा फरक आहे. या सगळ्या शुभ कृत्यांचा आरंभ या मुहूर्तावर झाला म्हणून हा पाडवाच आहे. या दिवसापासूनच आपण आपले आचरण पवित्र ठेवण्याच्या संकल्प करायला पाहिजे. आपण शेजारी, मित्र-मैत्रीणी नातेवाईक यांना प्रेमाने व नवीन वर्ष सगळ्यांना आनंद व भराभराटीचे जावो अशी शुभेच्छा वक्त करावी विद्यार्थांनी दररोज नियमित अभ्यास करण्यात, आईवडिलांचा मान ठेवण्याचा संकल्प करावा. आलेल्या परिस्थितीत आनंदी राहण्याचे व्रत घ्यावे.
आनंद, उल्हास चैतन्य देणारी गुढी नेहमीच आकाशाला भिडू दे!
(थोडक्यात : चैत्र हा मराठीच्या कालगणनेनुसार वर्षातला पहिला महिना. या महिन्यापासून आपल्या नव्या वर्षाची सुरुवात होते. आपण या नवीन वर्षाचे स्वागत मोठ्या आनंदाने, उत्साहाने करतो. घराला आंब्याच्या झाडाच्या पानाचे तोरणे लावतो वर्षच्या या पहिल्या सणाला गुढीपाडवा किंवा वर्षप्रतिपदा असे म्हणतात.
सूर्योदयाच्या वेळी सगळीकडे आनंद पसरलेला असतो अशा वेळी गृहिणी अंगन झाडून स्वच्छ करतात त्यावर रांगोळी काढतात. नववर्षाच्या स्वागताला गुढी उभारली जाते. बांबूची उंच काळी, रेशमी वस्त्राने सजवतात. त्यावर तांब्या पितळेचे पात्र ठेवले जाते हार, गाठी, कडू लिंबाची डहाळी त्याला लावली जाते अशा प्रकारे तयार केलेल्या गुढीची पूजा करतात आणि अंगणात उभारतात. उंच उभारलेली ही गुढी उंच आहे, तशी तुमची प्रगती होऊ द्या. या दिवशी आपल्या मित्र मैत्रिणींना भेटून मुले नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतात. )  

शनिवार, २९ मार्च, २०१४

राष्ट्रीयगीत Rashtriygeet

राष्ट्रीयगीत
वंदे मातरम्! वंदे मातरम्!!
सुजलाम् सुफलाम् मलयज-शीतलाम्,
शस्यश्यामलाम्, मातरम्!
वंदे मातरम्!
     शुभ्रज्योत्सना पुलकितयामिनीम्,
     फुल्लकुसुमित द्रुमदल शोभिनीम्,
     सुहासिनीम् सुमधुर भाषिणीम्,
     सुखदाम्, वरदाम्, मातरम्!
     वंदे मातरम्!

राष्ट्रगीत Rashtrageet

राष्ट्रगीत
जन-गण-मन अधिनायक, जय हे,
     भारत-भाग्य विधाता।
पंजाब-सिंध-गुजरात-मराठा-द्राविड़ उत्कल बंग,
विंध्य-हिमाचल-यमुना-गंगा,
     उच्छल-जलधि तरंग,
तव शुभ नामे जागे,
तव शुभ आशिष मांगे,
     गाहे तव जय-गाथा।
जन-गण-मंगलदायक जय हे,
     भारत-भाग्य विधाता।
जय हे, जय हे, जय हे,
     जय जय जय जय हे।।

शुक्रवार, २८ मार्च, २०१४

मराठी भाषेतील प्रसिद्ध ग्रंथ

ग्रंथ व लेखक
१) गीतारहस्य - लोकमान्य बा. गं. टिळक
२) सत्तावन्नचे स्वातंत्र्यसमर - बॅ. वि.दा. सावरकर
३) काळे पाणी - बॅ. वि.दा. सावरकर
४) व्यक्ती आणि वल्ली - पु.ल. देशपांडे
५) ययाती - वि.स. खांडेकर
६) रथचक्र - श्री.ना. पेंडसे
७) स्वामी - रणजित देसाई
८) शारदा - गो.ब. देवल
९) भाऊबंदकी - कृ.प्र. खाडिलकर
१०) एकच प्याला - रा.ग. गडकरी

रविवार, २३ मार्च, २०१४

शब्द समूहाबद्दल एक शब्द A word samuhabaddala word

अनेक बाबींवर एकाच वेळी लक्ष ठेवणारा - अष्टावधानी
अनेक केळ्यांचा समूह - घड
अनेक गुरांचा समूह - कळप
अनेक फळांचा समूह - घोस
अनेक फुलांचा समूह - गुच्छ
अनेक माणसांचा समूह - जमाव
अंग चोरून काम करणारा - अंगचोर
अस्वलाचा खेळ करणारा - दरवेशी
ईश्वर आहे असे मानणारा - आस्तिक
उंचावरून पडणारा पाण्याचा प्रवाह - धबधबा 
ऐकायला येत नाही असा - बहिरा
ऐकायला व बोलायला येत नाही असा - मूकबधीर
कथा सांगणारा - कथेकरी
कधीही जिंकला न जाणारा - अजिंक्य
कपडे धुण्याचे काम करणारा - धोबी
कपडे शिवण्याचे काम करणारा - शिंपी
कष्ट करून जगणारा - श्रमजीवी
कमी आयुष्य असणारा - अल्पायुषी
कर्तव्य तत्परतेने पार पडणारा - कर्तव्यदक्ष 
कापड विणणारा - विणकर
कादंबरी लिहिणारा लेखक - कादंबरीकार
कविता करणारी - कवयित्री
किल्ल्याच्या सभोवतालची भिंत - तट
केवळ स्वतःचाच फायदा करू पाहणारा - स्वार्थी
केलेले उपकार जाणणारा - कृतज्ञ
केलेले उपकार विसरणारा - कृतघ्न
कैदी ठेवण्याची जागा - तुरुंग 
कोणत्याही क्षेत्रात एकदम होणारा इष्ट बदल - क्रांती
खूप दानधर्म करणारा - दानशूर
खूप आयुष्य असणारा - दीर्घायुषी
खूप पाऊस पडणे - अतिवृष्टी
गुरे राखणारा - गुराखी
घरदार नष्ट झाले आहे असा - निर्वासित
घरापुढील मोकळी जागा - अंगण
घरे बांधणारा - गवंडी
चार रस्ते एकत्र येतात ती जागा - चौक
चांदण्या रात्रीचा पंधरवडा - शुक्लपक्ष
चित्रे काढणारा - चित्रकार
जमिनीवर राहणारे प्राणी - भूचर 
जादूचे खेळ करून दाखवणारा - जादूगार
जे प्रत्यक्षात नाही ते आहे असे भासणे - आभास
जेथे वस्तू विकल्या जातात ती जागा - दुकान
ज्याचे वर्णन करणे शक्य नाही ते - अवर्णनीय
ज्याचे कधी विस्मरण होत नाही ते - अविस्मरणीय
ज्याला एकही शत्रू नाही असा - अजातशत्रू
ज्याला आईवडील नाहीत असा - अनाथ, पोरका
ज्याला मरण नाही असा - अमर
ज्याला कधी म्हातारपण येत नाही असा - वजर
ठरावीक काळाच्या अंतराने प्रकाशित होणारे - नियतकालिक
एकत्र येतात ती जागा - तिठा  
झाडांची निगा राखणारा - माळी
तिथी (दिवस, वेळ) न ठरवता (अचानक) आलेला - अतिथी
दगडावर कोरलेले लेख - शिलालेख
दगडावर मूर्ती घडवणारा - शिल्पकार
दररोज प्रसिद्ध होणारे - दैनिक
दर आठवड्याने प्रसिद्ध होणारे - साप्ताहिक
दर पंधरवड्याने प्रसिद्ध होणारे - पाक्षिक
दर महिन्याला प्रसिद्ध होणारे - मासिक
दर तीन महिन्यांनी प्रसिद्ध होणारे - त्रैमासिक
दर सहा महिन्यांनी प्रसिद्ध होणारे -  षण्मासिक
दर वर्षाला प्रसिद्ध होणारे - वार्षिक
दारावरील पहारेकरी - द्वारपाल, दरवान
दुष्काळात सापडलेले - दुष्काळग्रस्त
दुसर्यावर अवलंबून असणारा - परावलंबी
दुसर्यावर उपकार करणारा - परोपकारी
दूरदर्शनवर, आकाशवाणीवर बातम्या सांगणारा - वृत्तनिवेदक 
देशाची सेवा करणारा - देशसेवक
देवापुढे सतत जळणारा दिवा - नंदादीप
दोन किंवा अनेक नद्या एकत्र येतात ते ठिकाण - संगम
धान्य साठवण्याची जागा - कोठार
नदीची सुरवात होते ती जागा - उगम
नाटकांत किंवा चित्रपटांत काम करणारा - अभिनेता
नेहमी घरात बसून राहणारा - घरकोंबडा
पाऊस अजिबात न पडणे - अवर्षण
पायात चपला वा बूट न घालता चालणारा - अनवाणी
पायापासून डोक्यापर्यंत - आपादमस्तक
पालन करणारा - पालक
पायी चालणारा - पादचारी  
पुरामुळे नुकसान झालेला - पूरग्रस्त
पूर्वी कधी घडले नाही असे - अभूतपूर्व, अपूर्व 
फुकट भोजन मिळण्याचे ठिकाण - सदावर्त, अन्नछत्र
बसगाड्या थांबण्याची जागा - बसस्थानक
बातमी आणून देणारा/देणारी - वार्ताहर
बोलता येत नाही असा - मुका
भाषण ऐकणारा - श्रोता
भाषण करणारा - वक्ता 
माकडाचा खेळ करणारा - मदारी
मातीची भांडी करणारा - कुंभार
मृत्यूवर विजय मिळवणारा - मृत्युंजय
रणांगणावर आलेले मरण - वीरमरण
रोग्यांची शुश्रुषा करणारी - परिचारिका
लग्नासाठी जमलेले लोक - वर्हाडी
लहानांपासून वृद्ध माणसांपर्यंत - आबालवृद्ध
लाकूडकाम दरणारा - सुतार
लाज नाही असा - निर्लज्ज
लागत नाही असा - अथांग
वाद्य वाजवणारा - वादक
वाडवडिलांनी मिळवलेली - वडिलोपार्जित
विनामुल्य पाणी मिळण्याची जागा - पाणपोई
विमान चालवणारा - वैमानिक
व्याख्यान देणारा - व्याख्याता
शत्रूकडील बातमी काढणारा - हेर
शत्रूला सामील झालेला - फितूर
शेती करणारा - शेतकरी
शोध लावणारा - संशोधक
श्रमांवर जगणारा - श्रमजीवी
सतत काम करणारा - दिर्घोद्योगी
स्तुती गाणारा - भाट
सर्व इच्छा पूर्ण करणारा वृक्ष - कल्पवृक्ष
सर्व इच्छा पूर्ण करणारी गाय - कामधेनू
स्वर्गातील इंद्राची बाग - नंदनवन
स्वतः श्रम न करता खाणारा - ऐतखाऊ
स्वतःचा स्वार्थ न पाहणारा - निःस्वार्थी
संकटे दूर करणारा - विघ्नहर्ता
सूर्य उगवण्याची घटना - सूर्योदय
सूर्य मावळण्याची घटना - सूर्यास्त
सोन्याचांदीचे दागिने करणारा - सोनार
हत्तीला काबूत ठेवणारा - माहूत 
हाताच्या बोटात घालायचं दागिना - अंगठी
हिमालयापासून कन्याकुमारीपार्यंत होडी चालवणारा - नावाडी

मराठी शब्द - अंक

एक            १        
दोन           २    
तीन           ३
चार            ४
पाच           ५
सहा            ६
सात           ७
आठ           ८
नऊ            ९
दहा            १०
अकरा         ११
बारा            १२
तेरा             १३    
चौदा           १४
पंधरा          १५
सोळा           १६
सतरा          १७
अठरा          १८
एकोणीस     १९
वीस             २०
एकवीस       २१
बावीस         २२
तेवीस          २३
चोवीस         २४
पंचवीस       २५
सव्वीस        २६
सत्तावीस     २७
अठ्ठावीस    २८
एकोणतीस   २९
तीस             ३०
एकतीस       ३१
बत्तीस          ३२
तेहतीस       ३३
चौतीस        ३४
पस्तीस       ३५
छत्तीस         ३६
सदतीस       ३७
अडतीस       ३८
एकोणचाळीस  ३९
चाळीस             ४०
एकेचाळीस       ४१
बेचाळीस          ४२
त्रेचाळीस          ४३
चव्वेचाळीस     ४४
पंचेचाळीस       ४५
सेहेचाळीस       ४६
सत्तेचाळीस       ४७
अठ्ठेचाळीस    ४८
एकोणपन्नास  ४९
पन्नास            ५०
एकावन्न          ५१ 
बावन्न             ५२
त्रेपन्न              ५३
चौपन्न            ५४
पंच्चावन्न       ५५
छपन्न             ५६
सत्तावन्न         ५७
अठ्ठावन         ५८
अकोणसाठ      ५९
साठ                  ६०
एकसष्ठ              ६१
बासष्ठ                ६२
त्रेसष्ठ                 ६३
चौसष्ठ                ६४
पासष्ठ                 ६५
सहासष्ठ              ६६
सदुसष्ठ               ६७
अडुसष्ठ               ६८
अकोनसत्तर        ६९
सत्तर                  ७०
एकाहत्तर            ७१
बहात्तर               ७२ 
त्र्याहत्तर             ७३
चौऱ्याहत्तर        ७४
पंच्याहत्तर         ७५
शहाहत्तर            ७६
सत्याहत्तर         ७७
अठ्ठ्याहत्तर     ७८
एकोणऐशी        ७९
ऐशी                  ८०
एक्याऐशी         ८१
ब्याऐशी            ८२
त्र्याऐशी            ८३
चौर्याशी            ८४
पंचाऐशी           ८५
शहाऐशी           ८६
सत्याऐशी        ८७
अठ्ठ्याऐशी    ८८
एकोणनव्वद   ८९
नव्वद             ९०
एक्याण्णव      ९१
ब्याण्णव         ९२
त्र्याण्णव         ९३
चौर्याण्णव       ९४
पंच्याण्णव      ९५
शहाण्णव         ९६
सत्याण्णव      ९७
अठ्ठ्याण्णव  ९८
नव्याण्णव      ९९
शंभर                १००

शुक्रवार, २१ मार्च, २०१४

अनुताई वाघ

आदिवासीसाठी जिव तळमळे।
मनी हळहळे अनुताई।।१।।
शिक्षणाचे वैर पिढीजात ज्यांना।
आखली योजना विकासाची।।२।।
शाळा, रात्रशाळा, प्रौढांशी शिक्षण।
आणि संगोपन बालकांचे।।३।।
शासनाने केला उचित सन्मान।
पदमश्री देउन, गौरविले।।४।।

मेधा पाटकर

समाज सेविका, मेधा पाटकर।
नाव देशभर, गाजतसे।।१।।
नर्मदा बचाव जन आंदोलन।
नेतृत्व करून चालविले।।२।।
दु:खी पिचलेल्या आदिवासीसाठी।
श्रमिकांच्या पाठी, उभी सदा।।३।।
दु:खीतांची सेवा, मानीयला धर्म।
आदर्श हे कर्म, जगापुढे।।४।।

सिंधुताई सपकाळ

झाली उपेक्षित अनाथांची आई।
एक सिंधुताई सपकाळ।।१।।
अंगी साधेपण साडी नऊवारी।
कुंकू भाळावरी, लावी मोठी।।२।।
अनाथ मुलांचा करिते सांभाळ।
वेदने चे वळ झाकुनिया।।३।।
सोसुनिया उन, देवसे सावली।
धन्य ती माउली, अनाथांची।।४।।

अंतराळवीर : कल्पना चावला antralvir - kalpana chavla

अंतराळवीर कल्पना चावला।
अखिल जगाला स्फुर्तीदायी।।१।।
झाली संशोधन नासा या संस्थेत।
स्वप्न वास्तवात, आणावया।।२।।
कल्पनाचे यान उडाले आकाशी।
प्रचंड साहसी, इच्छाशक्ती।।३।।
परतीच्या वेळी, पृथ्वीच्या कक्षेत।
जळाले स्फोटात, कोलंबिया।।४।।
धरतीच्या लेकीची यशोगाथा व्योमी।
तीची जन्मभूमी, भारतात।।५।।

अंतराळवीर : सुनिता विल्यम्स (antralvir - sunita vilyms)

अफाट, अदभूत स्त्री ची कहाणी।
घाली गवसणी आकाशाला।।१।।
अंतराळी सहा महिने प्रवास।
एकोणतीस तास, स्पेसवाक।।२।।
इच्छाशक्ती पुढे लाजले गगन।
केली संशोधन सौर उर्जा।।३।।
थोर या नारीचा विश्वात विक्रम।
सुनीता विल्यम्स नाव तिचे।।४।।

मंगळवार, १८ मार्च, २०१४

मराठी सण (marathi san, fastival)

गुढीपाडवा
रामनवमी
अक्षय्यतृतीया
वटपौर्णिमा
गुरुपौर्णिमा
नागपंचमी
नारळी पौर्णिमा (रक्षाबंधन)
गोकुळाष्टमी
हरितालिका
गणेशचतुर्थी
नवरात्र
कोजागिरी पौर्णिमा
दसरा
धनत्रयोदशी
दिवाळी
भाऊबीज
मकरसंक्रांती
महाशिवरात्री
होळी

रविवार, १६ मार्च, २०१४

मराठी महीने (marathi mahine)

चैत्र
वैशाख
ज्येष्ठ
आषाढ
श्रावण
भाद्रपद
अश्विन
कार्तिक
मार्गशीर्ष
पौष
माघ
फाल्गुन


प्रत्येक मराठी महिन्याचे दिवस = ३०
पहिला पंधरवडा = १५ दिवस = शुद्ध पक्ष किंवा शुक्ल पक्ष
दुसरा पंधरवडा = १५ दिवस = वद्य पक्ष किंवा कृष्ण पक्ष
मराठी महिन्यांतील दिवसांची नावे :
शुद्ध / शुक्ल पक्ष        वद्य / कृष्ण पक्ष 
प्रतिपदा                     प्रतिपदा           
द्वितीया                      द्वितीया    
तृतीया                       तृतीया    
चतुर्थी                        चतुर्थी    
पंचमी                        पंचमी
षष्ठी                            षष्ठी   
सप्तमी                        सप्तमी       
अष्टमी                        अष्टमी
नवमी                        नवमी
दशमी                        दशमी
एकादशी                    एकादशी
द्वादशी                       द्वादशी
त्रयोदशी                    त्रयोदशी
चतुर्दशी                     चतुर्दशी
पौर्णिमा                     अमावस्या 

बुधवार, १२ मार्च, २०१४

मराठी विरुद्धार्थी शब्द (marathi virudhdarthi shabd)

मराठी विरुद्धार्थी शब्द
(Marathi Virudhdarthi Shabd)

Marathi Antonyms  to increase your Marathi word power (vocabulary). This is first list of our Marathi Antonyms (Marathi Virudhdarthi Shabd) Series. This list is not only for beginners who are learning Marathi but also can play to increase marks in competitive exams like MPSC PSI, MPSC STI, MPSC Assistant, MPSC Rajya Seva, Maharashtra Talathi Exam, Collector office clerk exam, Jilla Nivad Samiti and ZP recruitments.

This list is also useful for Divisional Accountant / Auditor those who are selected by SSC (Staff Selection Commission) and posted in State of Maharashtra only. Marathi language proficiency test clearance is compulsory for this officials within certain period decided by the department.



अथ x इति       
अजर x जराग्रस्त       
अमर x मृत्य         
अधिक x उणे       
अलीकडे x पलीकडे    
अवघड x सोपे
अंत x प्रारंभ
अचल x चल
अचूक x चुकीचे
अडाणी x शहाणा
अटक x सुटका
अतिवृष्टी x अनावृष्टी
अती x अल्प
अर्थ x अनर्थ 
अनुकूल x प्रतिकूल
अभिमान x दुरभिमान
अरुंद x रुंद
अशक्य x शक्य 
अंधकार x प्रकाश
अस्त x प्रारंभ
अडचण x सोय
अपेक्षित x अनपेक्षित
अशक्त x सशक्त
अर्धवट x पूर्ण
अमूल्य x कवडीमोल
असतो x नसतो
अपेक्षाभंग x अपेक्षापूर्ती
अंथरूण x पांघरूण
अग्रज x अनुज
अनाथ x सनाथ
अतिवृष्ट x अनावृष्टी
अधोगती x प्रगती, उन्नती
अबोल x वाचाळ
अब्रू x बेअब्रू
अल्लड x पोक्त
अवखळ x गंभीर
अवजड x हलके
आरंभ x शेवट 
आठवण x विस्मरण
आशा x निराशा 
आता x नंतर        
आत x बाहेर
आनंद x दु:ख        
आला x गेला
आहे x नाही        
आळशी x उद्योगी
आकर्षण x अनाकर्षण
आकाश x पाताळ
आतुरता x उदासीनता 
ओबडधोबड x गुळगुळीत    
आदर्श x अनादर्श
आवडते x नावडते
आवश्यक x अनावश्यक
आज्ञा x अवज्ञा
आधी x नंतर
आघाडी x पिछाडी
आजादी x गुलामी
आशीर्वाद x शाप
आस्था x अनास्था
आदर x अनादर
आडवे x उभे
आयात x निर्यात
आंधळा x डोळस
ओला x सुका
ओली x सुकी
ओळख x अनोळख
इकडे x तिकडे
इथली x तिथली        
इष्ट x अनिष्ट
इमानी x बेइमानी
इच्छा x अनिच्छा
इलाज x नाइलाज 
इहलोक x परलोक
उघडे x बंद
उच x नीच
उजेड x काळोख
उदासवाणा x उल्हासित
उभे x आडवे
उमेद x मरगळ
उंच x बुटका
उच्च x नीच
उतरणे x चढणे
उत्तम x क्षुद्र
उत्कर्ष x अपकर्ष, अधोगती
उचित x अनुचित
उदघाटन x समारोप
उदास x प्रसन्न
उदार x अनुदार, कृपण
उधार x रोख
उधळ्या x कंजूष, काटकसरी 
उपकार x अपकार
उपदेश x बदसल्ला
उपयोगी x निरुपयोगी
उपाय x निरुपाय
उलट x सुलट   
ऊन x सावली
उगवणे x मावळणे
उशिरा x लवकर
उत्तेजन x विरोध
उत्साह x निरुत्साह
उद्धट x नम्र
उदार x कंजूष
उन्नती x अवनती     
एकदा x अनेकदा
ऐटदार x केविलवाणा
ऐच्छिक x अनैच्छिक, अपरिहार्य
कर्कश x संजुल
कडक x नरम
कळस x पाया
कच्चा x पक्का
कबूल x नाकबूल
कडू x गोड
कर्णमधुर x कर्णकटू
कठीण x सोपे
कल्याण x अकल्याण
कष्टाळू x कामचोर
कंटाळा x उत्साह 
काळा x पांढरा
काळोख x प्रकाश, उजेड
कायदेशीर x बेकायदेशीर
कौतुक x निंदा
क्रूर x दयाळू
कोरडा x ओला
कोवळा x जून, निबर
किमान x कमाल
कीव x राग 
कृतज्ञ x कृतघ्न
कृत्रिम x नैसर्गिक, स्वाभाविक
कृश x स्थूल
कृपा x अवकृपा 
कीर्ती x अपकीर्ती
खरे x खोटे
खंडन x मंडन
खात्री x शंका
खाली x वर
खादाड x मिताहारी
खुळा x शाहाणा
खूप x कमी 
खरेदी x विक्री
खोल x उथळ
गरम x थंड
गमन x आगमन
गढूळ x स्वच्छ
गंभीर x अवखळ, पोरकट
गद्य x पद्य
गाव x शहर
गारवा x उष्मा 
ग्राहक x विक्रेता
ग्रामीण x शहरी
ग्राह्य x त्याज्य
गुरु x शिष्य
गुण x अवगुण
गुप्त x उगड
गुळगुळीत x खरखरीत, खडबडीत
गुणी x अवगुणी
गुणगान x निदा
गोड x कडू
गोरा x काळा
गौण x मुख्य
घट्ट x सैल, पातळ
घाऊक x किरकोळ
चढ x उतार
चल x अचल, स्थिर
चढाई x माघार
चढणे x उतरणे
चवदार x बेचव
चपळ x सुस्त
चंचल x स्थिर
चांगले x वाईट
चूक x बरोबर
चोर x गोलीस
चिमुकला x थोरला
चिरंजीव x अल्पजीवी  
छोटी x मोठी
छोटेसे x मोठेसे
जड x हलके
जय x पराजय
जन्म x मृर्यू
जवळची x लांबची
जगणे x मरणे
जमा x खर्च 
जबाबदार x बेजबाबदार
जर x तर
जलद x हळू
जागणे x झोपणे
जास्त x कमी
जागरूक x निष्काळजी
जागृत x निद्रिस्त
जाणे x येणे
जिवंत x मृत
जिंकणे x हरणे
जीत x हार
जुने x नवे
जेवढा x तेवढा
जोश x कंटाळा
झोप x जाग
झोपडी x महाल
टंचाई x विपुलता
टिकाऊ x ठिसूळ
ठळक x पुसट
डावा x उजवा
डौलदार x बेढप 
तरुण x म्हातारा
तहान x भूक 
तुरळक x दाट
ताजे x शिळे
तारक x मारक
ताजी x शिळी
ताल x बेताल
तेजस्वी x निस्तेज
तेजी x मंदी
तीव्र x सौम्य
तीक्ष्ण x बोथट
तिरके x सरळ
तिरपा x सरळ
थंड x गरम
थंडी x उष्मा
थोर x लहान
थोरला x धाकटा
थोडे x जास्त
दया x राग 
दयाळू x जुलमी
दाट x विरळ
दीन x रात
दिवस x रात्र
दीर्घ x ऱ्हस्व
दुरित x सज्जन 
दुःख x सुख
दुष्काळ x सुकाळ
दुष्ट x सुष्ट
देशभक्त x देशद्रोही
देव x दानव, दैत्य
दृष्ट x सुष्ट   
दोषी x निर्दोषी, निर्दोष
द्वेष x प्रेम
धनवंत x निर्धन, कंगाल
धडधाकट x कमजोर
धर्म x अधर्म
धाडस x भित्रेपणा
धूसर x स्पष्ट
धिटाई x भित्रेपणा, भ्याडपणा
धीट x भित्रा
धूर्त x भोळा 
नफा x तोटा
नवे x जुने
नम्रता x उद्धटपणा
नाजूक x राठ 
निद्रा x जागृती
निर्मळ x मळकट
निमंत्रित x आगंतुक 
निंदा x स्तुती
निर्दयता x सहृदयता, सदयता
निर्बंध x मोकळीक
निर्जीव x सजीव
निराश x उत्साही
निःशस्त्र x शस्त्रधारी
निश्चित x अनिश्चित
निष्काम x सकाम 
निर्भय x भयभीत
नीती x अनीती
नीटनेटका x गबाळ्या
नोकर x मालक
नेहमी x क्वचित
नुकसान x फायदा
नेता x अनुयायी  
न्याय x अन्याय
पक्की x कच्ची
पडका x धडका
पराक्रमी x भित्रा
परका x स्वकीय
पहिला x शेवटचा
पलीकडे x अलीकडे
परवानगी x बंदी
प्रकाश x अंधार
प्रश्न x उत्तर
प्रामाणिकपणा x लबाडी
प्राचीन x अर्वाचीन
प्रेमळ x रागीट
प्रेम x द्वेष
प्रचंड x चिमुकला
प्रत्यक्ष x अप्रत्यक्ष
प्रतिकार x सहकार
प्रमाण x अप्रमाण
प्रगती x अधोगती 
पाप x पुण्य
पात्र x अप्रात्र
पायथा x शिखर
पांढरा x काळा
प्रारंभ x अंत
पुढची x मागची
पुष्कळ x थोडे
पूर्ण x अपूर्ण
पूर्व x पश्चिम
पौर्णिमा x अमावास्या
प्रिय x अप्रिय
फसवी x स्पष्ट  
फायदा x तोटा
फार x कमी
फुलणे x कोमेजणे
फुकट x विकत 
फिकट x गडद
बहुमान x अपमान
बरोबर x चूक 
बलाढ्य x कमजोर
बसणे x उठणे 
बंद x उघडा
बंधन x मुक्तता
बंडाळी x सुव्यवस्था
बाल x वृद्ध
बाहेर x आत
बिघात x दुरुस्ती 
बुद्धिमान x निर्बुद्ध
बुद्धिमान x ढ
बेसावध x सावध
बेसूर x सुरेल  
भडक x सौम्य
भरती x ओहोटी
भरभर x सावकाश
भले x बुरे
भक्कम x कमकुवत
भय x अभय
भयंकर x सौम्य
भयभीत x निर्भय
भव्य x चिमुकले
भसाडा x मंजुळ
भरती x आहोटी   
भान x बेभाम
भारतीय x अभारतीय
भाग्यवंत x दुर्भागी
भांडण x सलोखा
भिकारी x सावकार 
भूक x तहान
भूषण x दूषण
महान x क्षुद्र
मधुर x कडवट
महाल x झोपडी
मऊ x टणक 
मंद x प्रखर
मंजुळ x कर्कश
माता x पिता  
माथा x पायथा
माय x बाप
मालक x नोकर
मान x अपमान
माया x द्वेष
माघारा x सामोरा
मान्य x अमान्य 
म्हातारा x तरुण
मिटलेले x उघडलेले
मित्र x शत्रू
मैत्री x दुश्मनी
मोठा x लहान
मोकळे x बंदिस्त
मौन x बडबड
मृत्यू x जीवन
मृदू x कठीण
मुका x बोलका
मूर्ख x शहाणा 
यशस्वी x अयशस्वी
यश x अपयश 
याचक x दाता  
येईल x जाईल
योग्य x अयोग्य
रक्षक x मारक
रुडू x हसू
राग x लोभ
राजा x रंक 
रुचकर x बेचव
रूपवान x कुरूप
रेखीव x खडबडीत
रिकामे x भरलेले
रोड x सुदृढ
लहानपण x मोठेपण
लक्ष x दुलर्क्ष
लवकर x उशिरा
लबाड x भोळा
लबाडी x प्रामाणिकपणा
लय x प्रारंभ  
लक्ष x दुर्लक्ष
लाडके x नावडते
लांब x जवळ
लांबी x रुंदी
लेचापेचा x भक्कम
लोभी x निर्लोभी
वाकडे x सरळ
वापर x गैरवापर 
वृद्ध x तरुण
विचार x अविचार
विद्यार्थी x शिक्षक
विश्वास x अविश्वास
विलंब x त्वरा
विशेष x सामान्य
विद्वान x अडाणी
विष x अमृत
विरोध x पाठिंबा
विसरणे x आठवणे   
वेडा x शहाणा
वेगात x हळूहळू
व्यवस्थित x अव्यवस्थित 
शत्रू x मित्र
शहर x खेडे
शकून x अपशकून
शाप x वर
शंका x खात्री  
शेवट x सुरवात
श्वास x निःश्वास 
शिखर x पायथा
शिकारी x सावज
शिस्त x बेशिस्त 
शिक्षा x शाबाशकी
शीतल x उष्ण
शीत x अशीत
शक्य x अशक्य
शेंडा x बुडखा
शुद्ध x अशुद्ध
शूर x भित्रा   
श्रीमंत x गरीब
श्रेष्ठ x कनिष्ठ
सकाळ x संध्याकाळ
सज्जन x दुर्जन
सदाचार x दुराचार
सभ्य x असभ्य
सतर्क x बेसावध
सतेज x निस्तेज
समाधान x असमाधान
सरस x निरस
समान x असमान
समृद्धी x दारिद्र्य  
सत्य x असत्य
सरळ x वाकडा    
संवाद x विसंवाद
स्वच्छ x घाणेरडा
स्वतंत्र x परतंत्र
स्वस्थ x बेचैन
स्वहित x परमार्थ
स्वदेश x परदेश
स्तुती x निंदा
स्वस्त x महाग
स्वाधीन x पराधीन
स्वागत x निरोप 
स्वार्थ x परमार्थ
स्वार्थी x निःस्वार्थी
स्पष्ट x अस्पष्ट 
सावध x बेसावध
साहसी x भित्रा
सार्थ x व्यर्थ
साम्य x फरक
सान x थोर
सावकाश x पटकन
सार्वजनिक x खाजगी 
सानुली x मोठी
सामुदायिक x वैयक्तिक     
स्थिर x अस्थिर
सुप्रसिद्ध x कुप्रसिद्ध
सुरक्षित x असुरक्षित
सुख x दु:ख
सुटका x अटक
सुशिक्षित x अशिक्षित
सुगंध x दुर्गंध
सुंदर x कुरूप
सुदैवी x दुर्दैवी
सुरुवात x शेवट
सुभाषित x कुभाषित  
सूर्योदय x सूर्यास्त
सोपे x कठीण
सोय x गैरसोय
सौजन्य x उद्धटपणा
सेवक x मालक
हळू x जलद
हसणे x रडणे
हलके x जड
हजर x गैरहजर
हसतमुख x रडततोंड 
हार x जीत
हिम्मत x भय
हिंसक x अहिंसक
हिरमुसलेला x उत्साही
हित x अहित 
हिशेबी x बेहिशेबी
हीन x दर्जेदार
हुशार x मठ्ठ
होकार x नकार
क्षमा x शिक्षा
ज्ञान x अज्ञान

मंगळवार, ११ मार्च, २०१४

विश्व वंद्य भारता (vishv vandya bharata)

विश्ववंद्य भारता प्रणाम घे अनेकदा अनेकदा।।धृ।।
किरोट शोभतो शिरी, सुरेख दिव्य भव्य तो
मेखला कटीवरी, सुरम्य साज भासतो।।
सिंधू धन्य मानतो, पायधूळ संपदा
विश्ववंद्य भारता, प्रणाम घे अनेकदा अनेकदा।।१।।
गर्जना जगी तुझी, दुमदूमोनी राहिली
दुन्दुभि झरोनी कीर्ती, दूरवर गाजली।।
जाग ना पुन्हा तसा, पाहदेच एकदा
विश्ववंद्य भारता, प्रणाम घे अनेकदा अनेकदा।।२।।
वर्णहीन जाहले तुझे सवर्ण पाहुनी
स्तोत्र गाईले तुझे विनम्र दीन होऊनी।।
नेत्र दिपवी अपार दिव्य ज्ञान संपदा
विश्ववंद्य भारता, प्रणाम घे अनेकदा अनेकदा।।३।।
शौर्य तेज या बघा पहा कसे झकळते
त्याग प्रेम शांतता, इथेच मात्र नांदते।।
एक होऊनी करा खुशाल गर्जना सदा
विश्ववंद्य भारता, प्रणाम घे अनेकदा अनेकदा।।४।।

उंच उंच गगन हे

उंच उंच गगन हे आज पृथ्वीला मिळे
रंग रंग मिसळूनी, एक रंग हा जुळे।।
संपले उन्हातले ते अखंड चालणे
चालतो इथे आता, थंड थंड चांदणे
पाखरास हरवल्या, घर फिरून हे मिळे।।
सर्व सर्व एक ह्या जाहल्या दिश दिशा
एक आमुची उषा, एक आमुची निशा
शिशिर हि वसंत ही, आमुचे नये गळे।।
यापुढे न कोणीही, राहणार एकटे
पाश सर्व आमुचे तोलणार संकटे
आम्ही जिथे आसू तिथे,
नयन नयन ओखळे।।
असे जगू जया मुळे धन्य होय माय ती
असे मरू ज्यामुळे विश्व गायी आरती
सर्व नाथ हे जिथे अनाथ कोण राहिले।।

रविवार, ९ मार्च, २०१४

देवी शारदे माता (devi sharde mata)

देवी शारदे शारदे, नानाविद्या,
कलानिधे आम्हास ज्ञान दे।।धृ।।
विद्यादेवी तू जगजननी,
आम्ही बालके तव आज्ञानी
तुझ्या चिंतनी, स्तवनी,
भजनी आनंद लाभू दे।।१।।
तव तेजाची प्रसन्न किरणे,
आज उजळती तिन्ही भुवने
हीच आम्हास होवोत भूषणे,
आम्हास तेज दे।।२।।
देई नम्रता निर्मळ वाणी,
विद्या-धन-बल देई जननी
हेच मागणे तुझिया चरणी,
सुविचार सौख्य दे।।३।।

आईस..... (mother)

आईस.....
आई तुझ्या कुशीत
जन्मू दे तुझीच लेक
तुझ्यापरी मिळावा
मजला स्त्रीजन्म एक।।धृ।।
तू जन्मदात्री आई
झालीस का कठोर
उदरात वाढते मी
नको करूस वर
येणा-या तुझ्या मुलीची
तू ऐक आर्त हाक।।१।।
पुत्र हा वंश दिवा
मी तर एक पणती
विझवू नकोस मजला
उजळीलं सर्व नाती
कण्याच वंशवेल
तू मान ग नि:शंक।।२।।
मी सान पावलांनी
खेळील अंगणात
विद्या-कला गुणांनी
भूषविल या घरास
आदर्श थोर महिला
जगती मला अनेक।।३।।

स्वागतगीत..... (swagatagit git)

आज इथल्या थोरविला, चंदनाचा गंध आला,
वाळवंटाचा किनारा पाउलांनी धन्य झाला।।धृ।।
हीच माती पायरीची, ज्यावरी चढला तुम्ही
भाग्य अमुचे थोर झाले, आज अमुच्या जीवनी
भेट होता काळजाची, पंढरीचा योग आला।।१।।
रंगथेबाच्या सरीने, बोलकी झाली उषा
अंतरीच्या पाहुण्यांचा, दर्शनाने योग आला।।२।।

हर्षभराने करितो आम्ही (harshabharane karito aamhi)

हर्षभराने करितो आम्ही स्वागतम् स्वागतम्
सुंदर सरगम अर्पण करितो स्वागतम्(२)।।धृ।।
पुष्पसुगंधी गुंफुनी मला भावगीतांची हि स्वरमाला
अर्पण हे करितो आम्ही स्वागतम्।।१।।
स्वागत अपले पुष्प गुंफण्या गुरुजनांचा आदर करण्या
प्रार्थना हि करिता आम्ही स्वागतम्।।२।।

गर्जा जयजयकार (garja jayajaykar)

गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार
अनद्य वज्राचे छातीवरती घ्या झेलून प्रहार।।धृ।।
श्र्वासानों जा वायुसंगे ओलांडून भिंत
अन आईला कळला अमुच्या हृद्यातील खंत
सांगा वेडी तुझी मुले हि या अंधारात
बद्ध करांनी अखेरचा तुज करिती प्रणिपात
तुझ्या मुक्तीचे एकच होते वेड परी अनिवार।।१।।
कशास आई भिजवीशी डोळे उजळ तुझे भाल
रात्रीच्या गर्भात उद्याचा वसे उष:काल
सरणावरती आज आमुची पेटतच प्रेते
उठतील त्या ज्वालांतून भावी क्रीन्तीचे नेते
लोहदंड तव पाया मधले खळाखळा तुटणार।।२।।
आता कर ओकांर तांडव गिळावया घास
नाचत गर्जत टाक बळींच्या गळ्यावरी फास
रक्तमांस लुटण्यास गिधाडे येऊ देत क्रूर
पहा मोकळे केले आता त्यासाठी ऊर
शरीराचा कर सुखेनैव या सुखेनैव संहार।।३।।
कुसुमाग्रज

शुक्रवार, ७ मार्च, २०१४

मराठी बाराखडी (marathi barakhadi)

मराठी  मुळाक्षरे
अ आ इ ई उ ऊ ऋ ए ऐ ओ औ अं अः क ख ग घ ङ च छ ज झ ञ ट ठ ड ढ ण त थ द ध न प फ ब भ म य र ल व श ष स ह ळ क्ष ज्ञ  

स्वर 
अ आ इ ई उ ऊ ऋ ए ऐ ओ औ अं अः

व्यंजन
क ख ग घ ङ च छ ज झ ञ ट ठ ड ढ ण त थ द ध न
प फ ब भ म य र ल व श ष स ह ळ क्ष ज्ञ  

मराठी बाराखडी
क  का  कि  की  कु  कू  के  कै  को  कौ  कं  कः
ख  खा  खि  खी  खु  खू  खे  खै  खो  खौ  खं  खाः 
ग  गा  गि  गी  गु  गू  गे  गै  गो  गौ  गं  गः 
घ  घा  घि  घी  घु  घू  घे  घै  घो  घौ  घं  घः 
ङ  ङा  ङि  ङी  ङु  ङू  ङे  ङै  ङो  ङौ  ङं  ङः
च  चा  चि  ची  चु  चू  चे  चै  चो  चौ  चं  चः
छ  छा  छि  छी  छु  छू  छे  छै  छो  छौ  छं  छः   
ज  जा  जि  जी  जु  जू  जे  जै  जो  जौ  जं  जः
झ  झा  झि  झी  झु  झू  झे  झै  झो  झौ  झं  झः
ञ  ञा  ञि  ञी  ञु  ञू  ञे  ञै  ञो  ञौ  ञं  ञः
ट  टा  टि  टी  टु  टू  टे  टै  टो  टौ  टं  टः
ठ  ठा  ठि  ठी  ठु  ठू  ठे  ठै  ठो  ठौ  ठं  ठः 
ड  डा  डि  डी  डु  डू  डे  डै  डो  डौ  डं  डः
ढ  ढा  ढि  ढी  ढु  ढू  ढे  ढै  ढो  ढौ  ढं  ढः    
ण  णा  णि  णी  णु  णू  णे  णै  णो  णौ  णं  णः 
त  ता  ति  ती  तु  तू  ते  तै  तो  तौ  तं  तः
थ  था  थि  थी  थु  थू  थे  थै  थो  थौ  थं  थः
द  दा  दि  दी  दु  दू  दे  दै  दो  दौ  दं  दः 
ध  धा  धि  धी  धु  धू  धे  धै  धो  धौ  धं  धः  
न  ना  नि  नी  नु  नू  ने  नै  नो  नौ  नं  नः 
प  पा  पि  पी  पु  पू  पे  पै  पो  पौ  पं  पः
फ  फा  फि  फी  फु  फू  फे  फै  फो  फौ  फं  फः
ब  बा  बि  बी  बु  बू  बे  बै  बो  बौ  बं  बः
भ  भा  भि  भी  भु  भू  भे  भै  भो  भौ  भं  भः
म  मा  मि  मी  मु  मू  मे  मै  मो  मौ  मं  मः
य  या  यि  यी  यु  यू  ये  यै  यो  यौ  यं  यः 
र  रा  रि  री  रु  रू  रे  रै  रो  रौ  रं  रः 
ल  ला  लि  ली  लु  लू  ले  लै  लो  लौ  लं  लः
व  वा  वि  वी  वु  वू  वे  वै  वो  वौ  वं  वः
श  शा  शि  शी  शु  शू  शे  शै  शो  शौ  शं  शः
ष  षा  षि  षी  षु  षू  षे  षै  षो  षौ  षं  षः 
स  सा  सि  सी  सु  सू  से  सै  सो  सौ  सं  सः
ह  हा  हि  ही  हु  हू  हे  है  हो  हौ  हं  हः
ळ  ळा  ळि  ळी  ळु  ळू  ळे  ळै  ळो  ळौ  ळं  ळः
क्ष  क्षा  क्षि  क्षी  क्षु  क्षू  क्षे  क्षै  क्षो  क्षौ  क्षं  क्षः
ज्ञ  ज्ञा  ज्ञि  ज्ञी  ज्ञु  ज्ञू  ज्ञे  ज्ञै  ज्ञो  ज्ञौ  ज्ञं  ज्ञः

शब्द
दोन किंवा आधिक अक्षरांना एकत्र आणल्यानंतर त्यांचे एकत्र वाचन अथवा उच्चार केल्यास त्यांच्यापासून कशाचा तरी अर्थबोध होतो. अशा अक्षरांच्या समूहाला शब्द म्हणतात.
ब + घ = बघ

वाक्य
दोन किंवा दोनपेक्षा आधिक शब्द जवळ आणल्यानंतर वाक्य तयार होते.

काना     ा    
वेलांटी     ि ी     र्हस्व, दीर्घ
उकार    ु ू     र्हस्व, दीर्घ
मात्रा    े ै     एक, दोन
काना आणि मात्रा     ो ौ     एक, दोन
अनुस्वार     ं    
विसर्ग     ः 

तीर्थमध्ये काशी - व्रतामध्ये एकादशी भाषांमध्ये तशी - मराठी शोभिवंत

भाषेचा उत्कर्ष म्हणजे समाजाचा उत्कर्ष आणि भाषेचा ह्रास म्हणजे समाजाचा ह्रास

दोन किंवा आधिक अक्षरांना एकत्र आणल्यानंतर त्यांचे अकत्र वाचन अथवा उच्चार केल्यास त्यांच्यापासून कशाचा अर्थबोध होतो. अशा अक्षरांच्या समूहाला शब्द म्हणतात.

कोणत्याही व्यंजनात ओ हा स्वर मिळविण्यासाठी ो हे चिन्ह वापरतात; याला एक काना व एक मात्रा म्हणतात.

कोणत्याही व्यंजनात औ हा स्वर मिळविण्यासाठी ौ हे चिन्ह वापरतात; याला एक काना व दोन मात्रा म्हणतात.

कोणत्याही व्यंजनात अं हा स्वर मिळविण्यासाठी ं हे चिन्ह वापरतात; याला अनुस्वार म्हणतात.

कोणत्याही व्यंजनात उ हा स्वर मिळविण्यासाठी ु हे चिन्ह वापरतात; याला पहेली उकार म्हणतात.

कोणत्याही व्यंजनात ऊ हा स्वर मिळविण्यासाठी ू हे चिन्ह वापरतात; याला दुसरी उकार म्हणतात.

कोणत्याही व्यंजनात इ हा स्वर मिळविण्यासाठी ि हे चिन्ह वापरतात; याला पहेली वेलांटी म्हणतात.

कोणत्याही व्यंजनात ई हा स्वर मिळविण्यासाठी ी हे चिन्ह वापरतात; याला दुसरी वेलांटी म्हणतात.

आ हा स्वरसाठी ा याला काना म्हणतात.