Advertisement

बुधवार, ३० जुलै, २०१४

लाला लजपतराय

पंजाबचा सिंह' असे लोक ज्यांना अभिमानाने म्हणत त्या सिंहासारख्याच शूर असणाऱ्या लाला लजपतराय यांचा जन्म २८ जानेवारी, १८६५ रोजी पंजाबातील लुधियाना येथील जगराव या गावी झाला. त्यांचे वडील राधाकृष्ण हे शिक्षक, लेखक होते. आपल्याप्रमाणे लालादेखील समाजसेवी व्हावा असे त्यांना वाटे.
लालाजी कायद्याचे परीक्षा देऊन निष्णात वकील झाले. त्या काळात शाळांतून दिले जाणारे साचेबंद शिक्षण त्यांना पसंत नव्हते. त्यांनी मित्रांसमवेत लाहोरमध्ये 'दयानंद अँग्लो वैदिक कॉलेज' काढले. शाळा उघडल्या. भारतीय संस्कृतीची ओळख व देशप्रेम वाढेल असे शाळा-कॉलेजांमधून उपक्रम राबविले. चारित्र्यवान राजकीय कार्यकर्ते घडविण्याच्या उद्देश्याने 'टिळक स्कूल ऑफ पॉलिटिक्स' ही संस्था त्यांनी स्थापन केली होती. लालाजी जहाल विचारांचे होते. 'वंदे मातरम्' या दैनिकातून व 'पंजाबी' या त्यांच्या वृत्तपत्रातून त्यांनी क्रांतिकारी लेखन करून लोकजागृतीचे कार्य केले.
१९०५ साली सरकारने केलेल्या बंगालच्या फाळणीमुळे पंजाब आणि सर्व देश असंतोषाने पेटून उठला. याला लाला लजपतराय यांचा पाठिंबा होता हे इंग्रज सरकारने ओळखले होते. त्यातच पंजाबात इंग्रजांनी दडपशाही सुरू केली. हे पाहून लालाजींनी १९०७ मध्ये शेतकऱ्यांची संघटना निर्माण करून चळवळ आरंभली. या सरकारविरोधी धोरणामुळे सरकारने त्यांना हद्दपार करून मंडाले येथील तुरुंगात पाठवले.
मंडालेच्या कारावासात १८ महिने काढून परतल्यानंतर त्यांनी राष्ट्रीय चळवळीस वाहून घेतले. लो.टिळक, त्रिमूर्ती स्वातंत्र्य लढ्यातील अग्रणी म्हणून ओळखली जाऊ लागली.
१९१४ सालामध्ये लालाजी इंग्लंड, जपान, अमेरिका येथे गेले. तिथल्या वास्तव्यात अनेक लेख प्रसिध्द करून भारताची बाजू जगापुढे त्यांनी मांडली. 'इंडियन होमरूल लीग' ची स्थापना केली. तेथून लालाजी भारतात परतले तेव्हा क्राँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. 'आयटक' या कामगार अधिवेशनाचेही ते अध्यक्ष होते. लालाजींनी 'महान अशोक', 'श्रीकृष्ण व त्याची शिकवण', 'छत्रपती शिवाजी', 'मॅझिनी', 'गॅरिबॉल्डी', 'यंग इंडिया' इत्यादी पुस्तके लिहिली.
ब्रिटिश सरकारने १९२८ साली हिंदुस्थानच्या राज्यकारभारात सुधारणा घडवून आणण्यासाठी एक कमिशन नेमले होते, त्याचे अध्यक्ष होते 'सायमन'. या मंडळामध्ये एकही हिंदी सभासद न घेतल्यामुळे गांधीजींनी या सायमन मंडळावर बहिष्कार घालण्याचा आदेश दिला. लाहोर येथील मोर्चाचे नेतृत्व करीत होते लाला लजपतराय! 'सायमन परत जा' या घोषणांनी शहर दुमदुमले. याचवेळी गोऱ्या अधिकाऱ्यांनी लालाजींसह सर्वांवर लाठीहल्ला सुरू केला. त्यावेळी लालाजी गरजले, ''माझ्या छातीवरचे हे घाव तुमच्या सत्तेवर पडून सत्ता उलथून टाकणार आहेत!'' याच लाठीमाराने जीवघेणी दुखापत होऊन या पंजाबकेसारीचे १७ नोव्हेंबर १९२८ रोजी निधन झाले.

रविवार, २७ जुलै, २०१४

संयुक्त राष्ट्र दिन (युनो दिन)

राष्ट्राराष्ट्रात भांडणतंटे होऊन दुसऱ्या महायुद्धाप्रमाणे नवनव्या संहारक शास्त्रास्त्रांचा पुन्हा वापर झाला तर अखिल मानवाजात नष्ट होईल व जगाचा नाश होईल अशा भीतीने आशावादी अशा काही ५० राष्ट्रांनी सनफ्रान्सिस्को शहरी संयुक्त राष्ट्राच्या सनदेवर सह्या केल्या. युद्धाप्रमाणेच उपासमार, रोगराई, लोकसंख्या, नैसर्गिक आपत्ती, वर्णभेद, अस्पृश्यता, स्त्री-पुरुष विषमता इत्यादी प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी, दि. २४ ऑक्टोबर १९४५ रोजी 'संयुक्त राष्ट्रे' ही संघटना जागतिक पातळीवर कार्यरत झाली.
 
युक्ताच्या भीषण संकटापासून वाचविणे किंबहुना युद्धच होऊ नये आणि शांततामय मार्गाने राष्ट्रांनी आपला विकास साधावा हे संयुक्त राष्ट्राचे उद्दिष्ट आहे. शिवाय परतंत्र राष्ट्रांना स्वातंत्र्य मिळवून देण्यास मदत करणे, जगातील स्त्री-पुरुषांना मानवी हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणे ही सुद्धा संघटनेची उद्दिष्टे आहेत. राष्ट्राराष्ट्रातील तणाव व संघार्षांवर उपाय शोधून युध्द टाळण्यासाठी 'संयुक्त राष्ट्रे' प्रयत्न करतात. सारे प्रयत्न असफल झाले तर युद्धात गुंतलेल्या राष्ट्रांना युद्धबंदीचे आवाहन संयुक्त राष्ट्रे करतात. सदस्य राष्ट्रांनी निर्माण केलेली 'शांतिसेना' त्या ठिकाणी शांतता रक्षणाचे कार्य करते.

जगात शांतता नांदावी, सहकार्य व मैत्रीचे संबंध निर्माण व्हावेत यासाठीची कार्ये पार पाडण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघटनेचे काही प्रमुख घटक कार्यरत आहेत. संयुक्त राष्ट्राची 'आमसभा' राष्ट्रांमधील वाद, गरिबी, लोकसंख्यावाढ, विषमता, निरक्षरता इत्यादी प्रश्न सोडविण्याबाबत मार्गदर्शन करते. 'आर्थिक सामाजिक परिषदही' वर्णभेद, निरक्षरता शिक्षण, आरोग्य, बालकल्याण उपासमार गरिबी इत्यादी जागतिक प्रश्नांवर उपाययोजना सुचवते.

राष्ट्राराष्ट्रांतील वाद मिटवण्यासाठी जागतिक पातळीवरील एक 'आंतरराष्ट्रीय न्यायालय' नेदरलँडस् मधील 'द हेग' या शहरी आहे. संयुक्त राष्ट्रांचा कारभार सांभाळणारे 'सचिवालय' हे मुख्य कार्यालय 'न्यूयॉर्क' शहरात आहे. याप्रमाणे संयुक्त राष्ट्रांनी काही विशेष संस्था स्थापन केलेल्या आहेत. शिक्षण, विज्ञान, संस्कृती क्षेत्रासाठी 'युनेस्को' ही संस्था मार्गदर्शन करते. आरोग्यसुविधा व विविध साथी, रोग प्रतिबंधक उपाययोजना 'जागतिक आरोग्य संघटना' करते. लहान मुलांना शिक्षण, सोयी व शालेय मुलांना पौष्टिक आहार व शिक्षण साहित्य पुरवण्याचे कार्य 'युनिसेफ' ही संस्था पाहते. 'आंतरराष्ट्रीय कामगार संघटना' जगातील कामगारांच्या प्रश्नांवर उपाय सुचवते. अशा 'युनो' च्या बऱ्याच संस्था व त्यांच्या शाखा जगभर कार्यरत आहेत.

जगात काही राष्ट्रे खूप श्रीमंत तर काही गरीब आहेत. इंग्लंड, अमेरिका, जपानसारख्या प्रगत राष्ट्रांनी इथिओपिया, नेपाळ इत्यादी गरीब राष्ट्रांना मदत करावी यासाठी संयुक्त राष्ट्रे प्रयत्न करतात. संयुक्त राष्ट्रे ही अनेक राष्ट्रांची संघटना आहे. आंतराष्ट्रीय प्रश्न व मतभेद, युद्ध न करता शांततेच्या मार्गाने सोडविण्यासाठी या संघटनेची स्थापना झाली. युनोच्या हा बहुविध कार्याची सर्वांस ओळख होण्यासाठी हा संयुक्त राष्ट्रदिन जगभर साजरा जातो.

शनिवार, २६ जुलै, २०१४

नागपंचमी

पावसाच्या लपंडाव खेळणाऱ्या सरी _____ सोनपिवळ्या ऊन्हाच्या मधूनच लकाकणाऱ्या लडी आणि हिरवे-हिरवे गार गालिचे लपेटलेली धरती _____ अशा उत्सवांची झुंबड घेऊन येणाऱ्या श्रावण महिन्यातील पहिलाच सण म्हणजे शुद्धपंचमीला येणारी नागपंचमी! भगवान शंकराच्या गळ्यात आणि मस्तकावर नाग आहे. विष्णू हा तर 'शेषनागावर' प्रत्यक्ष शयन करतो. म्हणून या दोन्ही देवतांच्या पूजाविधीत नागपूजाही महत्त्वाची समजली जाते. वासुदेव 'बाळ' कृष्णाला मथुरेतून गोकुळाकडे नेत होता, तेव्हा पाऊस लागू नये म्हणून नागाने फणा उभारून कृष्णाचे संरक्षण केले तर यमुनेच्या डोहातील कालिया सर्पाची पुरी खोड मोडून कृष्ण नागाच्या फण्यावरुन सुखरूप वर आला, हे पाहून सर्पानेच कृष्णाचे रक्षण केले असे सर्वांना वाटले. त्याप्रीत्यर्थ नागराजाची पूजा झाली ती श्रावणपंचमीला.
हा मुख्य म्हणजे स्त्रियांचा सन! खूप खूप खेळण्याचा, नाचण्या बागडण्याचा, एकत्र येण्याचा हा सण. या दिवशी चुलीवर तवा ठेवायचा नाही, केस विंचरायचे नाहीत, काही तळायचे नाही. चिरायचे नाही, भांडणे टाळायची तर सासरच्या मुली माहेरी आवर्जून आणायच्या हा प्रघात आहे.
नागपंचमीच्या दिवशी मातीच्या नागाची वा चित्राची दुर्वा, फुले, दूध, लाह्या वाहून पूजा करतात. काहीजण टोपलीतल्या खऱ्या नागाची दूध वाहून पूजा करतात. खेडेगावी तर शेतातल्या वारुळांची गाणी म्हणत बायका मुली पूजा करतात व म्हणतात.
'चल ग सये वारुळाला, पुजायाला नागोबाला!' महाराष्ट्रात बत्तीस शिराळा येथील शेतकरी दरवर्षी शेकडो नाग पकडून त्यांची पूजा करतात व पुन्हा सुखरूपपणे शेतात सोडून देतात. शेतातील पिकांचे नुकसान करणाऱ्या उंदरांना खाऊन नाग शेतकऱ्यांचा मित्र बनला आहे. पण नागपुजेच्या दिवशीच नागांची मोठ्या प्रमणात हत्या सुरू झाली आहे. त्याचे विषारी दात पडणे, तोंड शिवणे, नाग, सर्पांची कातडी विकणे इ. क्रूर प्रकार पर्यावरणाचा समतोल ढासळण्यास मदत करीत आहेत. नागाचे भक्ष्य उंदीर, बेडूक! तरीही दुधाने त्याला पुजून आपण बधिरता आणतो. नाग पुंगीच्या आवाजाने नाही तर हलणाऱ्या वस्तूकडे पाहून फणा हलवतो. नाग डुख धरतो हे खरे नाही.
साप बदला घेऊ शकत नाही. घडलेल्या गोष्टींची स्मृती राहील अशा प्रकारची योजना सापाच्या मेंदूत नाही.भारतात सापाच्या सुमारे २५० जाती आहेत. यापैकी सुमारे पन्नास एक जातीच विषारी आहेत. उदा. नाग, बंगारस, घोणस, फुरसे वगैरे. बिनविषारी सापांमुळे धोका नसतो पण तो ओळखू न-आल्यामुळे साप म्हणजे विषारीच व त्याचा दंश म्हणजे मृत्यूच! म्हणून तो ठेचलाच जावा ह्या विचारात बदल व्हायला हवा. आजकाल सर्व विषावर प्रतिविष उपलब्ध आहे. तेव्हा मांत्रिकांचा सल्ला न घेता सर्पदंशावर डॉक्टरांचाच सल्ला घ्यावा. निसर्गात संतुलन राखणाऱ्या सर्पांच्या संरक्षणासाठी पर्यावरणवादी आता 'सर्प उद्याने' विकसित करीत आहेत. म्हणून आपणही 'सर्पमित्र' होऊया!

बुधवार, २३ जुलै, २०१४

स्वातंत्र्य दिन

सातासमुद्रापलीकडून व्यापाराच्या निमित्ताने आलेल्या इंग्रजांनी भारतात आपले साम्राज्य उभारले आणि दीडशे वर्षांच्या गुलामगिरीच्या वरवंट्याखाली आपण भरडत राहिलो. पण भारतातील थोर देशभक्तांनी भारतमातेच्या हातापायातील गुलामगिरीच्या साखळ्या प्राणांचे, सर्वस्वाचे बलिदान अर्पून तोडल्या तेव्हा आपला देश १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला. १४ ऑगस्टच्या मध्यरात्री पं. नेहरू हर्षाने म्हणाले, ''मध्यरात्री बारा वाजता सारे जग निद्रिस्त असताना भारताने नवचैतन्याने जागृत होऊन स्वातंत्र्य संपादन केले.....! स्वातंत्र्याचा जयजयकार भारतखंडाच्या कानाकोपऱ्यातून दुमदुमू लागला. 'मी आता तुमच्यातील एक' अशी लॉर्ड माऊंटबटॅनने घोषणा केली. भारताच्या राजधानीत एकवीस तोफांची सलामी घुमली. संसदभवनावर 'युनियन जॅक' ऐवजी 'तिरंगा' फडकविण्यात आला आणि साऱ्या भारतात आनंदाचे सोहळे सुरू झाले.
मूठभर इंग्रजांनी आपला देश कसा बळकावला? दीडशे वर्षे राज्य कसे केले? भारतातील कमकुवत राजसत्तांचा, विखुरलेल्या राज्यांचा, संस्थानिकांचा व त्याच्यातील स्वार्थी, फुटीर वृत्तींचा धूर्तपणे फायदा इंग्रजांनी घेऊन सारा देश पादाक्रांत केला. जबरदस्त शेतसारा बसवून, पैसा वापरून इंग्लंडला संपन्न केले व भारत द्ररिद्री बनला. १८५७ च्या उठावात राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे, कुंवरसिंह इत्यादी धारातीर्थी पडले तर लाल-बाळ-पाल आणि नेहरू, गांधीनी अहिंसा तत्त्वाने, असहकार चळवळींनी इंग्रजांशी सामना केला. वासुदेव फडके, चाफेकर बंधू, खुदीराम बोस, कान्हेरे, धिंग्रा, सावरकर यांनी सशस्त्र क्रांतीचा मार्ग स्वीकारून इंग्रजांना जेरीस आणले. देशासाठी देशभक्त हसत फासावर गेले. आझाद, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांनी वीरमरण पत्करले तर १९४२ च्या लढ्यात गांधीजी, मौलाना आझाद, पटेल, नेहरू, जयप्रकाश, लोहिया इत्यादींनी यातनामय तुरुंगवास भोगले. शिरीषकुमार, बाबू गेनू उषा मेहता, अरुणा असफअली इत्यादींनी 'करेंगे या मरेंगे' निर्धाराने अपूर्व पराक्रम गाजवला. सुभाषबाबूंच्या 'आझाद हिंद सेने' नेही अभूतपूर्व कामगिरी केली.
विषमतेने व दुष्ट चालीरीतींनी पोखरलेल्या भारतीय समाजाला जागृत करण्यासाठी आयुष्य खर्चणारे राजा राममोहन रॉय, विद्यासागर, लोकहितवादी, दयानंद सरस्वती, म. फुले, न्या, रानडे, आगरकर, स्वामी विवेकानंद यांनीही समाजाला नवे विचार, नवी दृष्टी दिली. या सर्वांच्या बलिदानाने, हालअपेष्टांनी, खडतर प्रयत्नांनी दि. १५ ऑगस्ट १९४७ चा स्वातंत्र्यसूर्य उगवला, लाभला. परकीय आक्रमणाबरोबरच देशातील काही गंभीर समस्या, संकटे आपल्यापुढे आ वासून उभी आहेत त्यांच्याशी सामना करण्यासाठी या दिवशी आपण कटिबध्द होऊया! अजून आपल्या देशाला निरक्षरता, अंधश्रद्धा, भरमसाट लोकसंख्या, बेकारी, महागाई, भ्रष्टाचार, विविध रोगराई निवारण्यासाठी प्रत्येकाने केले पाहिजेत. मला देशाने काहीतरी द्यावे ही अपेक्षा न करता मी देशाला काय देऊ शकतो, याचा विचार करून देशासाठी प्रसंगी प्राण अर्पण करण्याची आपण तयारी ठेवली पाहिजे.

रविवार, २० जुलै, २०१४

संस्कृत भाषा दिवस

संस्कृत भाषा मातृभाषेला सर्व दृष्ट्या पोषक आणि संस्कारक्षम आहे. मातृभाषेच्या शुद्धीसाठी, वृद्धीसाठी व जीवनमूल्ये जोपासण्यासाठी आणि संस्कारांसाठी संस्कृत भाषेचे अध्ययन आवश्यक झाले आहे. संस्कृत भाषेमध्ये सुभाषितांचा फार मोठा साठा आहे. एकेक सुभाषित म्हणजे सूत्ररुपाने, अर्करूपाने सांगितलेला एक उत्तम विचारकण आणि एक उत्तम जीवनमूल्यच होय. बालपणी अर्थ समजून पाठ केलेली सुभाषिते मोठेपणी जीवनपथावर मार्गदर्शक ठरतात. निराश, भग्न मनाला स्फूर्ती देतात. सर्वांना सुसंस्कृत करणारी अशी संस्कृत भाषा वैभवपूर्ण आहे. जगातील पहिले वाड्मय म्हणून ज्या वेदांचा गौरव करण्यात येतो ते वेद, उपनिषदे, ऋचा, प्रार्थनासूक्ते, मंत्र-स्तोत्रे ही संस्कृत भाषेतच लिहिलेली आहेत. भारताने संपूर्ण विश्वालाच संस्कृत भाषेतील ज्ञानभांडाराची देणगी दिलेली आहे. जर्मन माणसांना संस्कृतची महती समजली व त्यांनीच पहिले वेदांचे भाषांतर केले. ज्ञानदेवाच्या ज्ञानेश्वरीच्या ज्ञानेश्वरीच्या निरुपणाला दृष्टांत-दाखल्यांना संस्कृत भाषेनेच भूषविले आहे. 'भाषासु मुख्य मधुरा दिव्या गीर्वाण भारती' अशी ही भाषा सर्व प्राणीमात्रांच्या सौख्यासाठी झटणारी आहे. संस्कृत गीतांमध्ये तालबद्धता, गेयता, लालित्य हे गुण आहेतच शिवाय राष्ट्रीय एकात्मता, सर्वधर्मसमभाव, निसर्गप्रेम, राष्ट्रप्रेम इत्यादी जीवनमूल्यांचा आविष्कार आढळतो. त्याचप्रमाणे त्याग, प्रेम, निष्ठा, बंधुता, मानवता यांचे संस्कारही संस्कृत भाषा करते आहे.
आजच्या विज्ञान युगात यंत्राची निर्मिती करताना मनुष्यच भावनाशून्य, संस्कारविहीन 'यंत्र' च बनून गेला आहे! वैज्ञानिक बौद्धिक प्रगती साधताना हार्दिक प्रगती आहे का? भौतिक सुखांच्या श्रीमंतीत मनुष्य लोळू लागला पण हृदयातील श्रीमंती गमावून बसला आहे. सर्व सुखे दाराशी असताना स्वास्थ्य समाधानाला तो पारखा झाला आहे. यासाठी 'कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन', 'योगः कर्मसु कौशलम्', 'न धैर्यसमं बल', 'आचारः परमो धर्मः' यांसारख्या संस्कृतमधील विचारधनांची गरज आहे.  मनुष्याचे खरे धन पैसा, संपत्ती, दागदागिने, मालमत्ता नसून; त्याचे चारित्र्य, परोपकारिता, कीर्ती, सदाचार हे आहे, हे संस्कृत भाषाध्ययनाने समजते.
'महाभारत' आणि 'रामायण' ही महाकाव्ये इ.स. पूर्व ३०० ते इ.स. ३०० या काळात संस्कृतमध्ये रचली गेली. महाभारत हे मूळच्या 'जय' या व्यासमुनी लिखित ग्रंथाचे विस्तारित रूप आहे. त्याचप्रमाणे श्रीकृष्णाचे सांगितलेली भगवद्-गीता, कालिदासाचे मेघदूत, अभिज्ञान शांकुतल, रघुवंश, कुमारवंश इ. ग्रंथ संस्कृमध्ये लिहिले. तसेच गुप्तकालीन भारतामध्ये प्रसिद्ध असलेल्या नालंदा, पैठण, वलभी, कांची, वाराणसी इ. विद्यापीठांमध्ये संस्कृत भाषेलाच प्राधान्य होते. त्यावेळेच्या खगोल, वैद्यक, गणित शास्त्रज्ञांनी संस्कृतमधूनच ग्रंथ लिहिले. अशी ही भारताची
    भाषासु मुख्य मधुरा दिव्य गीर्वाणभारती।
    तस्यां हि मधुरं काव्यं तस्मादपि सुभाषितम्।।

भाषांमध्ये मुख्य, दिव्य अशी गीर्वाणभारती (संस्कृत भाषा) आहे. तिच्यातील काव्य मधुर असून सुभाषित अधिक मधुर आहे. अशी ही संस्कृतभाषा वाणी आणि मनाला समृध्द करणारी आहे.
प्रतिष्ठा उंचावणारी भाषा देशाचा एक अमोल ठेवा आहे. म्हणूनच आजच्या शालेय स्तरावर संस्कृत श्लोक, सुभाषिते, गोष्टी, गाणी यांच्या पाठांतर, वक्तृत्व स्पर्धा या दिवशी घेतल्या जातात.

गुरुवार, १७ जुलै, २०१४

बाळ गंगाधर टिळक

आपले सारे आयुष्य देशकार्यासाठी वाहून घेणाऱ्या लोकमान्य टिळकांचा जन्म २३ जुलै, १८५६ रोजी रत्त्नागिरी जिल्ह्यातील चिखलगाव या गावी झाला. त्यांचे पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक, त्यांच्या राष्ट्रीय व सामाजिक कार्यामुळे जनतेने त्यांना 'लोकमान्य' ही पदवी दिली होती. आईचे नाव पार्वतीबाई होते तर वडील गंगाधरपंत हे संस्कृत पंडित आणि गणितज्ञ होते. त्यामुळेच टिळकांनीही संस्कृत, गणित विषयांमध्ये प्रभुत्व मिळविले. टिळक पुण्याला कॉलेज शिक्षणासाठी आले तेव्हा त्यांच्या किरकोळ शरीरयष्टीकडे मित्र त्यांची चेष्टा करत. मग मात्र सुदृढ प्रकृती होण्यासाठी टिळकांनी एक वर्ष अभ्यास बाजूला ठेऊन व्यायाम केला. या दणकट प्रकृतीमुळेच त्यांनी देशसेवा करताना शारीरिक कष्टांना हसत तोंड दिले.
आपला देश संपन्न व संस्कृती महान असून इंग्रजांच्या गुलामगिरीत का? आपला समाज मागे का? असे टिळकांना प्रश्न पडून लोकजागृती करण्यासाठी आपले आयुष्य खर्च करण्याचा त्यांनी निश्चय केला. आगरकर, चिपळूणकरांच्या मदतीने टिळकांनी पुण्यात 'न्यू इंग्लिश स्कूल' सुरू केले व फर्ग्युसन कॉलेज काढले.
लोकशिक्षणासाठी टिळकांनी 'केसरी' व 'मराठा' वर्तमानपत्रे सुरू करून त्यातून इंग्रज सरकारविरूध्द लेख लिहिले व लोकांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून दिली. त्याचप्रमाणे सार्वजनिक गेणेशोत्सव व शिवजयंती उत्सव सुरू करून देशभक्तीपर व्याख्याने व गाण्यातून लोकांना स्वराज्य मिळविण्याची स्फूर्ती दिली. टिळक इंग्रजांविरुद्ध असंतोष निर्माण करीत होते म्हणून इंग्रजांनी त्यांना 'असंतोषाचे जनक' ठरवले.
१९ व्या शतकाच्या अखेरीस प्लेग व दुष्काळात सापडलेल्या जनतेला टिळकांनी गावोगावी जाऊन धीर दिला, मदत केली, त्यावेळी सरकारी अधिकाऱ्यांच्या अत्याचाराचा धिक्कार केला. स्वातंत्र्य लढ्याला सूत्रबद्धता यावी म्हणून स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण असा चौपदरी कार्यक्रम आखला. परदेशी मालाच्या होळ्या पेटल्या. देशभर असंतोषाचा डोंब उसळला. टिळकांवर राजद्रोहाचा आरोप ठेवून १९०८ साली सहा वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली. ब्रह्मदेशातील मंडाले येथील तुरुंगात त्यांना ठेवले गेले. तेथे टिळकांनी 'गीतारहस्य' नावाचा ग्रंथ लिहिला. तेथील सुटकेनंतर त्यांनी अॅनी बेझंट यांच्याबरोबर 'होमरुल चळवळ' सुरू केली. 'स्वराज्य माझा जन्मसिध्द हक्क आहे आणि तो मी मिळवणारच!' अशी घोषणा केली. हिंदु-मुस्लिम एकजुटीसाठी त्यांनी 'लखनौ करार' घडवून आणला. कामकरी व बहुजन वर्गास संघटित करणारे ते तेल्या तांबोळ्यांचे पुढारी झाले.
टिळक विवेकनिष्ठ व विचारी तत्त्वज्ञ होते. 'ओरायन' व 'आर्क्टिक होम इन द वेदाज्' हे ग्रंथ त्यांनी लिहिले. एक शास्त्रशुध्द पंचांगही सुरू केले. अशा प्रकारे लोकसेवेचे व स्वातंत्र्यलढ्याचे व्रत आयुष्यभर चालविणाऱ्या पहाडांसारख्या टिळकांचे १ ऑगस्ट, १९२० रोजी मुंबईत देहावसान झाले.

मंगळवार, १५ जुलै, २०१४

नेताजी सुभाषचंद्र बोस

कोणत्याही राष्ट्रीय कार्यक्रमात आपण सारे भारतीय एकदिलाने 'जय हिंद' ही घोषणा करत असतो. ही घोषणा आपल्याला दिली आहे आपले नेते सुभासाचंद्र बोस यांनी.
२३ जानेवारी १८९६ मध्ये बंगालमधील कटक या गावात, एका सुखवस्तू घरात सुभाषचंद्रांचा जन्म झाला. लहानपणापासून त्यांची बुद्धी तल्लख होती. कॉलेजात गेल्यावर त्यांनी तेथील विद्यार्थ्यांचे नेतृत्व स्वीकारले. अन्याय व अपमान यांविरुद्ध त्यांनी बंड पुकारले. आय्.सी.एस्. परीक्षा उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाल्यावरही ब्रिटिश साम्राज्याशी विश्वासपात्र राहण्याची शपथ घेण्यास त्यांनी नकार दिला आणि शासकीय सन्मानापासून ते सदैव दूर राहिले.
नंतर राष्ट्रीय आंदोलनात सहभागी झाल्यावर त्यांना अनेकदा कारावास सहन करावा लागला. एकदा ते अखिल भारतीय कॉंग्रेसचे अध्यक्षही झाले; पण मतभेद झाल्यावर कॉंग्रेसमधून बाहेर पडून त्यांनी 'फॉरवर्ड-ब्लॉक' नावाची संघटना सुरू केली. सन १९४१ मध्ये स्वतःच्या घरात स्थानबद्ध असतानाच सुभाषबाबू गुप्तपणे भारताच्या बाहेर पडले. अनेक हालअपेष्टा सोसत ते जर्मनीला पोहोचले. तेथून पुढे पाणबुडीने प्रवास करत ते जपानला पोहोचले. ब्रिटिशांच्या सैन्यात असलेले अनेक भारतीय सैनिक जपान्यांच्या कैदेत होते. त्यांच्याशी संपर्क साधून सुभाषबाबूंनी १९४३ च्या ऑगस्टमध्ये 'आझाद हिंद सेना' निर्माण केली. त्यांनी आपल्या सैनिकांना संदेश दिला, 'चलो दिल्ली'. अशा प्रकारे सुभाषचंद्र इंग्रजांच्या ताब्यार असलेल्या भारतावर आक्रमण करून भारताला स्वतंत्र करू इच्छित होते. विजय त्यांच्या टप्प्यात आला होता.
परंतु, अचानक युद्धाचा रंग पालटला. जपानला शत्रुराष्ट्रांकडून पराभव पत्करावा लागला. सुभाषबाबू मलायाला जात असताना त्यांच्या विमानाला अपघात झाला आणि ते पुन्हा कोणालाच दिसले नाहीत. त्यांच्या सहकाऱ्यांना ब्रिटिश सरकारने अटक करून त्यांच्यावर खटले भरले.
सुभाषबाबू सांगत, 'कोणतेही बलिदान फुकट जात नाही.' त्याचा अनुभव त्यांच्या हौतात्म्यातून दिसून आला.

कर्मवीर अण्णाभाऊ पाटील

सभेत मोठी भाषणे ठोकणारे, वृत्तपत्रांत फोटो छापून आणणारे, गळ्यात मोठमोठे हार घालून घेऊन स्वतःचीच स्तुतिसुमने अनेकांकडून गाऊन घेणारे शेकडो पुढारी आपल्याला सर्वत्र दिसतात; पण काहीही वल्गना न करता, मूकपणाने डोंगराएवढे काम करणारे अण्णाभाऊंसारखे कार्यकर्ते फार थोडेच.
१८८७ मध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज गावी एका शेतकरी कुटुंबात भाऊरावांचा जन्म झाला. घरातील अडचणींमुळे भाऊरावांना आपले शिक्षण अर्धवटच सोडावे लागले. अज्ञान हे दारिद्र्याचे व दुःखाचे कारण आहे हे भाऊरावांच्या लक्षात आले आणि त्याचवेळी त्यांनी बहुजन समाजात अगदी तळागाळापर्यंत शिक्षण नेऊन पोहोचवण्याचा संकल्प सोडला.
आपल्या संकल्पानुसार ते कामाला लागले. गरिबांच्या मुलांना शिक्षण द्यायचे म्हणजे प्रथम त्यांची राहण्याची, जेवणाखाण्याची सोय झाली पाहिजे हे लक्षात घेऊन अण्णांनी १९१० मध्ये दुधगाव येथे आणि १९१९ मध्ये काळे येथे अशी दोन वसतिगृहे सुरू केली. नंतर १९२४ मध्ये साताऱ्याला 'छत्रपती शाहू बोर्डिंग हाऊस' सुरू केले. अण्णा या कार्यासाठी पैसे गोळा करण्यासाठी जसे हिंडत, त्याचप्रमाणे होतकरू विद्यार्थ्याच्या शोधातही ते सतत फिरत असत. ते आपल्या विद्यार्थांना सांगत की, 'कमवा आणि शिका.' त्यासाठी अण्णा धनिकांकडून पडिक जमिनी मिळवत आणि आपल्या विद्यार्थांकडून पडित जमिनीचे उत्कृष्ट जमिनीत परिवर्तन करून घेत.
हे मौलिक कार्य करत असताना अण्णांनी आपला व आपल्या कुटुंबाचा कधीही विचार केला नाही. त्यांचे स्वतःचे बँकेत खाते नव्हते. उलट आपल्या पत्नीचे सर्व दागिने त्यांनी या गरीब विद्यार्थ्यासाठी खर्च केले.
आज महाराष्ट्रात अण्णांनी काढलेल्या संस्थेच्या शाळा, कॉलेजांचे जाळे पसरलेले आहे. 'तपश्चर्या केल्याशिवाय प्रकाश दिसणार नाही' हाच संदेश त्यांनी आपल्या शेकडो शिष्यांना दिला!
९ मे १९५९ रोजी अण्णांचे निधन झाले; पण आपल्या कार्याने कर्मवीर अण्णाभाऊ पाटील चिरंजीव झाले.   

शुक्रवार, ११ जुलै, २०१४

ह्रस्व - दीर्घ संबंधी नियम

१) (अ) मराठीतील तत्सम (-हस्व) इ-कारान्त आणि (-हस्व) उ-कारान्त शब्द दीर्घान्त लिहावेत.
- कवी, मती, गती, गुरू, पशू, सृष्टी, बहू.
(आ) इतर शब्दांच्या अंती येणारे इ-कार व उ-कार दीर्घ लिहावे.
- पाटी, पैलू, जादू, विनंती, ही (शब्दयोगी अव्यय)
- आणि, नि. (अपवाद)
(इ) तत्सम अव्यये -हस्वान्त लिहावीत.
- परंतु, यथामती, यथाशक्ति, तथापि.
(ई) सामासिक शब्दांतही तत्सम (-हस्व) इ-कारान्त व (-हस्व) उ-कारान्त शब्द पूर्वपदी असताना -हस्वान्त लिहावेत.
- बुद्धिवैभव, कविमन, गतिशील, सृष्टिसैंदर्य, अणुशक्ती, विधिनिषेध, कृतिसमिती.
(उ) साधित शब्दांत तत्सम शब्द मुळात -हस्व असल्यास त्यांनाही वरील नियम (ई) लागू होतो.
(ऊ) विद्यार्थी, प्राणी, स्वामी, शशी, गुणी यांसारखे शब्द समासात पूर्वपदी आले असता ते -हस्वान्त लिहावेत.
- विद्यार्थिमंडळ, गुणिज, स्वामिनिष्ठा, शशिकला.
- जे तत्सम शब्द संस्कृतामध्ये ई-कारान्त व (दीर्घी) ऊ-कारान्त (शेवटचे स्वर ई व ऊ दीर्घ असलेले) असे दीर्घ असतात, ते समासात पूर्वपदी आले असता मुळाप्रमाणे दीर्घान्तच राहतात.
संस्कृत शब्द - सामासिक शब्दनदी - नदीकिनारा
लक्ष्मी - लक्ष्मीपुत्र
पृथ्वी - पृथ्वीपती
रजनी - रजनीकांत

२) (अ) (दीर्घ) ई-कारान्त व ऊ-कारान्त शब्दांतील उपान्त्य इ-कार व उ-कार -हस्व लिहावे.
- गरिबी, माहिती, हुतुतू, सुरू
- तत्सम शब्द-नलिनी, समिती, भगिनी, सरोजिनी.
(आ) शब्दाच्या शेवटी आ, ए, ओ आल्यास म्हणजे शब्द आ-कारान्त, ए-कारान्त किंवा ओ-कारान्त असल्यास व उपान्त्य अक्षरात इ-कार किंवा उ-कार असल्यास तो -हस्व लिहावा.
- खिळा, पाहुणा, पुडा, महिना, हडकुळा, पाहिले, पाहिजे, पितो, लिहितो.
(अ) ला अपवाद : नीती, भीती, प्रीती, कीर्ती, मूर्ती, दीप्ती इत्यादी. मराठीत दीर्घान्त झालेले तत्सम शब्द. यांत संस्कृताप्रमाणे उपान्त्य स्वर दीर्घच लिहावा.
(आ) ला अपवाद इतर शब्द - परीक्षा, पूजा, ऊर्जा इत्यादी.

३) (अ) अकारान्त शब्दांतील उपान्त इ-कार, उ-कार दीर्घी लिहावे.
- गरीब, वकील, वीट, सून, वसूल, फूल, पूर, फकीर.
अपवाद : (१) शेवटी जोडाक्षर असलेले अ-कारान्त शब्द.
-शिस्त, क्षुद्र, दुर्ग, शुद्ध, विरुद्ध इत्यादी.
अपवाद : (२) आधीच्या अक्षरावर (उपान्त्य) स्पष्टोच्चारित अनुस्वार असलेले अकारान्त शब्द-सुंठ, रुंद, डिंक, भिंत, तुरुंग, सुरुंग इत्यादी.
(आ) अपवाद : वरील (अ) नियमाला अपवाद-तत्सम -हस्वोपान्त्य अकारान्त शब्द.
- गुण, विष, मधुर, प्रचुर, मंदिर
(इ) तत्सम अ-कारान्त शब्द (उपान्त -हस्व किंवा दीर्घ इ किंवा उ असलेले) मुळातील संस्कृत शब्दांप्रमाणे लिहावेत.
- हित, चकित, स्वस्तिक, स्निग्ध, शिथिल, उत्सुक, सूत्र, तीक्ष्ण, दीर्घ, सूक्ष्म, रूप, प्राचीन अर्वाचीन, पूज्य, पूर्व, शून्य. तसेच, उपान्त्य ॠ असलेले अकारान्त शब्द.
- कृत्य, मृत, हृदय, कृश, विस्तृत. तसेच अ-कारान्त अक्षराआधी विसर्ग असलेले शब्द - दु:ख, नि:संशय, नि:स्वार्थी
(ई) संस्कृत इक इत, ईय, अनीय, ईत प्रत्यय लागून तयार झालेले शब्द.
- सामाजिक, वार्षिक, क्रमिक, अगतिक, बौद्धिक, शारीरिक, पौराणिक, ऐतिहासिक.
- आधारित, अनुसूचित, सुरक्षित, संशयित, निलंबित.
- भारतीय, कुटुंबीय, महाराष्ट्रीय.
- अभ्यसनीय, अवर्णनीय, माननीय, गोपनीय.
- विपरीत, प्रणीत, अनिर्णीत.
(उ) मराठी ईत, ईक प्रत्यय लागून तयार झालेले शब्द.
- चकचकीत, सुटसुटीत टवटवीत, पटाईत.
- नातेवाईक, ठरावीक, सोशीक.

४) उपान्त दीर्घ ई-ऊ असलेल्या अकारान्त शब्दांतील उपान्त ई-कार/ऊ-कार उभयवचनी (एकवचनी व अनेकवचनी) सामान्यरूप करताना -हस्व लिहावा.
- गरीब-गरिबास, वकील-वकिलांना, सून-सुनेला, नागपूर-नागपुरास, जीव-जीवाला
- अपवाद : दीर्घोपान्त्य तत्सम शब्द (या शब्दांतील उपान्त्य दीर्घ अक्षर संस्कृतप्रमाणे दीर्घच लिहावे.)
- शरीरास, गीतेत, सूत्रास, जीवाला (प्राणी या अर्थी)
शरीर - शरीरास
सूत्र - सूत्रास
गीता - गीतेत
जीव ('प्राणी' या अर्थी) - जीवाला

गुरुवार, १० जुलै, २०१४

मराठीतील इतर व किरकोळ नियम

१) 'पूर' हा ग्रामवाचक शब्द कोणत्याही ग्रामनामास, लावताना दिर्घोपान्त (उपान्त अक्षर दीर्घ) लिहावा.
- नागपूर, सोलापूर, तारापूर, तुळजापूर, शिंगणापूर
- यांसारख्या शब्दांची रूपे -हस्व व दीर्घ अशी दोन्ही प्रकारांनी होतात.
जसे नागपूरहन - नागपूराहून
पंढरपूरला - पंढरपुराला

२) कोणत्या, एखादा ही रूपे लिहावी. कोणचा, एकदा ही रूपे लिहू नयेत.

३) हळूहळू, मुळूमुळू, खुटूखुटूतू, या शब्दांतील दुसरा व चौथा स्वर दीर्घ लिहावा.
- मात्र पुनरुक्त शब्द नादानुकारी असतील तर ते उच्चाराप्रमाणे -हस्व लिहावेत.
- लुटुलुटु, दुडुदुडु, भुरुभुरु, तुरुतुरु

४) ए-कारान्त नामांचे सामान्यरूप या-कारान्त करावे.
- करण्यासाठी, फडक्यांना (फडके यांना), पाहण्याला इत्यादी. अशा रूपांऐवजी, पाहणेला यासारखी ए-कारान्त रूपे वापरू नयेत.
- फडकेंना, दामलेंकडे अशी रूपे अलीकडे रूढ आहेत. ती चूक मानू नयेत.

५) लेखनात पात्राच्या किंवा वक्त्याच्या तोंडी बोलण्याची भाषा घालावी लागते. त्या वेळी तिचे स्वरूप बोलण्यातील उच्चाराप्रमाणे असावे.
- तो म्हणाला, "मला असं वाटतं, की त्यांचं म्हणणं असावं". यातील अ-कारान्त शब्द अखेरच्या अक्षरावर 'अनुस्वार' देऊन लिहावे. येथे अनुस्वाराचा अर्थ 'आघात' असा आहे. अन्त्य 'अ' चा पूर्ण उच्चार होतो.

६) क्वचित, कदाचित, अर्थात, विद्वान इत्यादी संस्कृतातील व्यंजनान्त मत्सम शब्द अ-कारान्त लिहावे, 'क्वचित' लिहावे, 'क्वचित' लिहू नये. आणखी काही शब्द-अकस्मात, विद्युत, परिषद, अर्थात, श्रीमान, भगवान, संसद.

७) राहणे, पाहणे, वाहणे अशीच रूपे वापरावीत. 'पहाणे-वाहाणे' अशी रूपे वापरू नयेत. आज्ञार्थी प्रयोग करताना 'राहा', 'पहा', 'वाहा' याचंबरोबर 'रहा', 'पहा', 'वहा' ही रूपे वापरण्यास हरकत नाही.

८) 'इत्यादी' व 'ही' (अव्यय) हे शब्द दीर्घ लिहावे. 'अन्' हा शब्द व्यंजनान्त लिहावा.

शनिवार, ५ जुलै, २०१४

अनुस्वार संबंधीचे नियाम

१) स्पष्टोच्चारित अनुनासिकाबद्दल शीर्षबिंदू द्यावा.जसे - गुलकंद, चिंच, तंटा, निबंध, आंबा, कांदा

२) तत्सम : संस्कृतातून मराठीत जसेच्यातसे आलेले शब्द
शब्दांतील अनुनासिकांबद्दल विकल्पाने परसवर्ण लिहिण्यास हरकत नाही.

परसवर्ण
क - वर्ग पाचवे व्यंजन अनुनासिक ङ्
च - वर्ग पाचवे व्यंजन अनुनासिक ञ्
ट - वर्ग पाचवे व्यंजन अनुनासिक ण्
त - वर्ग पाचवे व्यंजन अनुनासिक न्
प - वर्ग पाचवे व्यंजन अनुनासिक म्

शब्दांमध्ये 'क' वर्गातील अक्षरापूर्वी सानुनासिक आल्यास 'क' वर्गातील सानुनासिकाचा उच्चार होतो.

जसे - कंकण - कङ्कल
च वर्ग - चंचल - चञ्चल
ट वर्ग - करंटा - करण्टा
त वर्ग - मंद - मन्द
प वर्ग - कंप - कम्प

अंतर्गत, अन्तर्गत
पंडित, पण्डित

वेदान्त, सुखान्त, दुःखान्त, देहान्त, वृत्तान्त, स्वरान्त, व्यंजनान्त, शालान्त हे शब्द असेच लिहावेत.

३) य्, र्, ल्, व्, श्, ष्, स्, ह् यांच्यापूर्वी येणाऱ्या अनुस्वारांबद्दल केवळ शीर्षबिंदू द्यावा.

- सिंह, संयम, मांस, संशय, संज्ञा, संकेत, सुंदर

वरील नियमातून 'ष' वगळावा, कारण या अक्षरापूर्वी अनुस्वार येणारा शब्द मराठीत नाही.

४) नामांच्या व सर्वनामांच्या अनेकवचनी सामान्यरुपांवर विभक्ती प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय लावताना अनुस्वार द्यावा.

- लोकांना, तुम्हांस, घरांपुढे, लोकांसमोर, घरांपुढे, परंतु, शब्दांत

- एका व्यक्तीचा आदरार्थी उल्लेख करताना तसेच अनेकवचनी सामान्यारुपांवर अनुस्वार द्यावा.

- नेहरूंनी, आजोबंपाशी, आपणांस, तुम्हांला

५) वरील नियमांव्यतिरिक्त कोणत्याही कारणांसाठी व्युत्पत्तीने सिद्ध होणारे वा न होणारे अनुस्वार देऊ नयेत.

संस्कृत शब्द  :  पूर्वीचे  :  आजचे
कण्टक  :  कांट  :  काटा
चञ्चु  :  तूं  :  तू
नाम  :  नांव  :  नाव

त्याचप्रमाणे इतर काही शब्द पूर्वी अनुस्वार देऊन लिहिले जात.
कांहीं, हाहीं, हसूं, रडूं, एकदां आता यांसारख्या शब्दांवर अनुस्वार देऊ नये.

राग कसा घालवावा

रागाचे प्रकार
१) ज्वालामुखी
२) राग दडपून टाकणे
३) स्वत:वर राग काढणे
४) इतरांवर राग काढणे

राग न येणे याचा प्रकार


१) ध्यान करणे

२) कलेत मन रामवीणे. उदा. शिल्पकाम, चित्रकला, गायन, वादन इ.

३) योगासने / व्यायाम करणे.

४) डायरी लिहिणे.

५) पोषक आहार घेणे.

६) पुरेशी निद्रा.

७) बाह्य मदतीची गरज असल्यास ती घेणे.


८) विनोदी चित्रपट, हलकेफुलके वाचन इ.


राग नियंत्रित करण्याचे लवकर उपाय

१) जवळच्या व्यक्तीजवळ मन मोकळे करणे.

२) संगीत ऐकणे.

३) विनोदी चुटके वाचणे.

४) मनासमोर आनंदी चित्र निर्माण करणे.

५) फुटबॉल, उशी, बोस्किंग करणे

६) उलटे अंक मोजणे.

७) कुठलीही प्रतिक्रिया देण्या आधी थोडा वेळ शांत राहणे.

८) दीर्घश्वसन करणे.

९) स्मितहास्य करणे.

१०) शांत होण्यासाठी त्या परिस्थीतीतून बाजूला होऊन स्वतःसाठी वेळ घेणे.


विद्यार्थ्यांसाठी रागाचा निचरा होण्यासाठी उपाय

१) विरेचन

२) चित्रांमधून भावना व्यक्त करण्यास सांगणे.

३) पेंटींग

४) मातीकाम

५) भावना लिहिण्यास सांगणे.

६) वाद्य वाजविण्यास सांगणे.



गुरुवार, ३ जुलै, २०१४

वाक्प्रचार phrase

वाक्प्रचार

अटक करणे :- खूप परिश्रम करून पोलिसांनी अट्टल गुन्हेगाला अटक केली.

अपशब्द वापरणे :- चंदूचा अमरला धक्का लागताच, अमरने चंदूविषयी रागाने अपशब्द वापरले.

अग्निदिव्य करणे :- वचन पाळण्यासाठी प्रभुरामचंद्रांना चौदा वर्षे वनवास भोगून अग्निदिव्य करावे लागले.

अचंबा वाटणे :- भर उन्हात पाऊस पडला, याचा लहानश्या मुलाला अचंबा वाटला.

अभिमान वाटणे :- आलोक स्कॉलरशिप परीक्षेत सर्वप्रथम आला, याचा बाबांना अभिमान वाटला.

अटकाव करणे :- धरणाच्या ठिकाणी आंदोलन करण्यास सरकारने लोकांना अटकाव केला.

अठराविश्व दारिद्र्य : कमवणारे कोणी नसल्यामुळे वावेरकार कुटुंबात अठराविश्व दारिद्र्य होते.

अनुकरण करणे :- लहान मुले नेहमी मोठ्या माणसांचे अनुकरण करतात.

अभिप्राय देणे :- मी लिहिलेला निबंध चांगला आहे, असा सरांनी अभिप्राय दिला.

अभिवादन करणे :- १५ ऑगस्टला आम्ही विद्यार्थ्यांनी तिरंग्याला एकसाथ अभिवादन केले.

अवलंबून असणे :- शिष्य नेहमी गुरूच्या ज्ञानावर अवलंबून असतो.

अवगत होणे :- एक महिने अभ्यासाने कॉम्प्युटर कसा चालवावा, याची कला राजेशला अवगत झाली.

अंगवळणी पडणे :- सुरुवातीला सायकल चालवताना मोहन घाबरला होता; पण हळूहळू सायकल चालवणे त्याच्या अंगवळणी पडले.

अंगी बाळगणे :- माणसाने दुसऱ्याकडचे चांगले गुण नेहमी अंगी बाळगावेत.

अंगीकार करणे :- महात्प्रयासाने स्वातीने सासरच्या चालीरीतींचा अंगीकार केला.

अंग चोरणे :- आपले अंग चोरून महादूने मालकांना वाट करून दिली.

अंत होणे :- पावनखिंडीत बाजीप्रभू देशपांडे यांचा अंत झाला.

अंतर ण देणे :- शेठजींनी दामू या आपल्या नोकराला कधीही अंतर दिले नाही.

अंदाज बांधणे :- मोहनच्या पडलेल्या चेहऱ्यावरून तो नाराज झाला आहे, असा आईने अंदाज बांधला.

आकलन होणे : काकांनी समजावून सांगितले की, बऱ्याचशा कठीण गोष्टींचे मला आकलन होते.

आदर बाळगणे : लहान मुलांनी नेहमी थोरामोठ्यांचा आदर बाळगावा.

आनंदाचे भरते येणे : पहिल्यांदा समुद्रकिनारा पाहिल्यामुळे नीताला आनंदाचे भरते आले.

आरोळ्या ठोकणे :- क्रिकेटमध्ये जिंकल्यावर मुलांनी आनंदाने आरोळ्या भोकल्या.

आव्हान देणे :- गुप्त कारस्थान करणाऱ्या शत्रूला भारतीय सेनेने आव्हान दिले.

आयात करणे : जावा-सुमात्रा बेटावरून भारत मसाल्यांच्या पदार्थांची आयात करतो.

आवाहन करणे : 'पूरग्रस्तांना मदत करा' असे चाळ कमिटीने प्रत्येक भाडेकरूला आवाहन केले.

आळशांचा राजा :- रमेश काहीच काम करत नाही, दिवसभर लोळत असतो. तो म्हणजे आळशांचा राजा आहे.

आश्चर्य वाटणे :- या दिवाळीत गावामध्ये खुप फटाके फुटल्याने मला आश्चर्य वाटले.

आश्चर्याने तोंडात बोटे घालणे :- अपंगांची शर्यत पाहून रोहण आश्चर्याने तोंडात बोटे घातली.

आश्चर्यचकित होणे :- सर्कशीतील नाचणारा हत्ती बघून प्रेक्षक आश्चर्यचकित झाले.

आज्ञा पाळणे :- आईवडिलांची व गुरुजनांची आज्ञा पाळावी.

औक्षण करणे : दिवाळीला अभ्यंगस्नान केल्यावर आईने मला औक्षण केले.

इलाज नसणे : अतिरेक्यांनी भारताचे एवढे नुकसान केले की त्यांच्यावर कडक कारवाई करण्याशिवाय सरकारकडे इलाज नव्हता.

उत्कट प्रेम असणे :- माझे माझ्या शाळेवर उत्कट प्रेम आहे.

उत्कंठेने वाट पाहणे :- वाऱ्याच वर्षांनी माहेरी येणाऱ्या नलूची राधाबाई उत्कंठेने वाट पाहत होत्या.

उगम पावणे :- त्र्यंबकेश्वराच्या डोंगरात गोदावरी नदी उगम पावते.

उचलली जीभ लावली टाळ्याला :- राजेश प्रत्येक गोष्टीत आपल्याला ज्ञान आहे अशीच वागते. म्हणतात ना, उचलली जीभ लावली टाळ्याला.

उत्तीर्ण होणे :- प्रमोद एम.बी.बी.एस. परीक्षेत उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाला.

उदरनिर्वाह करणे :- कमालीचे कष्ट उपसून दामू आपला उदरनिर्वाह करत होता.

उन्हे उतरणे :- उन्हे उतरताना आई शेतातून घरी आली.

ऋण फेडणे :- गरिबांची सेवा करून प्रत्येकाने समाजाचे ऋण फेडले पाहिजे.

एकजीव होणे :- गावातील रस्ता तयार करताना गावकऱ्यांनी एकजीव होऊन काम केले.

एकटा पडणे :- वर्गात वीरुशी कोणी बोलत नसल्यामुळे तो एकटा पडला.

एक होणे :- सर्व भारतीयांनी एक होऊन दहशतवादाचा बीमोड केला पाहिजे.

ऐट दाखवणे :- नवीन कपडे घालून छोटा राजू सर्वांना ऐट दाखवत होता.

कदर करणे :- बादशहाने बिरबलाच्या चातुर्याची नेहमी कदर केली.

करुणा उत्पन्न होणे : रामूचे दारिद्र्य पाहून सर्वांच्या मनात करुणा उत्पन्न झाली.

कमाल करणे :- नाटकात सुंदर अभिनय करून विनिताने अगदी कमाल केली.

कच खाणे :- माथेरानला दरीत उतरताना चंदूच्या मनाने कच खाल्ली.

कचरणे :- रात्रीच्या वेळी जंगलातून प्रवास करायला पर्यटकांचे मन कचरले.

कपाळमोक्ष होणे :- गच्चीवरून कोसळल्यामुळे गच्चीत काम करणाऱ्या कामगाराचा कपाळमोक्ष झाला.

कलाटणी मिळणे : मधुकर नौदलात भरती झाला आणि त्याच्या आयुष्याला एकदम कलाटणी मिळाली.

कष्टाचे खाणे :- शेतकरी शेतात राब राब राबतो व कष्टाचे खातो.

कळी खुलणे :- आजीने आणलेली सुंदर सुंदर खेळणी पाहून लहानग्या शीतलची कळी खुलली.

कंबर कसणे :- भारतमातेला पारतंत्र्याच्या जोखडातून सोडवण्यासाठी क्रांतीकारकांनी कंबर कसली.

काबाडकष्ट करणे :- मामीने आपल्या मुलाला काबाडकष्ट करून शिकवले.

काटकसर करणे :- तुटपुंज्या पगारात महिन्याचा खर्च करताना रेखाकाकू काटकसर करत होत्या.

कातड्याचे जोडे घालणे :- सुरज नोकर सावकारांना म्हणाला, "माझ्या मुलीच्या लग्नासाठी तुम्ही पैसे दिलेत, तर मी तुम्हांला माझ्या कातड्याचे जोडे घालीन."

काबीज करणे :- छत्रपती शिवाजी महाराजांनी कुमारवयातच तोरणा गड काबीज केला.

कागाळी करणे :- सुचिताने पुस्तक फाडले, अशी नीताने आईकडे कागाळी केली.

कानात वारे शिरणे :- बऱ्याच दिवसांनी मोकळ्या मैदानात आणल्यावर कुत्र्याच्या पिलाच्या कानात वारे शिरले.

कामगिरी करणे :- बाजीप्रभू देशपांडेंनी पावनखिंड लढवून शिवाजी महाराजांनी त्यांच्यावर सोपवलेली कामगिरी बजावली.

कालबाह्य ठरणे :- दूरदर्शनच्या वाढत्या प्रसारामुळे हल्ली रेडिओ कालबाह्य ठरू लागला आहे.

काहूर उठणे : पृथ्वीवर धूमकेतू आदळणार, या अफवेचे लोकांमध्ये काहूर उठले.

कामाचे चीज होणे :- मिडलस्कूल परीक्षेत राहुल प्रथम आल्यामुळे त्याने रात्रंदिवस केलेल्या कामाचे चीज झाले.

काया झिजवणे :- मदर तेरेसांनी अनाथ बालकांसाठी आयुष्यभर आपली काया झिजवली.

काळजी घेणे :- छत्रपती शिवाजी महाराज आपल्या प्रजेची मुलाप्रमाणे काळजी घेत होते.

काळजात चर्र होणे :- कोसळलेल्या इमारतीची बातमी वाचून सुनंदाच्या काळजात चर्र झाले.

काळजाला हात घालणे :- मेधा पाटकर यांनी धरणग्रस्तांची बाजू कळकळीने मांडून लोकांच्या काळजाला हात घातला.
   
कृतघ्न असणे :- स्वतः कष्ट करून राधाबाईने रामला शिकवले, पण त्यांच्या म्हातारपणी दूर जाऊन तो कृतघ्न ठरला.

कैद करणे :- शाळेतील मुलांनी अभ्यास होण्या साठी स्वताला कैद करून घतले.

किंमत करणे :- पोशाखावरून नाही; पण एखाद्या माणसाच्या बोलण्यावरून त्याची किंमत करावी.

कुवत असणे :- न थकता दहा किलोमीटर धावण्याची राजेशची कुवत होती.

कुशल चिंतणे :- देवाला नवस करून कुमारकाकींनी आपल्या मुलाच्या आरोग्यासाठी कुशल चिंतीले.

कुरकुर करणे :- सहलीला जायला मिळाले नाही; म्हणून राजू दिवसभर कुरकुर करत होता.

कुरवाळणे :- संध्याकाळी परतलेल्या गाईला वासुदेव मायेने कुरवाळतो.

कूस धन्य करणे :- छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापून जीजामातेची कूस धन्य केली.

कोरडे ठणठणीत पडणे :- आमच्या गावचा ओढा भर उन्हाळ्यात कोरडा ठणठणीत पडतो.

कौतुक वाटणे :- मुग्धा एवढ्या लहान वयात उत्तम गाते याचे सर्वांना कौतुक वाटते.

खजील होणे :- चोरी उघडकीस आल्यावर रामू खजील झाला.

ख्याती असणे :- उत्तम धावपटू म्हणून पी.टी. उषा यांची ख्याती आहे.

खटके उडणे :- मीरा व रमा या जुळ्या बहिणींचे एकाच वस्तूवरून नेहमी खटके उडतात.

खळीला येणे :- दहा फेऱ्यांनंतरही निकाल लागला नाही; तेव्हा दोन्ही पहिलवान खळीला आले.

खंडाने जमीन घेणे :- शामुकाकांनी इनामदारांची पडिक जमीन खंडाने घेतली.

खडान्खडा माहिती :- आमच्या मुख्याध्यापकांना शाळेच्या कामकाजाची खडान्खडा माहिती आहे.

खांद्याला खांदा लावून काम करणे :- शाळेचे बांधकाम करताना गावकऱ्यांनी खांद्याला खांदा लावून काम केले.

खेटून उभे राहणे :- लहानगा शरद आपल्या आईला अगदी खेटून उभा होता.

खेद प्रदर्शित करणे :- लोकलगाड्या वेळेवर धावत नसल्यामुळे स्टेशन मास्तरांनी प्रवाशांकडे खेद प्रदर्शित केला.

खेळ रंगात येणे :- शाळेला सुट्टी असते, तेव्हा लहान मुलांचा खेळ रंगात येतो.

खोड मोडणे :- हात सोडून सायकल चालवणारा राजू जेव्हा एकदा सपाटून आपटला, तेव्हा त्याची खोड मोडली.

गप्पांना भरती येणे :- खूप दिवसांनी काकु घरी आल्यामुळे त्यांच्या व आईच्या गप्पांना भरती आली.

गयावया करणे :- चोर स्वताला सोडण्या साठी पोलिसांकडे गयावया करत होता.

गलबलणे :- रेल्वे दुर्घटनेतील जखमी प्रवासी पाहून माणसे गलबलली.

गर्दी पांगवणे :- पोलिसांनी अपघाताच्या ठिकाणी झालेली गर्दी पांगवली.

गट्ट करणे :- येज्ञेशने डब्यातील ठेवलेले दहा लाडू एका दमात गडप झाला.

गस्त घालणे :- चोरीमारी होऊ नये; म्हणून स्टेशनवर पोलीस गस्त घालत होते.

गडप होणे :- वाघाला पाहून रानातला हरिणांचा कळप लगेच गडप झाला.

गर्भगळीत होणे :- दोन पावलांवर अचानक आलेल्या सापाला बघून बबन गर्भगळीत झाला.

गरज भागणे :- शाळेतील वाचनालयामुळे शरदची अभ्यासाची गरज भागली.

गहजब उडणे :- गावात वाघ मोकाट सुटला हे ऐकून रात्री गावात एकच गहजब उडाला.

गहिवरणे :- वीस वर्षांनंतर आपल्या मुलाला पोटाशी धरताना पार्वतीकाकू गहिवरल्या.

गळा घोटणे :- दागिन्यांच्या हव्यासापायी चोराने रात्री आमच्या शेजारच्या काकूंचा गळा घोटला.

गाडी अडणे :- एका इंग्रजी शब्दाच्या अर्थापाशी मधुराची गाडी अडली.

गांगरून जाणे :- जत्रेतील तुफान गर्दी बघून छोटा बबन गांगरून गेला.

गाढ झोपणे :- आईच्या मांडीवर बाळ गाढ झोपला होता.

गाव गोळा होणे : गरुडीचा खेळ पाहण्यासाठी गाव गोळा झाला.

गाडून घेणे :- शर्यतीच्या स्पर्धेसाठी दिलीपने स्वतःला सरावात गाडून घेतले.

गोंगाट करणे :- शाळेला सुट्टी असल्यामुळे दुपारच्या वेळी मुले मैदानात गोंगाट करत होतो.

गौरव करणे :- शालान्त परीक्षेत जिल्ह्यात पहिली आल्यामुळे मुख्याध्यापकांनी अमृताचा गौरव केला.

घाम गाळणे :- शेतकरी दिवसभर शेतात घाम गाळतात.

घायाळ होणे :- झाडावरून खाली पडल्यामुळे चिमणीचे पिल्लू घायाळ झाले.

घोकत बसणे :- शेजारचा मधू संस्कृत शब्द घोकत बसला होता.

घोकंपट्टी :- उद्या भाषेचा पेपर म्हणून अमित आजपासूनच घोकंपट्टी करत होता.

चक्कर मारणे :- मी गावी गेलो की, संध्याकाळी नदीकाठी चक्कर मारतो.

चरणांवर मस्तक ठेवणे :- वारीला गेलेले वारकरी श्रीविठ्ठलमूर्तीच्या चरणांवर मस्तक ठेवतात.

चाचपडत राहणे :- वीजकपातीमुळे अंधारात म्हातारे भाऊकाका चाव्यांचा जुडगा हुडकण्यासाठी चाचपडत राहिले होते.

चांगले दिवस येणे :- मुलगा कामाला लागला आणि दरेकर कुटुंबाला चांगले दिवस आले.

चिडीचूप होणे :- सर वर्गात येताच गडबड करणारी मुले चिडीचूप झाली.

चेव चढणे :- शत्रूचे सैन्य दिसताच भारतीय जवानांना चेव चढला.

छाया शोधणे :- भर उन्हात चालता चालता चालता महेश दमला व छाया शोधू लागला.

जग कळणे : वयाच्या दहाव्या वर्षीच महादूला

जाहीर करणे :- उद्या पाणी येणार नाही, असे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी जाहीर केले.

जिवाचे सोने होणे :- दोन्ही मुले चांगली शिकल्यामुळे काशीबाईंच्या जिवाचे सोने झाले.

जीवदान देणे :- महाराजांनी रायरीच्या पाटलांना जीवदान दिले.

जीवावर येणे :- वीस माणसांचा स्वयंपाक करणे, हे राधाबाईच्या अगदी जीवावर आले.

जीव मेटाकुटीला येणे :- रात्रभर काम करून सीताकाकूंचा जीव मेटाकुटीला आला.

जीव सुखावणे :- मुलगा स्कॉलरशिप परीक्षेत पहिला आला, हे ऐकून स्वातीबाईंचा जीव सुखावला.

झडप घेणे :- घारीने कोंबडीच्या पिलांबर वरून झडप घेतली.

डोक्यावरचे ओझे उतरणे :- पुरामध्ये रामरावाचे घर वाहून गेले नाही, असे कळताच त्यांच्या भावाच्या डोक्यावरचे ओझे उतरले.

डोळा चुकवणे :- लहानगा राजू आईचा डोळा चुकवून खेळायला गेला.

डोळे भरून येणे :- परदेशात चाललेल्या विनयला पाहून आईचे डोळे भरून आले.

डोळे ओले होणे :- चित्रपटातील करुण प्रसंग पाहताना प्रेक्षकांचे डोळे ओले झाले.

डोळे पाण्याने डबडबणे :- सासरी निघालेल्या मुलीला निरोप देताना राधाकाकुंचे डोळे पाण्याने डबडबले.

डोळ्यांत पाणी येणे :- ताईला सासरी धाडताना आईच्या डोळ्यांत पाणी आले.

डोळ्यांतून टिपे गळणे :- दहा वर्षांनी आईने संजयला पाहिले आणि तिच्या डोळ्यांतून टिपे गळू लागली.

डोळ्यांवर येणे :- क्रांतिकारकांनी केलेले गुप्त कट ब्रिटिश पोलिसांच्या डोळ्यांवर आले.

डोळे दिपणे :- इंद्रधनुष्य पाहून नीताचे डोळे दिपले.

डोळे पुसणे :- मदर तेरेसांनी कित्येक दुःखितांचे डोळे पुसले.

तणतणणे :- मधुराला आईने सहलीला जाऊ दिले नाही; म्हणून ती आईवर तणतणली.

तडे पडणे :- पाऊस न पडल्यामुळे आमच्या गावातील शेतजमिनीला तडे पडले.

तहानभूक हरपणे :- खेळायला मिळाले, की राजेशची तहानभूक हरपते.

तर्क करणे :- बंडू पुण्याला गेलाय म्हणजे नक्कीच आत्याकडे गेला असणार, असा अमरने तर्क केला.

तडाखा बसणे :- गेल्या वर्षी गावाला महापुराचा तडाखा बसला.

ताजेतवाने होणे :- सकाळच्या हवेत फिरून आल्यावर मी ताजातवाना झालो.

ताण येणे :- उद्या होणाऱ्या मिडलस्कूल स्कॉलरशिप परीक्षेचा मीनाच्या मनावर ताण आला.

तावडीतून सुटणे :- हिसका मारून चोर पोलिसांच्या तावडीतून सुटला.

ताप सरणे :- पहिला पाऊस पडताच जमिनीचा ताप सरला.

ताब्यात देणे :- कट्टर अतिरेक्याला लोकांनी पोलिसांच्या ताब्यात दिले.

तांबडे फुटणे :- तांबडे फुटले की शेतकरी शेतामध्ये कामाला जातात.

तोंडचे पाणी पळणे :- रानामध्ये दोन पावलांवर अचानक मोठा साप बघून सहलीला गेलेल्या मुलांच्या तोंडचे पाणी पळाले.

तोंडघशी पडणे :- कोलांट्या उद्या मारता मारता मधू तोंडघशी पडला.

तोंडातून चकार शब्द न काढणे :- सर राजेशवर रागावले, तेव्हा त्याने तोंडातून चकार शब्द काढला नाही.

तुच्छ वाटणे :- अभ्यासापुढे संजयला खेळणे तुच्छ वाटते.

तुडुंब भरणे :- पावसामध्ये आमच्या गावची विहीर तुडुंब भरते.

त्रेधा-तिरपीट उडणे :- संध्याकाळी येणारे पाहुणे सकाळीच आल्यामुळे मंदाची त्रेधा-तिरपीट उडाली.

त्याग करणे :- गांधीजींच्या आदेशानुसार सर्व अनुयायांची विदेशी कपड्यांचा त्याग केला.

थक्क करणे :- एकापाठोपाठ एक असे शंभर सूर्यनमस्कार करून रामूने सर्वांनाच थक्क केले.

थट्टा करणे : सर्व दोस्तांमध्ये राजू बुटका असल्यामुळे सगळे त्याची थट्टा करत.

थाप मारणे :- सिनेमा बघायला गेलेल्या सुधीरने 'मी मित्राकडे अभ्यास करत होतो,' अशी आईला थाप मारली.

थारा देणे :- अकबर बादशहाने सर्व कलावंतांना दरबारात थारा दिला.

दगा न देणे :- चांगल्या मित्राला कधीही दगा देऊ नये.

दर्शन घेणे :- आग्र्याला जाऊन आम्ही ताजमहालाचे दर्शन घेतले.

दाद मागणे :- आपल्यावर झालेल्या अन्यायाची रामरावांनी कोर्टात दाद मागितली.


दिवस रेटणे :- पतीचे निधन झाल्यावर काशीबाईनी कसे तरी दिवस रेटले.

दिलासा देणे :- बॉम्बस्फोटामुळे उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबांना प्रंतप्रधानांनी दिलासा दिला.

दुजोरा देणे :- हिवाळ्यात सहल काढायची, या गुरुजींच्या म्हणण्याला वर्गातील सर्व मुलांनी दुजोरा दिला.

देखरेख करणे :- रात्री आमचा वॉचमन सोसायटीची देखरेख करतो.

देवाणघेवाण करणे :- धर्मपरिषदेमध्ये प्रतिनिधींनी एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण केली.

देह झिजवणे : स्वातंत्र्यवीर सावरकरांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी आपला देह झिजवला.

देहभान हरपणे : पावसात भिजताना मुले देहभान विसरतात.

धड न समजणे : शाळेत आलेले परदेशी पाहुणे काय बोलत होते ते आम्ही मुलांना धड समजत नव्हते.

धडा शिकवणे :- पोलिसांनी चोरांना गजाआड करून चांगलाच धडा शिकवला.

धन्य होणे :- देवाचे दर्शन होताच संत नामदेव धन्य झाले.

धडे देणे : रामभाऊंनी मुलाला मोठ्या माणसांशी कसे नम्रतेने वागावे, याचे धडे दिले.

धपाटे घालणे :- उजळणी आली नाही की माझे मामा पाठीत धपाटे घालायचे.

ध्यास घेणे : लहान वयातच राहुलने बुद्धिबळपटू होण्याचा ध्यास घेतला.

धारण करणे :- लहानपणच्या नरेंद्राने मोठेपणी स्वामी विवेकानंद हे नाव धारण केले.

धाडस दाखवणे :- मनोहरने एकट्याने विहिरीत उडी मारण्याचे धाडस दाखवले.

धाप लागणे :- धावण्याच्या शर्यतीत जोरात धावल्यामुळे रोहितला धाप लागली.

धूम धावत सुटणे :- शाळा सुटताच मुले धूम धावत सुटली.

नक्कल करणे :- स्नेहसंमेलनात उदयने सरांची अगदी हुबेहूक नक्कल केली.

नजर ठेवणे :- अतिरेक्यांच्या कारवायांवर पोलिसांनी नजर ठेवली होती.

नवल वाटणे :- अबोल असलेला संजय उमेशची तक्रार करताना भडाभडा बोलताना पाहून त्याच्या आत्याला नवल वाटले.

नजर चुकवणे : आईची नजर चुकवून राजू खेळायला गेला.

नमूद करणे : पुण्याला सोळा सेंटिमीटर पाऊस पडला, असे वेधशाळेने उमूद केले.

नाव गाजने : सचिन तेंडुलकरमुळे साऱ्या जगात भारताचे नाव गाजले.

नाशवंत असणे :- या जगात कोणतीही गोष्ट अमर नाही, ती नाशवंत आहे.

निरीक्षण करणे : मी काढलेल्या चित्राचे बाईंनी निरीक्षण केले.

निष्ठा असणे : मोहितची आपल्या गुरुजींच्या बुद्धिमत्तेवर खूप निष्ठा होती.

निपचित पडून राहणे :- दोन दिवस आलेल्या तापामुळे लहानगे बाळ निपचित पडून होते.

पदवी देणे : वेस्ट इंडीजचे महान क्रिकेटपटू गॅरी सोबर्स यांना 'सर' ही पदवी देण्यात आली.

पर्वा नसणे : क्रांतिवीरांनी देशाच्या स्वातंत्रासाठी आपल्या जीवाची पर्वा केली नाही.

पश्चात्ताप होणे : ज्या खंडूने वर्गात पहिला नंबर काढला, त्या खंडूला आपण खेडवळ म्हणून हसलो होतो याचा सलीलला पश्च्यात्ताप झाला.

पंखात वारं भरणे :- शालान्त परीक्षेनंतर आय.टी. क्षेत्रात चमकायचे, या विचाराने संदीपच्या पंखात वारं भरलं.

पाया पडणे : संध्याकाळी हातपाय धुऊन देवाच्या पाया पडावे.

पाय ओढणे :- सगळ्यांनी एकदम प्रगती करावी, कोणीही कुणाचे पाय ओढू नयेत.

पायाशी बसणे :-गावी गेलो की, माझे बाबा नेहमी आजोबांच्या पायाशी बसत.

पार पडणे :- गेल्या आठवड्यात आमच्या शाळेचे स्नेहसंमेलन पार पडले.

पाळेमुळे खोल रुजणे :- गाव सोडताना आईला दु:ख झाले; कारण या गावाच्या संस्कृतीत तिची पाळेमुळे खोल रुजली होती.

पोट भरणे : महादू दिवसरात्र कष्ट करून आपले पोट भरतो.

पोटाला चिमटा घेणे : पोटाला चिमटा घेऊन काकूंनी राजला उच्च शिक्षण दिले.

पोशिंदा असणे : साऱ्या मराठमोळ्या रयतेचे छत्रपती शिवाजी महाराज पोशिंदा होते.

प्रत्युत्तर देणे : बाबांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाला श्याम प्रत्युत्तर देत होता.

प्रसंग बेतणे : पाऊस न आल्यामुळे शेतकऱ्यांवर दुष्काळाचा प्रसंग बेतला.

प्रविष्ट होणे :- सत्यनारायणाची महापूजा घातली आणि नंतरच सर्वजण नवीन घरात प्रविष्ट झाले.

प्राणाचे बलिदान करणे :- भारताच्या स्वातंत्र्यासाठी अनेक क्रांतिकाराकांनी प्राणाचे बलिदान केले.
पाय धरणे : हातून घडलेल्या चुकीबद्दल बबनने राकाशेटचे पाय धरले.

प्रेमाचा भुकेला असणे :- अनाथाश्रमातील मुले प्रेमाची भुकेली असतात.

पिंगा घालणे :- मंगळागौरी खेळताना माहेरी आलेल्या सुमनने सुंदर पिंगा घातला.

फावला वेळ मिळणे : फावला वेळ मिळाला की, माझी आई वाचन करते.

फेरफार करणे :- मी लिहिलेल्या निबंधामध्ये गुरुजींनी फार चांगले फेरफार केले.

फिर्याद करणे : जमिनीच्या संबंधात दामूकाकांनी शेजाऱ्यावर फिर्याद केली.

बहुमान मिळणे : आंतरशालेय स्पर्धेत सर्वाधिक बक्षिसे पटकावणाऱ्या उमाला स्नेहसंमेलनाच्या अध्यक्षपदाचा बहुमान मिळाला.

बडगा दाखवणे :- चोरांनी गुन्हा कबूल करावा म्हणून पोलिसांनी त्यांना कडक शिक्षेचा बडगा दाखवला.

बळकटी येणे :- संदर्भग्रंथांचे वाचन करून वक्त्याच्या विचारांना बळकटी येते.

बाजूस सारणे :- ओजस्वीने टेबलावरचे दप्तर बाजूला सारले.

बारा महिने तेरा काळ :- वामनरावांची देवपूजा अगदी बारा महिने तेरा काळ सुरूच आसरे.

बाजार भरणे :- सुट्टीमध्ये मामाच्या घरी आम्हा पोरांचा बाजार भरला होता.

बालेकिल्ला असणे :- अकोला शहर हे तर उमेदवार विष्णुपंतांचा बालेकिल्ला होता.

बावचळणे :- समोरून अचानक आलेला हत्ती पाहून अनुश्री एकदम बावचळली.

बुचकळ्यात पडणे :- आईला अचानक रडताना पाहून मोहन बुचकळ्यात पडला.

बेभान होणे :- मोठ्या भावाच्या वरातीमध्ये रघू बेभान होऊन नाचला.

भाळी असणे :- दिवसभर काबाडकष्ट करणे हेच आमच्या आजीच्या भाळी होते.

भांबावून जाणे :- आईचे बोट सुटल्यामुळे जत्रेमध्ये गर्दीत छोटा राहुल भांबावून गेला.

भीतीने थरथरणे : विहिरीत बुडणाऱ्या मुलाला वर काढले, पण तो भीतीने थरथरत होता.

भुकेने तडफडणे : तीन दिवस उपाशी असल्यामुळे भिकारी भुकेने तडफडत होता.

भुलून जाणे : ते सुंदर निसर्गचित्र पाहून सरिता भुलून गेली.

भूल पडणे : राजेशनने काढलेली सुंदर चित्रे बघून सोहनच्या मनाला भूल पडली.

भेदरणे :- विहिरीत पडलेले मूल खूप भेदरले होते.

मन रमणे : कुमारचे पोहण्यात मन रमते.

मन उचंबळणे :- गोव्याचा मोठा समुद्रकिनारा पाहून स्मिताचे मन उचंबळले.

मनाई असणे : भर पावसात बोटींना खोल समुद्रात जाण्यास मनाई असते.

मशागत करणे : चांगले पीक येण्यासाठी शेतकरी आपल्या शेतांची मशागत करतात.

मस्तक आदराने लवणे : स्वांतत्र्यवीरांच्या कहाण्या ऐकताना आपले मस्तक आदराने लवते.

माघार घेणे : भारतीय सैन्याने चाल केल्यामुळे शत्रूच्या सैनिकांनी माघार घेतली.

मान डोलवणे : सहलीला यायचे का, असे राजूला विचारताच त्याने मान डोलवली.

मातीजमा होणे :- पिकांवर रोग पडल्यामुळे शेतातील पिके एकेक करून मातीजमा झाली.

मान खाली घालणे :- पोलिसांनी धमकावताच चोराने मान खाली घातली.

मान देणे :- आमच्या सरांना गावातील लोक खूप मान देतात.

मान हलवणे :- 'सहलीला जायचे ना' असे गुरुजींनी विचारताच सर्वांनी मान हलवली.

मुक्त करणे : गुन्हा शाबित न झाल्यामुळे न्यायालयाने चोराला मुक्त केले.

मुलूख थोडा करणे :- गावात दुष्काळ पडल्यामुळे गावकऱ्यांनी मुलूख थोडा केला.

मृत्यू पावणे : जन्माला येणारा प्रत्येक माणूस कधी ना कधी मृत्यू पावतो.

मोह होणे : देवासमोरचे लाडू चोरण्याचा स्वप्नीलला मोह झाला.

मौन पाळणे : शैलाने विवेकानंद जयंतीला दिवसभर मौन पाळले होते.

याचना करणे :- दोन घासांसाठी रस्त्यावरचा भिकारी येत्या-जात्या माणसाकडे हात पसरून याचना करत होता.

येरझारा घालणे :- रात्री अकरा वाजून गेले तरी मधू घरी परतला नाही, म्हणून बाबा अंगणातच येरझारा घालत होते.

रक्त उसळणे :- शत्रूवर हल्ला करण्यासाठी सैनिकांचे रक्त उसळले.

रद्द करणे :- अतिवृष्टीमुळे गुरुजींनी वर्षासहल रद्द केली.

रद्द होणे :- निवडणुकीमुळे एक मार्चला होणारी शालान्त परीक्षा रद्द झाली.

रमून जाणे : सुरेश खेळात नेहमी रमून जातो.

रवंथ करणे :- दुपारी झाडाच्या सावलीत गाईगुरे रवंथ करत बसतात.

रंगात येणे :- मधूकाका व अण्णा यांचा पत्त्यांचा डाव रंगात आला होता.

-हास होणे :- शिक्षणापासून वंचित राहिल्यामुळे पूर्वीच्या समाजाचा खूप -हास झाला.

राग येणे :- चंदूने पुस्तक फाडले म्हणून राजीवला त्याचा राग आला.

राजी असणे :- रडणाऱ्या महेशला सर्कसला जाऊया, म्हणताच तो पटकन राजी झाला.

राब राब राबणे :- महादू हमालीचे काम करताना रात्रंदिवस राब राब राबतो.

रूढ होणे :- 'स्टेशन' हा इंग्रजी शब्द मराठीत अगदी रूढ झाला आहे.

रुसून बसणे :- आईने खाऊ दिला नाही म्हणून संजय रुसून बसला.

लगबग असणे :- शेजारच्या काकूंच्या घरात मुलीच्या लग्नाची लगबग होती.

लाभ होणे :- शिवरामकाकांना लॉटरी लागून अचानक पैशांचा लाभ झाला.

लुप्त होणे :- आकाशात दाटून आलेल्या ढगांमध्ये चंद्र लुप्त झाला.

लौकिक मिळवणे : स्वातीने उत्कृष्ट टेनिस खेळून जगात लौकिक मिळवला.

वचन देणे :- मी कधीही नापास होणार नाही, असे अमितने आईला वचन दिले.

वर्गवारी करणे :- निबंध-स्पर्धेसाठी सरांनी वयोगटाप्रमाणे मुलांची वर्गवारी केली.

वाटेकडे कान लावून बसणे :- आई खाऊ घेऊन येईल, या आशेने दोन लहान मुले उंबरठ्यातच आईच्या वाटेकडे कान लावून बसली होती.

वाईट वाटणे :- सुरेश नापास झाल्यामुळे रमेशला वाईट वाटले.

वाळीत टाकणे :- पंचायतीने दिलेला निर्णय पाळला नाही, म्हणून गावाने सोसवार कुटुंबाला वाळीत टाकले.

विचार कृतीत उतरवणे :- महात्मा फुले यांनी मुलींसाठी शाळा काढून आपले विचार कृतीत उतरवले.

विचारपूस करणे : सुट्टीत आम्ही कोकणात आत्याकडे गेलो तेव्हा तिने आमची विचारपूस केली.

विचारविनिमय करणे :- परेशला कोणत्या महाविद्यालयात घालायचे, याबद्दल त्याच्या आईवडिलांनी विचारविनिमय केला.

विचारात बुडून जाणे :- प्रमोदच्या समोर येऊन उभा राहिलो तरी त्याचे माझ्याकडे लक्ष गेले नाही, एवढा तो विचारात बुडून गेला होता.

विसर पडणे :- पाश्चिमात्य पद्धतींचा अंगीकार करताना जुन्या चांगल्या प्रथांचा आम्हांला विसर पडला आहे.

विळखा घालणे :- अफझलखानाच्या सैन्याने प्रतापगडला विळखा घातला.

विश्रांती घेणे : दुपारच्या वेळी माझे बाबा विश्रांती घेतात.

वेष पालटून फिरणे : पूर्वीचे राजे लोकांचे सुखदुःख जाणून घेंण्यासाठी आपल्या राज्यातून वेष पालटून फिरायचे.

वेळ वाया जाणे : वेळ हे धन आहे; ते वाया जाऊ देऊ नये.

वैषम्य वाटणे :- आंधळ्या म्हातारीला आपण रस्ता पार करायला मदत केली नाही, याचे सदूला वैषम्य वाटले.

व्याख्यान देणे : बाबा महाराज सातारकरांनी शाळेच्या पटांगणात 'ज्ञानेश्वरी' वर व्याख्याने दिली.

शब्द देणे : मी कधीच नापास होणार नाही, असा आशिषने आईला शब्द दिला.

शब्द फिरवणे : महात्मा गांधीना दिलेला शब्द कस्तुरबांनी एकदा फिरवला.

शब्द मोडणे : पुन्हा शाळेत उशिरा येणार नाही, असे सांगूनही आज मोहनने गुरुजींना दिलेला शब्द मोडला.

शब्दाला कृतीचे तारण असणे : निबंध-स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून सुमनने शब्दाला कृतीचे तारण दिले.

शड्डू ठोकणे :- रिंगणात उतरताच रघू पहिलवानाने प्रतिस्पर्ध्यासमोर शड्डू ठोकला.

शरमिंदा होणे :- रामुकाकांकडे पुन्हा पैसे उसने मागताना दामू शरमिंदा झाला.

शान वाढवणे :- १९८३ साली क्रिकेटचा विश्वचषक जिंकून कपिलदेवने भारताची शान वाढवली.

शिफारस करणे : रवीतात्याने आपल्या दोस्ताकडे उमेश चांगले काम करतो, अशी शिफारस केली.

शिकवण देणे :- 'स्वच्छता हा परमेश्वर आहे,' अशी महात्मा गांधींनी आपल्याला शिकवण दिली.

शिगेला पोहोचणे :- 'असंभव' मालिकेत शास्त्र्यांच्या वाड्याचे काय होणार, याची उत्सुकता अगदी शिगेला पोहोचली.

शिंग फुंकणे :- जुलमी इंग्रजांविरुद्ध क्रांतिकारकांनी शिंग फुंकले.

शीण घालवणे :- कामावरून थकून आलेल्या दामोदरपंतांनी फक्कड चहा पिऊन शीण घालवला.

शीण येणे :- दिवसभर टेबलावर लिखाणाचे काम करून दामूकाकांना शीण आला.

शोषण करणे :- बरेचसे गिरणीमालक कामगारांचे शोषण करत असत.

सक्रिय सहभाग घेणे :- रक्तदान शिबिरामध्ये गावकऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला.

सढळ हाताने मदत करणे :- आईने दारी आलेल्या साधूला सढळ हाताने मदत केली.

सन्मान करणे :- राज्यात निबंध स्पर्धेत पहिले पारितोषिक मिळवल्याबद्दल मुख्याध्यापकांनी रेश्माचा सन्मान केला.

सर्रास वापरणे :- सुधाकर आपल्या वाडीलभावाचे बूट सर्रास वापरतो.

सल्ला देणे :- बाबांनी मला स्कॉलरशिपच्या परीक्षेला बसण्याचा सल्ला दिला.

सहकार्य करणे :- एकमेकांना सहकार्य करून गावकऱ्यांनी गावातील रस्ता बांधला.

सवलत देणे :- गरीब विद्यार्थ्यांना प्राचार्यांनी फीमध्ये सवलत दिली.

संकल्प सोडणे :- उद्यापासून पहाटे उठून अभ्यास करण्याचा शीलाने संकल्प सोडला.

संथा चुकणे :- सर्कस पाहायला गेल्यामुळे रामूची रोजची संथा चुकली.

संपादन करणे :- डॉ. आंबेडकरांनी परदेशात जाऊन 'बॅरिस्टर' ही पदवी संपादन केली.

साथ देणे : वर्ग स्वच्छ करताना मीनाला सविताने साथ दिली.

सार्थ ठरणे : लता मंगेशकर यांच्याबाबतीत 'गानकोकिळा' ही पदवी सार्थ ठरली.

सामना करणे :- कोकणातील लोक दारिद्र्याशी सामना करतात.

साय खाणे :- बालपण कष्टात गेलेल्या मधूचे आता चांगले दिवस आल्यामुळे तो साय खातो.

सुतासारखा सरळ करणे : चोराला कडक शिक्षा करून पोलिसांनी त्याला सुतासारखा सरळ केला.

सुधारणा होणे : शेतीच्या पद्धतीमध्ये हळूहळू सुधारणा झाली.

सुविधा असणे : ए.टी.एम. बँकेच्या ग्राहकांनी कधीही पैसे काढण्याची सुविधा आहे.

सुगावा लागणे :- अतिरेकी काहीतरी घातपात करणार आहेत, याचा पोलिसांना सुगावा लागला.

सूर धरणे : कीर्तनाच्या आधी भजनीबुवा गात असताना आम्हीही सूर धरला.

सूर मारणे :- कडक उन्हामध्ये नदीकाठावरची मुले नदीमध्ये सूर मारत होती.

सेवा करणे : हेमाने आपल्या आजारी आईची मनोभावे सेवा केली.

सेवा पुरवणे : काही संस्था घरपोच भाजी पाठवण्याची सेवा पुरवतात.

स्वप्न साकार करणे : चंद्रावर जाण्याचे माणसाचे स्वप्न साकार झाले.

सुधारणा होणे : शेतीच्या पद्धतीमध्ये हळूहळू सुधारणा झाली आहे.

स्वागत करणे : विवेकानंद जयंतीला आमच्या शाळेत आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे मुख्याध्यापकांनी स्वागत केले.

स्तब्ध राहणे :- तळटळीत दुपारी झाडाची सर्व पाने स्तब्ध राहिली होती.

स्मारक बांधणे :- गावासाठी आयुष्यभर झिजणाऱ्या सुधाकरराव घोरपड्यांचे गावकऱ्यांनी मरणोत्तर स्मारक बांधले.

स्वाहा करणे :- दामूने समोर ठेवलेल्या परातभर जिलब्या स्वाहा केल्या.

हजेरी घेणे : ऑफिसमधून घरी परतल्यावर बाबांनी अभ्यासाबाबत माझी हजेरी घेतली.

हवेहवेसे वाटणे : खूप वर्षांनी गावाहून आलेल्या आजीचा सहवास तुषारला हवाहवासा वाटत होता.

हद्दपार करणे :- महात्मा फुले यांनी जुन्या जाचक रूढींना हद्दपार केले.

हयगय करणे :- पहाटे पहाटे उठून व्यायाम करण्यासाठी सुधीर हयगय करू लागला.

हयात सरणे :- इनामदारांच्या वाड्यावर चाकरी करता करता दामूकाकांची हयात सरली.

हमी देणे :- या औषधाने उंदीर नक्की मरतील, अशी औषधविक्रेत्याने रामरावांना हमी दिली.

हारीने बसणे :- पाऊस पडून गेल्यावर आपले पंख सुकवण्यासाठी कावळे तारेवर हारीने बसले होते.

हिंमत देणे :- आजारातून उठलेल्या नितीनला परीक्षेला बसण्यासाठी सरांनी हिंमत दिली.

हुकूम करणे :- न्यायाधीशांनी गुन्हेगारांना कोर्टात हजर करण्याचा पोलिसांना हुकूम केला.

हुकूमत येणे :-बरीच मेहनत केल्यामुळे मनोजला सफाईदारपणे इंग्रजी बोलण्यावर हुकूमत आली.

हुडहुडी भरणे : ऐन हिवाळ्यात महाबळेश्वरला हेमंतला हुडहुडी भरली.

हेका धरणे :- सुमितने (बाबांकडे) सुट्टीमध्ये गावाला जाण्याचा हेका धरला.

हेटाळणी करणे :- प्रमिलाकाकू आपल्या सावत्र मुलीची सारखी हेटाळणी करतात.

क्षमा मागणे :- 'पुन्हा गडबड करणार नाही,' असे म्हणून माधवने सरांची क्षमा मागितली.