Advertisement

गुरुवार, २५ ऑगस्ट, २०१६

विरामचिन्हे viramchinhe

विरामचिन्हे
चिन्हाचे नाव मराठी नाव उपयोग
पूर्णविराम . १) वाक्य पूर्ण झाले असता.
२) शब्दांचा संक्षेप दाखविणे.
१) जान्हवी गावाला गेली.
२) पु.ल. (पुरुषोत्तम लक्ष्मण)
अर्धविराम ; दोन छोटी छोटी वाक्ये उभयान्वयी अव्ययांनी जोडली असता. ढग गर्जत होते; पण पाऊस पडला नाही.
स्वल्पविराम , एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास, लांबोधन प्रसंगी आमच्या घरात लिंबू, आंबे, सफरचंद व मोसंबी आहे.
अपूर्णविराम : एखाद्या बाबींचा तपशील द्यावयाचा असल्यास. सम संख्या पुढीलप्रमाणे आहेत: २, ४, ६, ८, १०, १२
प्रश्नचिन्ह ? प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी त्याचे नाव काय?
उद्गारचिन्ह ! भावना व्यक्त करणाऱ्या शब्दांच्या शेवटी शाबास! छान गातोस.
आहाहा! काय हे दृश्य.
अवतरणचिन्ह
दुहेरी
एकेरी

"
'   '

बोलणार्याच्या तोंडचे शब्द दाखविताना
एखाद्या शब्दावर जोर द्यावयाचा असल्यास

बाबा म्हणाले, "मी उद्या येईन"
नावालाच 'नाम' म्हणतात.
संयोगचिन्ह




१) दोन शब्द जोडताना
२) वाक्याच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास.
विद्यार्थी-भांडार, प्रेम-विवाह
शाळेच्या सर्व कार्यक्रमात सहभागी व्हा.
आपसारण




१) बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास.
२) स्पष्टीकरण द्यावयाचे झाल्यास.

मी तेथे गेलो, पण
हाच तो सोहम ज्याचा प्रथम क्रमांक आला.

मंगळवार, २८ जून, २०१६

प्रयोग Prayog

प्रयोग


कर्ता, कर्म व क्रियापद यांच्यामधील परस्पर संबंध व्यक्त करणाऱ्या रचनेला प्रयोग म्हणतात. कत्योची किंवा कर्माची क्रियापदाशी विशिष्ट प्रकारची जुळणी या रचना निगडित असणे म्हणजे प्रयोग.
१) कर्तरी प्रयोग - जेव्हा वाक्यातील क्रियापद हे कर्त्याच्या लिंग, वचन व पुरुष यांच्याप्रमाणे बदलते, तेव्हा कर्तरी प्रयोग होतो.
२) कर्मणी प्रयोग - जेव्हा वाक्यातील क्रियापद हे कर्माच्या लिंग, वचन व पुरुष यांच्याप्रमाणे बदलते, तेव्हा कर्मणी प्रयोग होते.
३) भावे प्रयोग - जे वाक्यात क्रियापद हे किंवा कर्म यांच्या लिंग, वचन, पुरुषाप्रमाणे न बदलता स्वतंत्र राहते, व नेहमी नपुंसक लिंगी तृतीय पुरुषी एकवचन असते तेव्हा तो भावे प्रयोग आहे.

सोमवार, २७ जून, २०१६

समास Samas, marathi grammar samas

समास

शब्दांच्या एकत्रीकरणास समास म्हणतात.  दोन शब्दांचे एकत्रीकरण करून जोडशब्द तयार करताना या दोन शब्दांतील परस्परसंबंध दर्शविणारे शब्द अथवा प्रत्यय वगळले जातात.
समासाचे ४ प्रकार आहे -
१) अव्ययीभाव समास
२) तत्पुरुष समास
३) कर्मधारय समास
४) व्दिगु समास
दोन किंवा अधिक पदे परस्पर संबंधामुळे एकत्रित करण्यालाच समास म्हणतात.
(सम् + अस्) एकत्र करणे असा समास करताना त्या दोन पदांतील परस्पर संबंध सूचित करणारे प्रत्यय, अव्यये किंवा अन्य शब्द गाळले जातात.


 

गुरुवार, २१ जानेवारी, २०१६

Republic day, प्रजासत्ताक दिन

दरवर्षी जानेवारी महिन्याच्या सव्वीस तारखेला भारताचा प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. भारतीय सन-उत्सव साजरे करण्यात नेहमी अग्रभागी आहे. वेगवेगळ्या धर्माचे सण आम्ही सारख्याच उत्साहाने साजरे करत आहे. पण सर्व भारतीयांना अभिमान वाटावा असे काही राष्ट्रीय दिनही आम्ही साजरे करतो. भारत एक मोठे लोकशाही राज्य आहे. म्हणजे हे लोकांचे, लोकांनी, लोकांसाठी चालवलेले राज्य आहे. हा अधिकार भारताच्या जनतेला घटनेनुसार २६ जानेवारी १९५० साली मिळाला. त्या दिवसापासून भारतात प्रजेची सत्ता सुरू झाली. म्हणून दरवर्षी २६ जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून पाळला जातो. या समारंभाचा मुख्य कार्यक्रम भारताची राजधानी दिल्ली येथे होतो. या समारंभात भारतातील सर्व घटकराज्ये भाग घेतात. भारताच्या सर्व क्षेत्रांतील वैभवाचे दर्शन घडवणारी भलीमोठी मिरवणूक काढतात. प्रत्येक राज्यात, जिल्ह्यात, तालुक्यात आणि गावागावातून प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. धाडसी मुलांचा आणि विविध क्षेत्रांत कर्तुत्व गाजवणार्र्यांचा या दिवशी सरकारतर्फे गौरव केला जातो.
शाळेतही प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. त्यासाठी झेंडे-पताका यांनी शाळा सजवली जाते. सर्व विद्यार्थी, अध्यापक, मुख्याध्यापक यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण केले जाते. शाळेतील एन्.सी.सी. व स्काऊटचे विद्यार्थी सुंदर संचालन करतात. शाळेतील वाद्यवृंदावरही राष्ट्रीय गाणी वाजवली जातात. आम्ही सर्वजण राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेतो. प्रमुखाध्यापक गुणी विद्याथ्र्यांचे कौतुक करतात. असे राष्ट्रीय दिन साजरे केल्यामुळे प्रत्येकाच्या मनातील राष्ट्रीय भावना, राष्ट्रप्रेम अधिक उजळून निघते. प्रजासत्ताक दिन याला गणतन्त्र दिन, गणराज्य, Republic day असे ही म्हणतात.
संविधान सभेने भारताचे संविधान तयार करण्याचे काम १९४६ साली सुरू केले. संविधान समितीत डॉ. राजेंद्रप्रसाद, पंडित जवाहरलाल नेहरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना अबुल कलम आझाद, सरोजिनी नायडू, जे.बी. कृपलानी, राजकुमारी अमृत कौर, दुर्गावाई देशमुख, हंसाबेन मेहता असे अनेक मान्यवर सदस्य होते. संविधानाचा मसुदा तयार करण्यासाठी या सभेने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली मसुदा समिती नियुक्त केली. स्वतंत्र भारताचे संविधान २६ जानेवारी १९५० रोजी अमलात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे 'भारतीय संविधानाचे शिल्पकार' आहेत. ब्रिटिश साम्राज्यवादाविरुद्ध लढताना स्वातंत्र्य, समता, बंधुता व लोकशाही या मुल्यावरील निष्ठा भारतीयांनी उराशी बाळगल्या होत्या. या मूल्यांच्या पायावरच आपल्या संविधानाची उभारणी झाली आहे. त्याचबरोबर स्वातंत्र्य लढ्यात लढणाऱ्या वीरांचे चीज झाले. या दिवशी देशाने राष्ट्रीय सुट्टी म्हणून जाहीर केली. सन १९५० पासून आतापर्यंत हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो.