
वर्तमानकाळात घडलेल्या घटनांची सविस्तर आणि वस्तुनिष्ठ माहिती वृत्तान्तलेखनातून जनतेला देण्याची लेखकाची जबाबदारी असते. त्यामुळे वृत्तान्तलेखनात राग, आनंद, दुःख, आश्चर्य अशा तीव्र भावना करू नयेत. अर्थात घटनेचे वर्णन करताना नावीन्य व ताजेपणा असला पाहिजे. घटनेचा वृत्तान्त वाचणारे वाचक समाजातील विविध स्तरांतील असतात. त्यामुळे वृत्तान्तलेखनात समाजाची गरज आणि समाजाची ग्रहणशक्ती या बाबींचा विचार करावा लागतो.
मुद्दे :
- वाचकाचे लक्ष वेधून घेईल असा मथळा द्यावा.
- वृत्तान्त अचूक, परिपूर्ण व स्पष्ट
- वृत्तान्तलेखनात स्थळ, काळ, व्यक्ती यांचा अचूक उल्लेख करावा.
- मथळ्यानंतर स्पष्टीकरण द्यावे. घटनांच्या क्रमाचा उल्लेख करावा.
- घटना जशी घडली तशीच वृत्तान्तात लिहावी. त्याबाबत लेखकाने स्वतःचे मत व्यक्त करू नये.
- वृत्तान्तलेखनात वाक्ये आणि परिच्छेद लहान असावेत.
- वृत्तान्तलेखनात कोणाची बदनामी होणार नाही याची काळजी घ्यावी.
- वृत्तान्तात भाषा नकारात्मक असू नये.
- लेखनात आलंकारिकता नसावी.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा