Advertisement

बुधवार, ११ जून, २०१४

भारुड

संत एकनाथ महाराजांनी सुरू केलेली साधी व सोपी प्रबोधनात्मक परंपरा होय. एखादी गोष्ट समुदायासमोर सांगायची झाल्यास वा प्रबोधन करायचे असल्यास थोडीशी टीका आणि विनोदाची झालर देवून काव्यात्मक पद्धतीने गीतातून प्रबोधन करण्याच्या प्रकाराला 'भारुड' म्हणतात. ह्यामध्ये जो वक्ता - गायक असतो तो समाजातील एखाद्या ज्वलंत विषयाची मांडणी ह्यामध्ये करीत असतो. आणि त्यामध्ये थोडासा विनोदही असतो आणि टीकाही असते आणि जनसामान्यांच्या मनातील व्यथाही सांगत असतो. म्हणून ह्यामधून मनोरंजनासोबतच प्रबोधनही होते आणि वारीतील दिवसभराचा शीण ही निघुन जातो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा