२६ जून ही तारीख नवमहाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरांत लिहावी इतकी असाधारण महत्त्वाची आहे; कारण त्या तारखेला लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म झाला. आज महाराष्ट्र ज्या तीन थोर पुरुषांची नावे कृतज्ञपणे घेऊन धन्य होतो; त्या महात्मा फुले यांच्यानंतर डॉ. आंबेडकर यांच्या थोडं आधी राजर्षींनी जीर्णशीर्ण, गलितत्राण-भान अशा समाजपुरुषावर आपल्या कर्तृत्वाचे चैतन्यशील, रसरशीत संस्कार करून नवजीवन दिलं. आज फुले-शाहू-आंबेडकर हे महाराष्ट्राच वैचारिक अधिष्ठान झालं आहे. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या ध्येयाच्या सिद्धीसाठी या भक्कम अधिष्ठानाशिवाय पर्याय नाही. शहुंचं वर्णन त्यांच्या चरित्रकारांनी एक 'क्रांतीकारक राजा' अस केल आहे. आजपर्यंत कोणत्याही राजाचं वर्णन 'क्रांतीकारक' म्हणून केल गेलं नव्हत. पण राजर्षी शाहूंच दुर्दैव आणि देशाच सुदैव की, त्यांना राजा असूनही अन्याय स्थापित व्यवस्थेच्या विरोधात क्रांती करावी लागली. क्रांतिकारकाच्या वाट्याला जो त्रास, मनःस्ताप, मृत्यूचा धोका येतो तो सर्व त्यांनी पत्करला, सहन केला. मात्र, मरेपर्यंत क्रांतिकारकाची भूमिका सोडली नाही. एवढी खडतर, पण सफल क्रांती भारतातील एकाही राजाला करता आली नव्हती, हे त्यांच असाधारणत्व आहे.
२६ जुलै १९०२ रोजी सरकारी नोकऱ्यांतील ५० टक्के जागा मागासवर्गीयांसाठी राखीव ठेवण्याचा आदेश काढून भारतात एका नव्या क्रांतीचा प्रारंभ ह्या मानवतावादी महामानवाने केला. शोषणजीवी कुस्थापित ब्राह्यानशाहीला हा आदेश आपणाला मुळासकट उपटून फेकणारा आहे, हे कळून चुकल आणि महाराजांवर प्राणघातक हल्ला करणे, राजवाड्याला आग लावणे] राजवाड्याच्या भिंतीवर रक्तमाखल्या हातांचे छाप उठवणे, दिल्ली दरबारात इंग्रजाकडे खोटे अर्ज करून महाराजांचे चारित्र्यहनन करणे, कुजबुज तंत्रप्रयोगात घाणेरड्या कांड्या पिकवण हा सर्व क्रियानष्टपणा स्वतःला सुसंस्कृत म्हणवून घेणाऱ्यांनी केला.
बहुजन समाजाची उन्नती केवळ शिक्षणानेच होणार हे महात्मा फुले यांनी वारंवार सागितलं, म्हणूनच राजर्षींनी, 'गाव तेथे शाळा' ही धडक मोहीम उघडली. त्यासाठी सरकारी खजिना रिकामा केला. उच्च शिक्षण देऊन चार उच्चवर्णिंयाना शिक्षण देणारं 'राजाराम कॉलेज' पैशाअभावी बंद पडलं तरी चालेल, अशी न्यायनिष्ठुर, समतावादी भूमिका घेउन असे अलंकारिक भाषेत खडसावले म्हणून तर 'केसरी' ने राजर्षीवर टीकेची झोड हरहमेश सुरू ठेवली. बडोद्याचे 'जागृती' कार पाळेकर लिहितात, 'केसरी' ने व्देषाचे बीज पेरण्याचा जो क्रम चालवला आहे, त्याचं फळ त्याला व त्यांच्या जातिबंधूना खात्रीने भोगावे लागेल, ब्राह्यास्त्र परत आल्याशिवाय राहणार नाही.सनातन्यांनी दिलेल्या मनःस्तापामुळेच शाहुराजांना मधुमेह जडला, हृदयविकार जडला आणि अकाली हौतात्म्य प्रात्प झाले. उच्चवर्णियांच्या पाताळयंत्रीपणाची खात्री पटल्यामुळेच ते एकदा आपल्या आचाऱ्याला दुःखाने म्हणाले, 'हत्तींना भातगोळ्यांसाठी जो जाडा तांदूळ वापरता, त्याचा भात खाण्याची मला आता सवय केली पाहिजे. कारण 'हे लोक' मला कधी कारावास भोगायला लावतील हे कळत नाही. इतके असूनही 'केसरीकार' टिळकांच्या निधनाचे वृत्त कानावर पडताच 'मोठा माणूस गेला' म्हणून जेवणाचे ताट दूर करणारा हा थोर पुरुष मानवतेचा केवढा थोर उपासक होता, हे वेगळे सांगायला नको.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा