Advertisement

सोमवार, २३ जून, २०१४

गद्यआकलन

दिलेला गद्य उतारा वाचून त्यातील मुख्य व महत्त्वाचा विचार किंवा विषय समजून घेणे म्हणजे उताऱ्याचे आकलन होय. एखाद्या पुस्तकातील उतारा देऊन त्यावर आधारित प्रश्न विचारले जातात. उताऱ्याचे आकलन झाले की त्या प्रश्नांची उत्तरे लिहिता येतात. दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहिण्यापूर्वी दिलेला उतारा काळजीपूर्वक वाचावा. त्यातील माहिती बारकाईने समजून घ्यावी. उताऱ्यात कोणते तत्त्व किंवा विचार पटवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे ते जाणून घ्यावे. दिलेल्या प्रश्नांच्या अनुषंगाने त्यांची उत्तरे उताऱ्यातून शोधून काढून स्वतःच्या शब्दांत लिहावीत. ती उत्तरे लिहिताना उताऱ्यातील वाक्ये जशीच्या तशी उतरवून काढू नयेत. दीर्घ व आलंकारिक वाक्यरचना करू नये. सोप्या शब्दांत आणि सुटसुटीत वाक्यांत उत्तरे लिहावीत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा