या करू निर्धार सारे।
ज्ञान लाभो, शील लाभो, धैर्य लाभावे मना।
या करू निर्धार सारे, या करू आराधना।।
राबणारा बाप माझा, घाम तेथे गाळतो।
माझियासाठी स्वतःचा, जीव वेडा जाळतो।।
एवढी त्याची अपेक्षा, एवढे त्याला हवे।
ज्या घरी अंधार आहे, त्या घरी उजळो दिवे।।
हेच माझे ध्येय आता, हीच माझी प्रेरणा।
या करू निर्धार सारे, या करू आराधना।।
मी श्रमाचा पुत्र आणि त्याग माझा सोबती।
ज्ञान माझे शस्त्र आणि मी उद्या सेनापती।।
प्यायलो जे धुंद वारे, सोबरीला घेतले।
येथले काही निखारे, सोबतीला घेतले।।
संपवू अन्याय सारा, संपवू काळ्या खुणा।
या करू निर्धार सारे, या करू आराधना।।
जे इथे आम्हा मिळाले, ॠण ते फेडायचे।
बंधुता-समता-प्रीतीचे, सूर अन् छेडायचे।।
हो जगाला सौख्य आधी, मग मलाही लाभू दे।
प्रेमलाभो शांती लाभो सर्व काही लाभू दे।
एक व्हावे जीव सारे, एक हो संवेदना।।
या करू निर्धार सारे, या करू आराधना।
ज्ञान लाभो, शील लाभो, धैर्य लाभावे मना।
या करू निर्धार सारे, या करू आराधना।।
राबणारा बाप माझा, घाम तेथे गाळतो।
माझियासाठी स्वतःचा, जीव वेडा जाळतो।।
एवढी त्याची अपेक्षा, एवढे त्याला हवे।
ज्या घरी अंधार आहे, त्या घरी उजळो दिवे।।
हेच माझे ध्येय आता, हीच माझी प्रेरणा।
या करू निर्धार सारे, या करू आराधना।।
मी श्रमाचा पुत्र आणि त्याग माझा सोबती।
ज्ञान माझे शस्त्र आणि मी उद्या सेनापती।।
प्यायलो जे धुंद वारे, सोबरीला घेतले।
येथले काही निखारे, सोबतीला घेतले।।
संपवू अन्याय सारा, संपवू काळ्या खुणा।
या करू निर्धार सारे, या करू आराधना।।
जे इथे आम्हा मिळाले, ॠण ते फेडायचे।
बंधुता-समता-प्रीतीचे, सूर अन् छेडायचे।।
हो जगाला सौख्य आधी, मग मलाही लाभू दे।
प्रेमलाभो शांती लाभो सर्व काही लाभू दे।
एक व्हावे जीव सारे, एक हो संवेदना।।
या करू निर्धार सारे, या करू आराधना।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा