Advertisement

रविवार, ८ जून, २०१४

संविधान महत्व व निर्मिती

        संविधानातील तरतुदींमुळे आपल्या लोकप्रतिनिधींना नियमांच्या चौकटीत राहून राज्यकारभार पाहता येतो. त्यांच्याकडून अधिकाराचा  दुरुपयोग होण्यास प्रतिबंध करता येतो. नागरिकांचे स्वातंत्र्य आणि हक्क सुरक्षित राहतात. नागरिकांना त्यांच्या हक्कांची हमी संविधानातील तरतुदींद्वारे दिली जाते. संविधानामुळे शासनाचे अधिकार व त्यावरील मर्यादा स्पष्ट होतात. जनतेचे स्वातंत्र्य सुरक्षित राहते. जनतेचा राज्यकारभारातील सहभाग वाढतो, म्हणून संविधानानुसार राज्यकारभार केल्यास लोकशाही बळकट होते.
    
         आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळणार हे निश्चित झाल्यावर १९४६ साली संविधान निर्मितीची प्रक्रिया सुरू झाली. 'स्वतंत्र भारताचा राज्यकारभार ब्रिटिशांनी तयार केलेल्या कायद्यानुसार चालणार नाही, तर तो भारतीयांनी स्वतः तयार केलेल्या कायद्यानुसार चालेल,' असा स्वातंत्र्य चळवळीतील नेत्यांचा आग्रह होता, म्हणून संविधानाच्या निर्मितीसाठी संविधान सभेची स्थापना करण्यात आली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा