Advertisement

बुधवार, ११ जून, २०१४

फुगडी-झिम्मा

दिवसभर वारीमध्ये चालल्यानंतर रात्री मनोरंजनातून आनंद मिळून दिवसभराचा शीण घालविण्यासाठी वारीतील भक्तगण दोघे - दोघे मिळून फुगडी खेळतात, काही स्त्री भक्तगण झिम्मा खेळतात.
दोघांनी समोरासमोर उभे राहून, दोन्ही हात विरुद्ध काटकोनात पकडून गोल गोल फिरणे. फिरतांना हळूहळू फिरत नंतर वेगाने फिरणे. ह्यामध्ये फिरतांना जेव्हा गती प्राप्त होते तेव्हा दोघेही एकमेकांना घट्ट पकडून गिरकी घेत असतात. दोघांपैकी कुणीही खाली पडू नये म्हणून एकमेकांना सावरतात. हयामधून एकच संदेश मिळतो आणि कुठल्याच प्रकारचा भेदभाव एकमेकांच्या मनामध्ये राहत नाही. एकमेका साह्य करु अवघे धरू सुपंथ.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा