Advertisement

रविवार, २९ जून, २०१४

जाहिरात advertisement

आज रोजच्या जीवनात आपणाला सर्वत्र जाहिरातीचा वापर फार मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. जाहिरात ही छोटे व्यवसाय, व्यापार, उद्योग यांचे सामान्य माणसाशी नाते जोडणारे माध्यम आहे. एखाद्या वस्तूविषयी लोकांच्या मनात अभिलाषा निर्माण करणे हा जाहिरातीचा हेतू असतो. जाहिरातीत दाखविलेल्या वस्तूविषयी ओढ निर्माण होऊन ग्राहक ती वस्तू विकत घेतात. जाहिरात करण्यासाठी अनेक माध्यमे उपलब्ध असतात. वृत्तपत्रे, मासिक, दूरदर्शन, इंटरनेट या माध्यमातून जाहिरात करता येते. यांपैकी कोणत्या माध्यमातून जाहिरात केली म्हणजे ती प्रभावी ठरेल आणि आपल्या वस्तूचा खप वाढेल याचा विचार उद्योग संस्था आणि उत्पादक करतात. त्या माध्यमातून जाहिरात करायला ते प्राधान्य देतात.

आकर्षक मथळा किंवा शीर्षक देऊन वाचकांचे, ग्राहकांचे मन जाहिरातीकडे खेचून घेता येतो. सुभाषित, उखाणा, संत-वचन किंवा तशा प्रकारची रचना करून जाहिरातीचा मथळा तयार केला जातो. जाहिरातीत वस्तूंची, त्यांच्या वैशिष्ट्यांची माहिती करून देऊन लोकांच्या मनात त्या वस्तूंविषयी ओढ निर्माण केली जाते. तोच जाहिरातीचा खरा हेतू असतो. वस्तूची मागणी निर्माण करण्याची ही कला म्हणजेच जाहिरात. त्यामुळे आजच्या युगात जाहिरातीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जाहिरात तयार करताना मथळा, उपमथळा, तपशील, कंपनीची मुद्रा, कंपनीचे नाव व पत्ता या बाबी लक्षात घेऊन त्या क्रमाने जाहिरात तयार केली जाते. वस्तू, त्या वस्तूची गरज, ग्राहक, त्याचा परिसर यांनुसार जाहिरातीची रचना करावी लागरे. वस्तूचे बोधचीन्ह्ही महत्त्वाचे असते. करण या बोधचिन्हावरून वस्तूची आणि उत्पादकाची ओळख ग्राहकाला होत असते. जाहिरातीत मुद्रा, घोषवाक्य, छात्राचीत्रे, आकर्षक केली म्हणजे जास्तीत जास्त ग्राहकांना आकर्षित करून घेता येते.
मुद्दे लक्षात घ्यावेत :
१) कमीत कमी शब्दांत जास्तीत जास्त आशय सांगितला पाहिजे.
२) शब्दरचना व वाक्यरचना समजण्यास सोपी असावी.
३) आलंकारिक व काव्यमय शब्दांचा वापर करून जाहिरात आकर्षक बनविता येते.
४) ग्राहकांच्या आवडी निवडी, फॅशन्स व सवयी नेहमी बदलत असतात. त्याप्रमाणे जाहिरात वारंवार बदलता येत नाही. त्यासाठी जाहिरात बनविताना काळानुरूप व टिकाव धरणारी बनवावी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा