Advertisement

रविवार, २९ जून, २०१४

वृत्तान्तलेखन writing account

एखाद्या घडलेल्या घटनेचे यथातथ्य वर्णन करणे म्हणजे वृत्तान्तलेखन होय. सभा, संमेलने, शिबिरे, परिषदा, कार्यशाळा, समारंभ यांच्याविषयी किंवा त्या त्या परिसरामध्ये एखादी घटना घडल्यावर त्या घटनेसंबंधी सविस्तर व क्रमवार माहिती सांगणे म्हणजे वृत्तान्तलेखन होय. वृत्तान्तलेखनात कल्पनेला फारसा वाव नसतो. कारण घडलेल्या घटनेचे जसेच्या तसे वर्णन वृत्तान्तात करावे लागते. सत्यकथन आणि वस्तुनिष्ठता यांना अधिक महत्त्व द्यावे लागते. घटना किंवा प्रसंग याबाबतीत माहिती देताना तारीख, वेळ ठिकाण देणे आवश्यक असते. वृत्तान्तलेखन आटोपशीर आणि आकर्षक पद्धतीने करणे ही एक कला आहे.
वर्तमानकाळात घडलेल्या घटनांची सविस्तर आणि वस्तुनिष्ठ माहिती वृत्तान्तलेखनातून जनतेला देण्याची लेखकाची जबाबदारी असते. त्यामुळे वृत्तान्तलेखनात राग, आनंद, दुःख, आश्चर्य अशा तीव्र भावना करू नयेत. अर्थात घटनेचे वर्णन करताना नावीन्य व ताजेपणा असला पाहिजे. घटनेचा वृत्तान्त वाचणारे वाचक समाजातील विविध स्तरांतील असतात. त्यामुळे वृत्तान्तलेखनात समाजाची गरज आणि समाजाची ग्रहणशक्ती या बाबींचा विचार करावा लागतो.
मुद्दे :
- वाचकाचे लक्ष वेधून घेईल असा मथळा द्यावा.
- वृत्तान्त अचूक, परिपूर्ण व स्पष्ट
- वृत्तान्तलेखनात स्थळ, काळ, व्यक्ती यांचा अचूक उल्लेख करावा.
- मथळ्यानंतर स्पष्टीकरण द्यावे. घटनांच्या क्रमाचा उल्लेख करावा.
- घटना जशी घडली तशीच वृत्तान्तात लिहावी. त्याबाबत लेखकाने स्वतःचे मत व्यक्त करू नये.
- वृत्तान्तलेखनात वाक्ये आणि परिच्छेद लहान असावेत.
- वृत्तान्तलेखनात कोणाची बदनामी होणार नाही याची काळजी घ्यावी.
- वृत्तान्तात भाषा नकारात्मक असू नये.
- लेखनात आलंकारिकता नसावी.
असावा. तो वाचल्यावर वाचकाच्या मनात कोणतीही शंका राहू नये.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा