Advertisement

बुधवार, २५ जून, २०१४

निबंधलेखन

          'निबंध' या शब्दत 'नि' म्हणजे नीटनेटके, व्यवस्थित, पद्धतशीर आणि 'बद्ध' म्हणजे बांधलेले. ज्या लेखनात एखाद्या विषयाच्या अनुषंगाने आपल्या मनात येणारे विचार, भावना, कल्पना इ. कौशल्याने नीटनेटके बांधलेले असतात
आपल्या अभ्यासासाठी दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे निबंध लिहा असा उपक्रम आहे आणि त्यासाठी वर्णनात्मक निबंध व कल्पनात्मक निबंधाचा समावेश आहे. प्रथम या दोन प्रकारांचा आपण परिचय करून घेऊ व शेवटी निबंधलेखनाच्या सरावासाठी निवडक विषयांच्या निबंधाचे मुद्दे देऊ.

वर्णनात्मक निबंध :
ज्या निबंधामध्ये सर्व विषयाचे हुबेहूक वर्णन आलेले असते. त्यास वर्णनात्मक निबंध म्हणतात. वर्ण्य विषय एखादी वस्तू, दृश्य, व्यक्ती, प्रसंग इ. असू शकते. या निबंधप्रकारातील वर्णन हुबेहूब, जंसेच्या तसे तर ते यावेच; पण तो वर्ण्य विषय आपल्या मनाशी एकरूप व्हायला हवा. निबंध वाचताना त्याच्या वाचकास सदेह प्रत्यय यायला हवा. हा निबंध लिहिण्यासाठी लेखकाजवळ सूक्ष्म निरीक्षणशक्ती आणि समरसता, तद्रूपता आवश्यक असते.

कल्पनात्मक निबंध :

माणूस जेवढा विचारशील प्राणी आहे तेवढाच तो कल्पनेत रममाण होणारा रसिक जीव आहे. कल्पनात्मक निबंधात कल्पनाशक्तीला आवाहन असते. या प्रकारामध्ये विषयाच्या अनुषंगाने मनमुराद कल्पना येतात, त्या लेखक-वाचक दोघांनाही आनंद देतात. मात्र हा निबंध लिहिताना पथ्य एवढेच पाळावे लागते की त्या कल्पना असंभवनीय, हास्यास्पद, नकारात्मक अशा नसाव्यात. कल्पना कल्पनाच आहेत पण असे घडू शकते असा वास्तवाचा प्रत्यय निबंधातून यावा.
त्यास निबंध म्हणता येईल. आपल्या शालेय निबंधलेखनाला वेळेची आणि शब्दांची मर्यादा असते. या मर्यादा सांभाळत आपल्या आशय परिणामकारकरीत्या व्यक्त करणारी सुंदर भाषा निबंधात असायला हवी. सकारात्मक विचार, प्रांजळ भावना आणि संभवनीय कल्पना यांचे मिश्रण निबंधाला वाचनीय आणि मूल्ययुक्त बनवते. यासाठी विपुल वाचन, उत्तमाचे श्रवण, स्वत:चे चिंतन, मनमुराद भटकंती यांमधून उपलब्ध झालेली माहिती निबंधास उपयुक्त ठरते. थोडक्यात निबंधलेखानासाठी आपले व्यक्तिमत्त्व बहुश्रुत बनविण्यास पर्याय नसतो. हे लक्षात घेऊन वरील गोष्टींची गोडी लावून घ्यावी. शालेय निबंधाचे १) वर्णनात्मक   २) कथनात्मक   ३) चिंतनात्मक    ४) कल्पनात्मक    ५) चरित्रात्मक-आत्मचरित्रात्मक असे प्रकार मानले जातात. हे प्रकार एकमेकांपासून संपूर्णत: अलग असे नसतात, तर त्यांच्या कक्षा एकमेकांत मिसळलेल्या असतात.  म्हणूनच हे प्रकार स्थूलमानानेच मानावयाचे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा