Advertisement

मंगळवार, २ डिसेंबर, २०१४

प्रयोजक क्रियापदे prayojak kriyapade

मूळ धातूच्या क्रियेचा कर्ता, ती क्रिया स्वतः करीत नसून, ती क्रिया तो दुसऱ्या कोणाला तरी करावयास लावीत आहे, असा अर्थ व्यक्त होत असेल तर त्या क्रियापदाला 'प्रयोजक क्रियापद' असे म्हणतात.

साधित धातूवरून दोन प्रकारची क्रियापदे बनतात - 
१) प्रयोजक क्रियापदे   २) शक्य क्रियापदे

वाक्ये -
१) ते मूल हसते.    २) आई त्या मुलाला हसविले.

पहिल्या वाक्यात 'हसते' क्रियापद आहे; तर दुसऱ्या वाक्यात 'हसविते' क्रियापद आहे. दोन्ही क्रियापदांतील मूळ धातू 'हस' हाच आहे. हसण्याची क्रिया दोन्ही वाक्यांत मुलाकडूनच होते. पहिल्या वाक्यात हसण्याची क्रिया मुलाकडून स्वाभाविकापणे किंवा आपणहून केली गेली, पण दुसऱ्या वाक्यात 'हसविते' या शब्दाने आईने ती त्याला करवला लावली असा अर्थ व्यक्त होतो.   

शनिवार, २९ नोव्हेंबर, २०१४

उभयविध क्रियापदे ubhayavidha verb

एकाच क्रियापद दोन वेगळ्या वाक्यांत सकर्मक (transitive) व अकर्मक (intransitive) असे दोन्ही तऱ्हेनी वापरता येते; अशा क्रियापदांना 'उभयविध क्रियापदे' असे म्हणतात.
वाक्ये पहा -
१) अ) त्याने घराचे दार उघडले.     ब) त्याच्या घराचे दार उघडले.
२) अ) रामाने धनुष्य मोडले.        ब) ते लाकडी धनुष्य मोडले.

१) गटातील दोन्ही वाक्यांत 'उघडले' हे क्रियापद आहे. पहिल्या वाक्यात ते सकर्मक वापरले आहे. या वाक्यात 'त्याने' कर्ता असून 'दार' हे कर्म आहे. 'उघडले' क्रियापद सकर्मक आहे.
दुसऱ्या वाक्यात 'उघडले' हेच क्रियापद आहे. इथे 'उघडणारे कोण' या प्रश्नाचे उत्तर 'दार' येते. तर 'उघडण्याची क्रिया कोणावर घडली?' या प्रश्नाचे उत्तरही 'दार' येते. याचा अर्थ 'उघडले' क्रियापद इथे 'अकर्मक' आहे.

२) गटातील वाक्यांत 'मोडले' हे क्रियापद आहे. त्यापैकी पहिल्या वाक्यात 'मोडले' हे क्रियापद सकर्मक आहे, तर दुसऱ्या वाक्यात ते अकर्मक आहे.
यावरून असे दिसते की, एकाच क्रियापद दोन वेगळ्या वाक्यांत सकर्मक व अकर्मक असे दोन्ही तऱ्हांनी वापरता येते; अशा क्रियापदांना 'उभयविध क्रियापदे' असे म्हणतात. काप, आठव, स्मर, लोट हे धातू या प्रकारचे होत.


बुधवार, २६ नोव्हेंबर, २०१४

विधीविशेषण Vidhīviśēṣaṇa vidhivisesana

विशेषण हे सामान्यतः विशेष्याच्या पूर्वी असते. जसे - 'चांगला मुलगा सर्वांना आवडतो.' इथे चांगला हे अधिविशेषण किंवा पूर्वविशेषण होय. पण कधी - कधी विशेषण विशेष्याच्या नंतर येऊन विधेयात विशेष्याबद्दलचे विधान पूर्ण करते. जसे 'तो मुलगा आहे चांगला.' अशा विशेषणाला विधीविशेषण किंवा उत्तरविशेषण 'तो मुलगा आहे चांगला.' अशा विशेषणाला विधीविशेषण किंवा उत्तरविशेषण (uttaravisesana)
असे म्हणतात. पुढील वाक्य पहा -
१) मुलगा हुशार आहे.
२) गणेशचे अक्षर सुंदर आहे.
३) आजची पूजा चांगली झाली.

वरील वाक्यांतील 'हुशार' हे विशेषण 'मुलगा' या नामाबद्दल अधिक माहिती देते व ते नामानंतर आले आहे. 'सुंदर' हे विशेषण 'अक्षर' या नामाबद्दल अधिक माहिती सांगते व नामानंतर आले आहे. 'चांगली' हे विशेषण 'पूजा' या नामाबद्दल अधिक माहिती सांगते व ते नामानंतर आले आहे. 'हुशार, सुंदर, चांगले' ही विधिविशेषणे आहे.

नामापूर्वी येणाऱ्या विशेषणाला अधिविशेषण म्हणतात, तर नामानंतर येणाऱ्या विशेषणाला विधिविशेषण असे म्हणतात.

सोमवार, २४ नोव्हेंबर, २०१४

क्रियाविशेषण अव्यय (Kriyāviśēṣaṇa avyaya)

(क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण अव्यय म्हणतात)

अधोरेखित शब्द पहा
१) राजेश चालतो.
२) राजेश हळूहळू चालतो.

दुसऱ्या वाक्यात 'हळूहळू' या शब्दाने राजेश कसा चालतो, हे सांगितले आहे. 'हळूहळू' या शब्दाने 'चालतो' क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगितली आहे.

'हळूहळू' हे 'चालतो' या क्रियापदाचे विशेषण आहे. यालाच क्रियाविशेषण म्हणतात; म्हणून 'हळूहळू' हे क्रियाविशेषण आहे. क्रियाविशेषण हे अविकारी असल्यामुळे त्याला अव्यय म्हणतात.

वाक्ये वाचा व समजून घ्या :

१) ससा तुरुतुरु पळतो. (कसा पळतो? - तुरुतुरु)
२) आई काल गावाला गेली. (कधी गेली? - काल)
३) येथे वह्या - पुस्तके मिळतात. (कोठे मिळतात? - येथे)
४) दिवसातून दोनदा जेवावे. (किती वेळा जेवावे? - दोनदा)

'कसा, कधी, कोठे, किती' हे प्रश्न क्रियापदाला विचारले की जी उत्तरे येतात, ती क्रियापदाबद्दल अधिक माहिती देणारी असतात. वरील वाक्यांतील 'तुरुतुरु, काल, येथे, दोनदा' हे शब्द त्या त्या वाक्यांतील क्रियापदांबद्दल विशेष माहिती सांगतात.

क्रियाविशेषणे वाचा -

अलीकडे
लगेच
खुलून
खूप
एकदम
पटापट
संथ
जवळ
सतत
सावकाश
जिकडेतिकडे
काळ
ताबडतोब
आकर्षक
टकमका
संध्याकाळी

बुधवार, १९ नोव्हेंबर, २०१४

मराठी क्रियापदांचे प्रकार marathi kriyapadache prakar

क्रियापदांचे प्रकारक्रियापदांचे तीन प्रकार आहेत.
१) सकर्मक क्रियापद    २) अकर्मक क्रियापद    ३) संयुक्त क्रियापद


१) सकर्मक क्रियापद
वाक्यातील क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यास जेव्हा कर्माची जरुरी लागते; त्याला सकर्मक क्रियापद म्हणतात; म्हणून 'करतो' हे सकर्मक क्रियापद आहे.
खालील वाक्य पहा
- राजेश अभ्यास करतो.
वरील वाक्यात करतो हे क्रियापद आहे.
करण्याची क्रिया करणारा राजेश; म्हणून राजेश हा कर्ता आहे.
करण्याची क्रिया अभ्यासावर घडते; म्हणून अभ्यास हे कर्म आहे.
म्हणजेच,
राजेश    अभ्यास    करतो.
 ↓            
             
 कर्ता      कर्म       क्रियापद

खालील वाक्य पहा
- राजेश करतो. (येथे कर्म काढून टाकले आहे.)
वरील वाक्याला काहीच अर्थ नाही.
म्हणजेच, वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही.
म्हणजेच, करतो या क्रियापदाला कर्माची जरुरी आहे. सकर्मक म्हणजे कर्मासहित (बरोबर, सह) असते ते.
म्हणून,  राजेश    अभ्यास    करतो.
             
                         
              कर्ता       कर्म        सकर्मक क्रियापद

२) अकर्मक क्रियापद
ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यास कर्माची जरुरी लागत नाही व क्रिया कर्त्याशीच थांबते तेव्हा त्या क्रियापदाला अकर्मक क्रियापद म्हणतात, म्हणून
'पळतो' हे अकर्मक क्रियापद आहे.

खालील वाक्य पहा
राजेश पळतो.
वरील वाक्यात पळतो हे क्रियापद आहे.
पळण्याची क्रिया करणारा राजेश; म्हणून राजेश हा कर्ता आहे.
राजेश      पळतो
 
             
कर्ता       क्रियापदम्हणजेच, या वाक्यात पळण्याची क्रिया कर्ता करतो व ती कर्त्यापाशी थांबते.
म्हणून,
'राजेश पळतो' हे वाक्य पूर्ण अर्थाचे आहे.
पळतो या क्रियापदाला कर्माची जरुरी नाही.

- अकर्मक म्हणजे कर्म नसते ते.
म्हणून,   राजेश     पळतो
               
            
               कर्ता       अकर्मक क्रियापद


३) संयुक्त क्रियापद
धातुसाधित व सहायक क्रियापद मिळून बनणाऱ्या क्रियापदाला संयुक्त क्रियापद म्हणतात; म्हणून 'खेळू लागला' हे संयुक्त क्रियापद आहे.वाक्यातील अधोरेखित शब्दांकडे नीट लक्ष द्या -
आपण दोघे मैदानात खेळू.
खेळू या शब्दात खेळण्याची क्रिया आहे.
खेळू हा क्रियावाचक शद्ब आहे.
खेळू हा शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण करतो.
म्हणजेच 'खेळू' हे क्रियापद आहे.

१) राजेश मैदानात खेळू. (वाक्य अर्थपूर्ण नाही)
२) राजेश मैदानात लागला. (वाक्य अर्थपूर्ण नाही)
३) राजेश मैदानात खेळू लागला. (वाक्य अर्थपूर्ण आहे.)

पहिल्या वाक्यात खेळू हा क्रियावाचक शद्ब आहे; पण तो वाक्याचा अर्थ पूर्ण करत नाही.
दुसऱ्या वाक्यात लागला हा क्रियावाचक शब्द आहे; पण तो वाक्याचा अर्थ पूर्ण करत नाही.
तिसऱ्या वाक्यात खेळूलागला हे दोन क्रियावाचक शब्द एकत्र आल्याने ते वाक्याचा अर्थ पूर्ण करतात.

म्हणजेच 'खेळू लागला' या दोन शब्दांनी मिळून वाक्याचा अर्थ पूर्ण होतो.
इथे खेळू हा शब्द 'खेळ' या धातूपासून बनलेला असल्यामुळे तो शब्द धातुसाधित किंवा कृदन्त आहे, तर लागला या क्रियावाचक शब्दाने खेळण्याची क्रिया पूर्ण करण्यासाठी मदत किंवा साहाय्य केले आहे; म्हणून 'लागला' हे सहायक क्रियापद आहे.

म्हणून 'खेळू लागला' हे क्रियापद धातुसाधित (कृदन्त)सहायक क्रियापद यांनी मिळून बनले आहे.
खेळू     +   लागला = खेळू लागला.
(धातुसाधित / कृदन्त) + (सहायक क्रियापद) = संयुक्त क्रियापद.

संयुक्त क्रियापदे : घेऊन गेली, होऊ शकतो, करून टाक, सांगून ये, वाटत असे, जायला पाहिजे, रंगले होते, पाहता आले.

रविवार, १६ नोव्हेंबर, २०१४

आचार्य डॉ. प्रफुल्लचंद्र रे (aachary dr prafullachandra re)

भारताचे महान रसायनशास्त्रज्ञ आणि वैज्ञानिक आचार्य डॉ. प्रफुल्लचंद्र रे यांचा जन्म २ ऑगस्ट, १८६१ रोजी तत्कालीन पूर्व बंगालमधील (सध्याच्या बांग्लादेशमधील) रादौली काठीपाढा (kathipadha) या गावात एका समृध्द व सुसंस्कृत कुटुंबात झाला. त्यांचे वडील हरिश बाबू हे बंगालमधील पाश्चात्त्य शिक्षणाच्या प्रवर्तकांपैकी एक होते. त्यांनी मॉडेल इंग्रजी शाळेची (Modal english school) स्थापना केली. त्या वेळेचे समाजसुधारक जतींद्र मोहन ठाकूर, ईश्वरचंद्र विद्यासागर
विज्ञानाचा अभ्यास केल्यानंतर इ.स. १८८२ मध्ये रे यांनी इंग्लंडला जाऊन, एडिनबरो विद्यापीठात प्रवेश घेतला. तेथे प्रसिध्द रसायनशास्त्रज्ञ अलेक्झांदर ब्राडन यांच्या संपर्कात ते आले. त्यामुळे रसायनशास्त्रातील त्यांना असणारी आवड अधिकच वाढली. तेथे ते डॉक्टर गिब्सन, डॉक्टर डोबीन आणि अन्य प्रसिद्ध विद्यानांच्या संपर्कात आले. त्यांनी जर्मन भाषा आणि जर्मन वैज्ञानिकांच्या ग्रंथांचा अभ्यास केला. भारतातील तत्कालीन प्रसिध्द वैज्ञानिक जगदीशचंद्र बोस यांचीही त्यांनी भेट घेतली. ते दोघे एकमेकांचे चांगले मित्र झाले. इ.स. १८८५ मध्ये एडिनबरो विद्यापीठातून बी.एस्सी. पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी मूळ धातूंच्या विश्लेषणासाठी संशोधन कार्य सुरू केले. इ.स. १८८७ मध्ये डी. एस्सी. ही पदवी प्राप्त केली. एडिनबरो विद्यापीठात त्यांनी काही पुरस्कार आणि काही शिष्यवृत्याही मिळवल्या. इ.स. १८८८ मध्ये विद्यापीठाच्या 'केमिकल्स सोसायटी' चे उपाध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. या देदीप्यमान यशप्राप्तीनंतर इ.स. १८८८ मध्ये कलकत्ता येथे ते परत आले. त्यांनी रु. २५० प्रतिमाह पगारावर सहाय्यक प्राध्यापक म्हणून तेथील प्रेसिडेन्सी महाविद्यालयात नोकरीस प्रारंभ केला.
महाविद्यालयातील अध्यापन कामाव्यतिरिक्त निरनिराळ्या नायट्रेटस्वर (nayatretas on) त्यांनी संशोधन सुरू केले. त्यांचे राहणीमान अतिशय साधे होते. पाश्चात्त्य पेहरावाचा त्याग करून त्यांनी भारतीय वेशभूषा (सदरा व लेंगा) स्वीकारली होती. जी काही बचत त्यांना शक्य होती, ती ते विज्ञानविषयक कामावर आणि गरजू लोकांच्या मदतीसाठी खर्च करत. आपल्या घरातच त्यांनी एक लहानशी प्रयोगशाळा बनवली होती. इ.स. १८९५ मध्ये त्यांनी संशोधन केलेल्या 'मर्क्युरिक नायट्रेट' या अत्यंत महत्त्वाच्या पहिल्या संशोशानाची घोषणा करण्यात आली. त्यांच्या या संशोधनाने रसायनशास्त्रात संशोधन करणाऱ्या जगातील सर्व विज्ञानिकांचे लक्ष वेधून घेतले. भारताच्या गरिबीमुळे नेहमी चिंतित असणाऱ्या प्रफुल्लचंद्रांचा असा ठाम विश्वास होता की, रासायनिक आणि औषध उद्योगांची स्थापना केल्याने केवळ चांगले रोजगार निर्माण होतील असे नाही; तर या क्षेत्रात आपला देश स्वयंपूर्णही बनेल. याशिवाय अशा प्रयत्रामुळे औषधांच्या अभावी प्राणघातक ठरणाऱ्या रोगांपासून अनेक रोग्यांचे जीवन देखील वाचू शकेल.
बेरोजगार पदवीधर विज्ञान स्नातकांसाठी लहान-मोठे उद्योग स्थापन करण्याची त्यांची इच्छा होती. इ.स. १९०१ मध्ये चिनी मातीची भांडी बनविणाऱ्या 'कलकत्ता पॉटरी वर्स्क' ची स्थापना करण्यात त्यांनी मदत केली. याशिवाय त्यांनी 'बंगाल केमिकल्स अँड फार्मास्युटिकल वर्क्स लि.' ची स्थापना केली.
यासाठी त्यांनी एका ट्रस्टची स्थापनाही केली. देशासाठी आणि विशेषकरून बंगालसाठी ही संस्था एक वरदान ठरली. सुरुवातीला प्रेसिडेन्सी महाविद्यालयातील रसायनशास्त्र पदवीधरांना व त्यांच्यासारख्या इतर विद्यार्थांना रोजगार प्राप्त करण्यासाठी आणि स्वयंपूर्ण बनण्यासाठी मदत केली. त्यांचा दुसरा शोध अमोनिअम नायट्रेट हा होता. नायट्राइटमधील यशस्वी संशोधनासाठी प्राध्यापक आर्मस्ट्राँग यांनी 'मास्टर ऑफ नायट्राइट' ही पदवी त्यांना दिली. नायट्राइटमधील त्यांच्या संशोधनाने जगाचे लक्ष वेधले. या प्रभावी यशाने प्रेरित होऊन इ.स. १९०४ मध्ये बंगाल सरकारने त्यांना युरोपियन देशांमधील विविध प्रयोगशाळांना भेट देण्यासाठी पाठवले. या शैक्षणिक दैऱ्याच्या काळात त्यांनी आपल्या शोधांच्या संदर्भात व्याख्यानेही दिली. याशिवाय इ.स. १९०२ मध्ये प्रकाशित झालेले त्यांचे पुस्तक 'इंडियन केमिकल हिस्टरी' जगभरात चर्चेचा विषय ठरले. डरहॅम विद्यापीठच्या कुलपतींनी देखील या पुस्तकाची स्तुती केली. डॉ. रे यांनी १३ व १४ व्या शतकांत भारतीय रसायनशास्त्रज्ञांनी केलेल्या कार्याबद्दल विस्ताराने लिखाण केले आहे. या पुस्तकात त्यांनी भारतीय संस्कृतीचे यथार्थ आणि वास्तव चित्रण सादर केले.
इ.स. १९११ साली सरकारने त्यांना 'नाइट  हुड' ही पदवी प्रदान केली. इ.स. १९१२ मध्ये विद्यापीठांच्या प्रथम संमेलनात सहभागी होण्यासाठी कलकत्ता विद्यापीठाचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी दुसऱ्यांदा युरोपचा दौरा केला. त्याच वर्षी डरहॅम विद्यापीठाने त्यांना डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी देऊन सन्मानित केले. इ.स. १९१८ मध्ये व्याख्यान देण्यासाठी मद्रास विद्यापीठाचे (आताचे चेन्नई) निमंत्रण त्यांनी स्वीकारले. विद्यापीठांकडून जे मानधन मिळाले, ते त्यांनी शिष्यवृत्तीच्या रूपात विद्यार्थ्यांना देऊन टाकले. इ.स. १९१७ मध्ये कोलकाता येथे झालेल्या भारतीय सामाजिक संमेलनाच्या अध्यक्षपदी (The chairman of the Indian social gathering) त्यांची नेमणूक झाली. इ.स. १९२० साली झालेल्या भारतीय विज्ञान कॉंग्रेसचे ते सभापती झाले. त्याच वर्षी त्यांना गांधीजींना भेटण्याची संधी मिळाली. गांधीवादी आदर्श आणि खादीप्रधान जीवनशैली यांनी प्रभावित होऊन अहिंसा आंदोलनाचे ते कट्टर समर्थक बनले. खुलना जिल्ह्यात जेव्हा कडकडीत दुष्काळ पडला, तेव्हा सर्व कामे सोडून मदतकार्यात सहभागी होण्यासाठी रे तेथे पोहोचले. त्यांनी रोजगाराचे एक साधन म्हणून गरीब लोकांत चरख्याचा उपयोग लोकप्रिय बनवला. चरख्याचे अर्थशास्त्र नवीन पद्धतीने त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवले.
इ.स. १९२१ मध्ये त्यांनी वयाची ६० वर्षे पूर्ण केली, तेव्हा आपला संपूर्ण पगार विज्ञान व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या विकासासाठी विद्यापीठाला देणगी म्हणून दिला. दरवर्षी मिळणाऱ्या १,३०,२०० रुपयांवर व्याजातून दोन विद्यार्थ्यांना डॉ. पी. सी. रे. शिष्यवृत्ती दिली जाई. इ.स. १९२२ मध्ये त्यांनी अनुक्रमे मायक्रो बायोलॉजी आणि जीवाश्स्त्र या विषयांमधील सर्वोत्तम विद्यार्थ्याला १२,००० रुपयांचा 'नागार्जुन पुरस्कार' आणि ११,००० रुपयांचा 'सर आशुतोष मुकर्जी पुरस्कार' जाहीर केला. विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी देणगी देणारे लोक असतात; परंतु, दुसऱ्यांच्या नावाने शिष्यवृत्तीसाठी आपला पैसा देणारे लोक कमी असतात; खरोखरच, असे लोक महान होत.
सर आशुतोष मुकर्जी कलकत्ता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते. नंतर त्यांची नेमणूक कलकत्ता विद्यापीठाचे कुलपती म्हणून करण्यात आली. त्यांनी विद्यापीठामध्ये विज्ञान शिक्षणाच्या प्रगतीसाठी केलेल्या प्रयत्नांचे आणि विज्ञानात केलेल्या योगदानाचे महत्त्व लक्षात घेऊन प्रफुल्लचंद्र रे यांनी त्यांच्या सन्मानार्थ एक शिष्यवृत्ती जाहीर करण्याचा निर्णन घेतला. इ.स. १९२४ मध्ये डॉक्टर पी. सी. रे, जे. एन, मुकर्जी, जे. सी. घोष आणि शांतीस्वरूप भटनागर यांनी 'इंडियन केमिकल सोसायटी' (Indian Chemical Society) ची स्थापना केली. संस्थेच्या खर्चासाठी १२,००० रु. चे सुरुवातीचे योगदान रे यांनी दिले. या संस्थेचे ते दोन वर्षे अध्यक्ष होते.
इ.स. १९३२ मध्ये 'एका बंगाली रसायनतज्ज्ञाचे जीवनचरित्र व त्यांचे अनुभव' (द लाइफ-स्केच अँड एक्सपीरियन्सेस ऑफ अ बंगाली केमिस्ट) या शीर्षकाचे आत्मचरित्र त्यांनी लिहिले. इ.स. १९३४ मध्ये लंडन केमिकल सोसायटीने त्यांना सन्माननीय सदस्यत्व प्रदान केले. इ.स. १९३६ साली 'रसायनशास्त्राचे वयोवृद्ध प्राध्यापक' म्हणून ते विद्यापीठातून निवृत्त झाले. त्यांच्या सेवाकाळाची स्तुती करत विद्यापीठाने त्यांची तहहयात सन्माननीय विद्वान प्राध्यापक म्हणून नियुक्ती केली. ते मुलत: संत स्वभावाचे प्राध्यापक होते. शिवाय ते अतिशय मृदुभाषी (Soft spoken) आणि दयाळू (clement) होते. १४ जून, १९४४ रोजी या वैज्ञानिकाचे विद्यापीठाच्या वास्तूतच निधन झाले. रवींद्रनाथ टागोरांवर ज्या ठिकाणी अंतिम संस्कार केले गेले होते, त्या स्थानाच्या जवळच या महान वैज्ञानिकावर अंतिम संस्कार करण्यात आले. आपण या बहुआयामी व्यक्तीमत्त्व असणाऱ्या आणि देशासाठी सर्वस्वाचा त्याग करणाऱ्या थोर पुरुषाला श्रद्धांजली वाहू या.
आदींशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. नाजूक प्रकुतीचे असले तरी, प्रफुल्लचंद्र अतिशय बुद्धिमान व प्रतिभाशाली होते. जन्मगावी प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर इ.स. १८७० साली कलकत्ता येथील हैयर स्कूलमध्ये ते दाखल झाले. शिक्षणात चांगली गती असूनही प्रकृती अस्वास्थ्यामुळे इ.स. १८७४ साली त्यांना शिक्षण थांबवावे लागले. पण उपजत आवड असल्यामुळे वाचनाचा छंद त्यांनी चालूच ठेवला. प्रकृती सुधारल्यानंतर त्यांना पुन्हा कलकत्ता येथील अल्बर्ट शाळेत घालण्यात आले. इ.स. १८७९ मध्ये त्यांनी महाविद्यालयात दाखल होण्यासाठी असणारी प्रवेश परीक्षा दिली आणि उत्तीर्ण होऊन कलकत्ता विद्यापीठाशी संलग्न असलेल्या एका महाविद्यालयात त्यांनी प्रवेश घेतला. पुढील अभ्यासासाठी त्यांनी ईश्र्वरचंद्र विद्यासागर यांनी स्थापन केलेल्या मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यु (Metropolitan instityu) मध्ये प्रवेश घेतला. नंतर त्यांनी कलकत्त्यामधील प्रेसिडेन्सी महाविद्यालयात प्रवेश घेतला. साहित्यात त्यांना खूप रस होता. इंग्रजी बरोबरच त्यांनी लॅटिन (Latin), फ्रेंच (French) आणि संस्कृतमध्येही प्रावीण्य संपादन केले. महान व्यक्तींची चरित्रे वाचण्यात त्यांना रस होता. एकदा त्यांना 'स्थितिक विद्युत' (static electricity) या विषयावर प्रयोग करणारे अमेरिकेतील वैज्ञानिक बेंजामिन फ्रँकलीन यांचे चरित्र वाचण्यास मिळाले. ते वाचून ते खूप प्रभावित झाले. त्यानंतर विज्ञानाची त्यांची आवड वाढली. याच दरम्यान, ते भारतात झालेल्या गिलख्रिस्ट शिष्यवृत्ती स्पर्धा (scholarships) परीक्षेला बसले आणि शिष्यवृत्तीसाठी निवडले गेले. परदेशी जाण्यासाठी मोठ्या कष्टाने त्यांनी आपल्या आईची परवानगी मिळवली. त्यांचे वडील मात्र या निर्णयाने आनंदित झाले होते.

सोमवार, १० नोव्हेंबर, २०१४

जिल्हा औरंगाबाद माहिती (jilha aurangabad mahiti)

औरंगाबाद

सर्वात मोठा प्रशासकीय विभाग

मुख्यालय : औरंगाबाद

क्षेत्रफळ : १०,१०७ चौ. किमी.

तालुके : ९

औरंगाबाद, कन्नड, खुल्ताबाद, गंगापूर, पैठण, फुलंब्री, सिल्लोड, सोयगाव, वैजापूर
प्रशासकीय विभागात ८ जिल्ह्यांचा समावेश होतो.

विस्तार : मराठवाडा विभागात, औरंगाबाद जिल्ह्याच्या पूर्वेस : जालना, पश्चिमेस : नाशिक, आग्नेयेस - बीड, दक्षिण व नैऋत्येस : अहमदनगर, उत्तरेस : जळगाव जिल्हा.

लोकसंख्या :  २,८९७,०१३ लाख (इ. २००१)

नद्या : गोदावरी ही मुख्य नदी. पूर्णा, अंजना, शिवना, खाम, येळगंगा या उपनद्या. पुर्णेचा उगम : मेहूण (ता. कन्नड)

धरणे : गोदावरीवरील 'जायकवाडी' हा राज्याचा सर्वात मोठा बहुउद्देशीय प्रकल्प. त्याअंतर्गत पैठण येथे 'नाथसागर' जलाशय.

पिके : ज्वारी, ऊस, बाजरी, तेलबिया


औद्योगिक : वाळूंज, चिखलठाना येथे औद्योगिक संकुले, धूत यांचा व्हिडिओकॉन हा इलेक्ट्रॉनिक उद्योग.

लघुउद्योग : औरंगाबादच्या हिमरू शाली, महारू किनखाब. पैठणच्या पैठणी, दसन्नी, मंदिल.

शैक्षणिक : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ (स्थापना : १९५८)

पर्यटन स्थळे :
औरंगाबाद : ५२ दरवाजांचे शहर, बिबिका मकबरा, पाणचक्की, मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ, दौलताबादनजिक 'देवगिरी' किल्ला.
औरंगाबाद - नगर, बीड सीमेवर जायकवाडी पक्षी अभयारण्य.
गौताळा - औटरमघाट हे औरंगाबाद-जळगाव सीमेवरील अभयारण्य.
वेरूळ : खुल्ताबाद तालुक्यात ऐतिहासिक लेणी व गुंफा मंदिरे, जगप्रसिध्द कौलास लेणे, १२ ज्योतिर्लिंगांपैकी घृष्णेश्वर हे ज्योतिर्लिंग.
अजिंठा : सिल्लोड तालुक्यात जगप्रसिध्द लेणी.
पितळखोरा : कन्नड तालुक्यात, सर्वात प्राचीन बौद्धकालन लेणी.
पैठण (प्रतिष्ठान) : सातवाहनांची राजधानी, संत एकनाथांची जन्मभूमी, नाथसागर जलाशय.
आपेगाव : पैठण तालुक्यात, संत ज्ञानेश्वरांचे जन्मगाव.
म्हैसमाळ हे खुल्ताबाद तालुक्यातील थंड हवेचे ठिकाण.

मंगळवार, ४ नोव्हेंबर, २०१४

जिल्हा नागपूर माहिती (jilha nagpur mahiti)

नागपूर

जिल्हा व प्रशासकीय विभागाचे मुख्यालय : नागपूर

क्षेत्रफळ : ९,८०२ चौ. किमी.

स्थान :
नागपूरचे स्थान देशात मध्यवर्ती व राज्यात पूर्वेकडे आहे.

तालुके : १४
नागपूर शहर, नागपूर ग्रामीण, काटोल, कामठी, कळमेश्वर, कुही, रामटेक, हिंगणा, नरखेड, पारशिवनी, सावनेर, मौदा, उमरेड, भिवापूर.

विस्तार : नागपूरच्या पूर्वेस - भंडारा, दक्षिणेस - चंद्रपूर व पश्चिमेस - वर्धा, वायव्येस - अमरावती जिल्हा, उत्तरेस - मध्य प्रदेशाची सीमा (छिंदवाडा, सिवनी जिल्हे)

लोकसंख्या २००१ ची : २.०५२ मी.

नद्या : कन्हान ही प्रमुख नदी - पेंच, कोलार, नाग, सांड, जांब, वर्धा या अन्य नद्या.

धरणे : पारशिवनी तालुक्यात पेंच नदीवर महाराष्ट्र-मध्य प्रदेश यांचा पेंच प्रकल्प.

पिके : कापूस, गहू, ज्वारी, तेलबिया

फळ : संत्री

महाराष्ट्र पशू व मत्स्यविज्ञान विद्यापीठ, स्थापना - २०००

औद्योग : वाडी व अंबाझरी येथे युध्दोपयोगी संरक्षण साहित्य निर्मिती कारखाने, कन्हान येथे कागद गिरणी, कामठी येथे मँगेनीज शुद्धीकरण कारखाना, हातमाग व यंत्रमाग, बुटिबोरी येथे आशियातील सर्वात मोठी पंचतारांकित औद्योगिक वसाहत. खापरखेडा, कोराडी येथे औष्णिक प्रकल्प, उमरेड येथे नियोजित अणुविद्युत प्रकल्प.

शैक्षणिक : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, नागपूर (स्थापना : १९२५)

संस्था : महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ, केंद्रीय कापूर संशोधन संस्था.

पर्यटन स्थळे :
नागपूर - नाग नदीकाठी, महाराष्ट्राची उपराजधानी, राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन येथे भरते. सीताबर्डी, किल्ला, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ, नागपूर शहराच्या स्थापनेस अलिकडेच तीनशे वर्षे पूर्ण झाली. काटोल येथे राष्ट्रीय लिंबू संशोधन केंद्र. पेंच येथील राष्ट्रीय अभयारण्य.

रामटेक - कालिदासाचे 'मेघदूत' येथेच बहरले. कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ येथे आहे.

रविवार, २ नोव्हेंबर, २०१४

जिल्हा अमरावती माहिती (amaravati jilha mahiti)

अमरावती

जिल्ह्याचे व प्रशासकीय विभागाचे मुख्यालय : अमरावती
क्षेत्रफळ : १२,२१० चौ. किमी.
महाराष्ट्रातील सहा प्रशासकीय विभागांपैकी एक

तालुके : १४
अमरावती, अचलपूर, अंजनगाव-सुर्जी, चांदूर-रेल्वे, चांदूर बाजार, चिखलदरा, तिवसा, धारणी, दर्यापूर, धामणगाव, नांदगाव-खंडेश्वर, मोर्शी, भातकुली, वरुड

विस्तार : जिल्ह्याच्या पूर्वेस, नागपूर व वर्धा जिल्हा, पश्चिमेस व नैॠत्येस - अकोला, दक्षिणेस - यवतमाळ

लोकसंख्या २००१ ची : ५,४९,५१०

नद्या : तापी, पूर्णा, वर्धा या मुख्य नद्या व त्यांच्या उपनद्या
तापी नदीच्या उपनद्या : गाडगा, काप्रा, सिपना
पूर्णेच्या उपनद्या : चंद्रभागा, शहानूर, पेढी
वर्धेच्या उपनद्या : माडू, चुडामण, वेंबळा, विदर्भा, चारघड, खोलाट

धरण प्रकल्प : वर्धा नदीवरील मोर्शी प्रकल्प पूर्णत्वाच्या प्रतिक्षेत

पिके : ऊस, तूर, कापूस, ज्वारी

फळ : संत्री, मोसंबी

औद्योग : कापसाच्या उत्पादनामुळे जिनिंग व प्रेसिंग उद्योग, कापड गिरण्या.
सातुर्णा येथे औद्योगिक वसाहत.
नांदगाव पेठ येथे औद्योगिक नागरी संकुल.

शिक्षणिक : कर्मयोगी संत गाडगेबाबा विद्यापीठ, अमरावती (१९८३ मध्ये)

पर्यटन स्थळे :
अमरावती -
जिल्हा व प्रशासकीय विभागाचे मुख्यालय, संत गाडगेबाबा विद्यापीठ.
कापसाची प्रमुख बाजारपेठ.
डॉ. शिवाजीराव पटवर्धन यांनी कुष्ठरोग्यांसाठी स्थापन केलेले तपोवन.
डॉ. पंजाबराव देशमुख यांची शिवाजी शिक्षण संस्था व श्रुध्दानंद छात्रालय, गाडगेबाबांची समाधी, गुरू हनुमान आखाडा.

चिखलदरा -
थंड हवेचे ठिकाण, विदर्भाचे नंदनवन, येथून जवळच 'बैराट' हे सातपुड्यातील सर्वोच्च शिखर.
चिखलदऱ्यात कॉफीचे मळे फुलू लागले आहेत.
मेळघाट येथे वाघांचे अभयारण्य.

मोर्शी -
तालुक्याचे ठिकाण, रिथपूर येथे चक्रधरस्वामींचे गुरू श्री गोविंदप्रभू यांची समाधी.

यावली -
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे जन्मगाव.

मोझरी -

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा 'गुरुकुंज आश्रम', तुकडोजींची समाधी.

कौंडिण्यपूर -

भगवान श्रीकृष्णांची पत्नी रुक्मिणीदेवी, तसेच नळ-दमयंती आख्यानातील दमयंती यांचे माहेरगाव असा पुरणात उल्लेख.

शुक्रवार, ३१ ऑक्टोबर, २०१४

जिल्हा अकोला माहिती (jilha akola mahiti)

अकोला

स्थान : विदर्भातील अमरावती या प्रशासकीय विभागात.
राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ (धुळे-कोलकाता) अकोला जिल्यातून जातो.

क्षेत्रफळ : ५४३० चौ.कि.मी.

विस्तार : अकोला जिल्ह्याच्या पूर्वेस व उत्तरेस : अमरावती जिल्हा. पश्चिमेस जिल्हा, दक्षिणेस : वाशिम जिल्हा

तालुके : अकोला जिल्ह्यात एकूण ७ तालुके आहेत.
अकोला, बाळापूर, मूर्तिजापूर, पातूर, अकोट, बार्शी-टाकळी, तेल्हारा

एकूण गावे : १००९

नदी : मोर्णा नदीच्या तीरावर अकोला शहर वसले आहे.

धरणे : 'वान-प्रकल्प' (ता. तेल्हारा) प्रमुख धरण.

प्रमुख पिके : खरीप ज्वारी, कापूस, तूर, मूग, गहू, हरभरा. (खरीप ज्वारीच्या उत्पादनात राज्यात आघाडीवर.)

ऊर्जानिर्मिती : पारस (ता. बाळापूर) येथे राष्ट्रीय औष्णिक विद्युत केंद्र.

औद्योगिक : कापसाच्या अधिक उत्पादनामुळे अकोला जिल्ह्यात जिनिंग व प्रेसिंग उद्योग तसेच हातमाग, खादी वस्त्रोद्योग मोठ्या प्रमाणात चालतो.
बाळापूर, अकोट येथे सतरंज्या निर्मितीचा व्यवसाय केंद्रीत झाला आहे.

पर्यटन स्थळे : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे ठिकाण.
नर्नाळा : २७ दरवाजांचा ऐतिहासिक किल्ला, अभयारण्य.
बाळापूर : बाळापूर देवीचे मंदिर, किल्ला, राजा मिर्झा जयसिंगाची छत्री, मन-म्हैस नद्यांचा संगम.
मूर्तिजापूर : मुंबई - कोलकाता रेल्वे मार्गावरील जंक्शन, संत गाडगेबाबांचा आश्रम, सांगावी येथे पूर्णा - उमा संगम.
१ जुलै १९९८ रोजी अकोला जिल्ह्याचे विभाजन होऊन वाशिम हा नवा जिल्हा तयार झाला.

लोकसंख्या
: १८,१८,६१८ (वर्ष २०११)

साक्षरता प्रमाण : ८७.७५ (वर्ष २०११)

गुरुवार, ३० ऑक्टोबर, २०१४

सर जगदीशचंद्र बोस (jagdishchandra bos)

'वनस्पतींनाही संवेदना असतात', याची जगाला जाणीव करून देणारे महान भारतीय वैज्ञानिक सर जगदीशचंद्र बोस यांचा जन्म ३० नोव्हेंबर १८५८ रोजी तत्कालिन बंगाल प्रांतातील (सध्याच्या बांगलादेशातील) मेमनसिंह जिल्ह्यात झाला. त्यांचे वडील भगवानचंद्र बोस हे फरीदापूर जिल्ह्याचे उपदंडाधिकारी (डेप्युटी मॅजिस्ट्रेट) होते. भारतीय संस्कृती व परंपरा पाळणाऱ्या कुटुंबात त्यांचे बालपण गेले. रामायण व महाभारत या श्रेष्ठ महाकाव्यांचे त्यांच्यावर बालपणापासून संस्कार झाले होते. ही महाकाव्ये त्यांच्या जीवनप्रणालीचे प्रेरणास्रोत होती. सातत्याने कठोर परिश्रम केल्यास अपयशाचे परिवर्तन यशामध्ये होऊ शकते, यावर त्यांची वाढ श्रद्धा होती.
कोलकाता (कलकत्ता) येथील सेंट झेविअर्स शाळेत त्यांचे प्रारंभिक शिक्षण झाले. या शाळेत बहुसंख्य विद्यार्थी ब्रिटिश व इंग्रज प्रशासकीय सेवेतील भारतीय अधिकाऱ्यांची मुले होती. जगदीशचंद्र हे ग्रामीण भागातील असल्यामुळे इतर मुले या मुलाची थट्टा व छळ करीत असत. सुरुवातीस बोस यांनी त्यांची ही मस्ती व त्रास सहन केला. परंतु या वागण्यामुळे बोस यांच्या सहनशीलतेचा कडेलोट झाला, तेव्हा त्यांनी त्या शहरी मुलांपैकी एका आडदांड मुलाला चांगलेच चोपले व खाली पाडले. त्यांच्या या प्रतिकारामुळे बरेच विद्यार्थी त्यांचे मित्र बनले व त्यांना मान देऊ लागले. या प्रकारानंतर मात्र त्यांना त्रास देण्याची हिंमत कोणी दाखवली नाही.
बोस यांचे महाविद्यालयीन शिक्षण कलकत्ता येथील महाविद्यालयातच झाले. नंतर वैद्यकशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी ते इंग्लंडला गेले. तेथील वास्तव्यात पदार्थविज्ञानाचेनामांकित तज्ज्ञ लॉर्ड रॅले यांचा त्यांच्यावर इतका प्रभाव पडला की वैद्यकशास्त्र सोडून पदार्थविज्ञानाचेच अध्ययन त्यांनी सुरू केले. त्यासाठी केंब्रिजच्या ख्राईस्ट चर्च महाविद्यालयात त्यांनी प्रवेश घेतला. इ.स. १८८५ साली त्यांनीलंडन विद्यापीठाची डॉक्टर ऑफ सायन्स (D.Sc.) ही पदवी प्राप्त केली. याबरोबरच सृष्टिविज्ञान विषयातील ट्रायपॉस (Tripos) ही पदवी मिळवून ते भारतात परतले.
भारतात परतल्यानंतर ते कलकत्ता येथील प्रेसिडेन्सी महाविद्यालयात पदार्थविज्ञानाचे प्राध्यापक म्हणून कार्य करू लागले. हे उच्च पद धारण करणारे ते पहिले भारतीय होते. या उच्च पदावर काम सुरू केल्यानंतर त्यांना समजले की, ब्रिटिश प्राध्यापकांपेक्षा आपल्याला कमी वेतन देण्यात येत आहे. या अन्यायाचा प्रतिकार म्हणून, जरी काम केले तरी पगार स्वीकारण्यास त्यांनी नकार दिला.
अशा प्रकारे, अन्यायाविरुद्ध त्यांनी आवाज उठवणे हा सत्याग्रहाचाच एक प्रकार होता. त्यांच्या या सत्याग्रहाचा परिणाम होऊन शासनाने शेवटी त्यांची मागणी पूर्ण केली. त्यांना थकबाकीसह पूर्ण पगार देण्यात आला. महात्मा गांधींनी भारतात येऊन सत्याग्रहाच्या माध्यमातून अन्यायाचा प्रतिकार करता येतो याची जाणीव करून दिली होती. परंतु बोस यांनी त्यांच्याही अगोदर शांततापूर्ण मार्गाने अन्यायाच्या विरोधाचा हा प्रयोग यशस्वी केला होता.
प्रकाशाचा किरण स्फटिकातून जाताना मार्ग बदलतो, म्हणजेच त्याचे अपवर्तन (Refraction) होते. काही स्फटिकांतून दोन अपवर्तित किरणे आढळतात. या चमत्कृतीस 'दुहेरी अपवर्तन' म्हणतात. कोलकाता येथे परत आल्यानंतर बोस यांनी या दुहेरी अपवर्तनावर संशोधन सुरू केले. जर्नल ऑफ एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल या संशोधन नियतकालिकात या संदर्भातील त्यांचा पहिला शोधनिबंध प्रकाशित झाला. यानंतर त्यांनी 'विद्युत-चुंबकीय तरंग' या विषयावरील संशोधनाला सुरुवार केली. १ मिमी ते १ सेमी तरंगलांबी (Wavelength) असलेल्या विद्युत-चुंबकीय तरंगाची निर्मिती, संप्रेषण व ग्रहणक्षमता हे त्यांचे संशोधन क्षेत्र होते. त्या काळात अशा प्रकारच्या तरंगलांबीच्या क्षेत्राचे संशोधन कार्य हे अतिशय जटिल व गुंतागुंतीचे मानले जाई.
या कामासाठी त्यांना महाविद्यालयाकडून कोणतेही साधन, साहाय्य वा अन्य मदत मिळाली नाही. असे असूनही, स्थानिक मनुष्यबळाची मदत घेऊन, त्यांना मार्गदर्शन करून तीन महिन्यांत आवश्यक ती उपकरणे त्यांनी बनवून घेतली, त्यासाठी लागणारा खर्च त्यांनी स्वतः सोसला व ते संशोधनात गढून गेले. पदार्थांची अंतर्गत संरचना समजावी यासाठी प्रथमच त्यांनी सूक्ष्म तरंगांचा (Micro Waves) वापर केला व यात त्यांना यशही आले. त्यांनी बनवलेले हे उपकरण आज 'तरंग मार्गदर्शक' (wave Guide) या नावाने ओळखले जाते. लघुतरंगांच्या अर्धप्रकाशीय गुणधर्मासंबंधात. अनेक प्रयोग त्यांनी केले व इ.स. १८९५ साली या प्रयोगांच्या आधारे रेडिओ संसूचकांच्या प्रारंभिक रूप असलेल्या सुसंगतीत सुधारणा घडवून आणली. त्यामुळे स्थायू अवस्था पदार्थविज्ञानाच्या (Solid-state Physics) विकासाला चालना मिळाली.
बिनतारी संदेशवहनाच्या (Wireless Telegraphy) संशोधनाशी नाव निगडित असलेले इटलीतील प्रसिद्ध संशोधक व विद्युत अभियंते मार्कोनी यांनी या क्षेत्रात काम करण्यापूर्वीच बोस यांनी काम केले होते आणि यशही प्राप्त केले होते. इ.स. १८९५ मध्येच प्रा. बोस यांनी रेडिओ तरंग पक्क्या भिंतीतून परावर्तित करता येऊ शकतात हे जाहीरपणे प्रयोग करून दाखवून दिले. त्यामुळे त्यांना प्रसिद्धी मिळाली. लंडन येथील रॉयल इन्स्टिट्युटमध्ये लॉर्ड केल्विन व अन्य वैज्ञानिक यांच्या उपस्थितीत त्यांनी या प्रयोगाचे प्रात्यक्षिक पुन्हा दाखवले. नंतर या क्षेत्रातील प्रयोग थांबवून आपले खूप वर्षांनी मार्कोनी यांनी बिनतारी संदेशासंबंधित एकस्व अधिकार (पेटण्ट - Patent) प्राप्त केले. अनेक विदेशी ग्रंथांतून आज बिनतारी संदेश यंत्रणेचा संशोधक म्हणून मार्कोनीची प्रशंसा केली जाते; पण खरे श्रेय मात्र बोस यांनाच आहे.
इंग्रजांच्या काळात संशोधन हे भारतीय वैज्ञानिकांसाठी फारसे उमेदीचे काम नव्हते. उपकरणांची कमतरता होती, सोयी-सुविधा असलेल्या प्रयोगशाळांचा देखील अभाव होता. संदर्भसाहित्य व ग्रंथालायेही उपलब्ध नव्हती. शासनही प्रोत्साहन देत नसे. मान्यतेसाठी लंडनकडे डोळे लावून बसावे लागे. बोस यांच्या बौद्धिक क्षमतांमुळे अनेक इंग्रजी शास्त्रज्ञ प्रभावित झाले होते. लॉर्ड केल्विन व सर ऑलिव्हर लॉज यांना तर बोस यांच्याबद्दल विलक्षण आदर होता. त्यांनी असेही सुचवले होते की, बोस यांनी लंडन येथेच स्थायिक व्हावे व संशोधन करावे. परंतु स्वतःच्या देशावर प्रेम असणाऱ्या बोस यांनी हा प्रस्ताव स्वीकारला नाही.
शतकाच्या अखेरच्या सुमारास बोस यांनी वनस्पती शारीरक्रियाशास्त्र (Plant Physiology) या विषयाच्या संशोधनावर आपले लक्ष केंद्रित केले. वनस्पती उत्तेजित झाल्यास त्यांच्यात सूक्ष्म हालचाली होतात, या बाबीचा अभ्यास करण्यासाठी बोस यांनी कल्पक पद्धत शोधून काढली. त्यांनी हे सिद्ध केले. वनस्पती उत्तेजित झाल्यास त्यांच्यात सूक्ष्म हालचाली होतात, या बाबीचा अभ्यास करण्यासाठी बोस यांनी कल्पक पद्धत शोधून काढली. त्यांनी हे सिध्द केले की, वनस्पतींना संवेदना असतात. माणसाप्रमाणेच सुख-दु:खाच्या प्रतिक्रिया त्या व्यक्त करू शकतात. मात्र माणून किंवा पशू यांच्याप्रमाणे आवाजाच्या माध्यमातून  वनस्पती वेदना व आनंद व्यक्त करू शकत नाहीत; पण फुलून येऊन, कोमेजून वा वाळून त्या आपल्या भावना व्यक्त करतात. तसेच, अन्य सजीवांप्रमाणेच वनस्पतीही श्वासोच्छवास करतात.
१० मे, १९०१ रोजी लंडन येथील रॉयल सोसायटीचे सभागृह वैज्ञानिकांच्या उपस्थितीने गच्च भरले होते. जगदीशचंद्र बोस तेथे आपल्या एका महत्त्वपूर्ण प्रयोगाचे प्रात्यक्षिक सादर करणार होते. त्यांनी वनस्पतींची संवेदनशीलता तपासणारे 'क्रेस्कोग्राफ' या नावाचे अतिशय नाजूक उपकरण बनवले होते. ते उपकरण म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण असा शोध होता. एका रोपट्याला ते उपकरण जोडले होते. नंतर ते रोपटे ब्रोमाइड या विषारी द्रव्याच्या पसरट भांड्यात बुडवण्यात आले. त्यामुळे वनस्पतीच्या सूक्ष्म स्पंदनांचे प्रक्षेपण वर्धित स्वरूपात पडद्यावर दिसत होते. थोड्या वेळाने त्या रोपट्याचे स्पंदन अनियमित होत होत अचानक थांबले. रोपटे जणू काही विषाला बळी पडले होते. वातावरण आश्चर्याने स्तब्ध झाले होते.
क्रेस्कोग्राफ : वनस्पतींची वाढ नोंदवणारे व सूक्ष्मातीसूक्ष्म हालचाल कोट्यांशपटींनी वर्धित करून दाखवणारे नाजूक उपकरण.
या प्रयोगामुळे वनस्पती शरीरक्रिया जाणणाऱ्या अनेक शास्त्रज्ञांना मुळीच आनंद झाला नाही. बोस हे पदार्थविज्ञान शास्त्रज्ञ असून, विज्ञानाच्या अन्य क्षेत्रांवर त्यांनी अतिक्रमण करण्याचे धाडस केले, हे त्या शास्त्रज्ञांच्या रागामागील व आनंदित न होण्यामागील कारण होते. वनस्पती शरीरक्रिया शास्त्रातील वैज्ञानिकांनी प्रतिपादित केलेल्या गोष्टी चूक असल्याचे बोस यांनी सिद्ध केले होते. सभागृहातील वैज्ञानिक यामुळे इतके विचलित व प्रक्षुब्ध झाले की, रॉयल सोसायटीतर्फे बोस यांचे भाषण प्रकाशित करण्यास त्यांनी विरोध केला. परंतु खोटा पडेल इतका आपला प्रयोग तकलादू नाही, याबद्दल बोस यांना आत्मविश्वास होता. दोन वर्षे अथक परिश्रम करून त्यांनी एक प्रबंध (मॉनोग्राफ - Monograph) प्रकाशित केला. प्रबंधाचे शीर्षक होते 'सजीव व निर्जीव यांच्यातील प्रतिसाद प्रक्रिया' (Response in the Living and Non-living). आपला प्रयोग अचूक असून प्रयोगाचे फलित योग्यच आहे, हे सत्य स्वीकारण्यास पर्याय नाही; हे रॉयल सोसायटीला त्यांनी पटवून दिले. जे भाषण सुरुवातीस प्रकाशित झाले नाही, ते आता प्रकाशित देले गेले व जगभर वितरित करण्यात आले. बोस यांची शास्त्रज्ञ म्हणून जगभर ख्याती पसरली. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. इ.स. १९२० साली रॉयल सोसायटीचे सदस्य म्हणून त्यांची निवड झाली. या पदासाठी निवड झालेले ते पहिले भारतीय शास्त्रज्ञ ठरले. त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाचे मोल लक्षात घेऊन ब्रिटिश शासनाने इ.स. १९१७ मध्ये त्यांना 'सर' या किताबाने सन्मानित केले. तेव्हापासून ते 'सर जगदीशचंद्र बोस' या नावाने ओळखले जाऊ लागले.
बोस यांना जीवशास्त्रज्ञ म्हणून आता ओळखले जाऊ लागले. त्यांच्या अमूल्य योगदानाबद्दल प्रत्येक भारतीय सदैव ऋणी राहील. पाश्चिमात्यांनी मान्यता दिल्यानंतरच त्यांच्या देशातील लोकांनी बोस यांच्या संशोधनास मान्यता दिली व त्यांचे श्रेष्ठत्व ताणले. ३० नोव्हेंबर, १९१७ रोजी बोस यांनी 'बोस संशोधन संस्था' देशाला समर्पित केली.
कविश्रेष्ठ रवींद्रनाथ टागोर हे बोस यांचे मित्र होते. त्या काळात पाश्चिमात्यांना टागोरांविषयी माहिती नव्हती. बोस यांनी टागोरांच्या साहित्याचे भाषांतर करून ते प्रसिध्द केले. त्यामुळे टागोरांची प्रतिभा ज्ञात झाली. त्यांचे समकालीन भारतीय वैज्ञानिक सी.व्ही. रामन यांच्यापेक्षा बोस ३० वर्षांनी मोठे होते. योगायोग असा की, रामन ज्या वित्तीय प्रशासकीय सेवेच्या परीक्षेस बसले होते, त्या परीक्षेतील पदार्थविज्ञान विषयाची प्रश्नपत्रिका बोस यांनी तयार केली होती. आपल्या मृत्यूच्या एक दिवस आधी बोस यांनी तयार केली होती. आपल्या मृत्यूच्या एक दिवस आधी बोस यांनी बोस संशोधन संस्थेच्या निदेशकास सांगितले होते की, मृत्यूनंतर माझी उरलीसुरली संपत्ती विकावी व त्यातून मिळणारे धन संशोधन व सामाजिक कार्यासाठी वापरले जावे.
२३ नोव्हेंबर, १९१७ रोजी बिहारमधील गिरिडीह येथे बोस यांची प्राणज्योत मालवली. 'सजीव व निर्जीव यांच्यातील प्रतिसाद प्रक्रिया' (इ.स. १९०२) व 'वनस्पतींतील चेता यंत्रणा' (इ.स. १९२६) हे त्यांचे दोन उल्लेखनीय ग्रंथ होते. त्यांनी स्थापन केलेली 'बोस संशोधन संस्था' आजही त्यांच्या आदर्शांनुसार काम करत आहे; अनेक संशोधन क्षेत्रांत हे कार्य चालू आहे. बोस संशोधन संस्था सर जगदीशचंद्र बोस यांचे नाव उज्ज्वल करत असून यशाच्या उच्चतम शिखरांवर आरूढ आहे. दिवसेंदिवस या संस्थेच्या नावलौकिकात वाढ होत आहे.

सोमवार, २७ ऑक्टोबर, २०१४

क्रियापद, कर्ता व कर्म (Kriyapad, karta and karm)

क्रियापद

वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद म्हणतात; म्हणून 'करतो, शिकते, खेळतात' ही क्रियापदे आहेत.
१) यज्ञेश अभ्यास करतो.
२) ओजस्वी व्याकरण शिकते.
३) बाळू व जयंत मैदानात खेळतात.

वरील वाक्यांतील 'करतो, शिकते, खेळतात' या अधोरेखित शब्दांमधून कोणती ना कोणती क्रिया व्यक्त होते.
उदाहरणार्थ -

१) करतो - करण्याची क्रिया
२) शिकते - शिकण्याची क्रिया
३) खेळतात - खेळण्याची क्रिया

जर 'करतो, शिकते, खेळतात' हे क्रियावाचक शब्द आहेत.

क्रियावाचक शब्द वाक्यांतून काढून टाकले तर काय होईल?
१) यज्ञेश अभ्यास ............
२) ओजस्वी व्याकरण ...........
३) बाळू व जयंत मैदानात ..........

म्हणजे शब्द वाक्यातून काढून टाकले, तर वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही.

कर्ता व कर्म


क्रियापदाने दाखवलेली क्रिया जो करतो त्याला कर्ता म्हणतात व क्रिया ज्यावर घडते त्याला कर्म म्हणतात.
क्रियापद हा वाक्यातील मुख शब्द असतो; कारण त्याशिवाय वक्याचा अर्थ सहसा पूर्ण होत नाही.

राजेश पुस्तक वाचतो
वरील वाक्यात वाचतो हे क्रियापद आहे.
वाचतो या क्रियापदात वाचण्याची क्रिया आहे.

वाचण्याची क्रिया कोण करतो?
- राजेश
वाचण्याची क्रिया कोणावर घडते?
- पुस्तकावर

म्हणजे -
राजेश - कर्ता
पुस्तक - कर्म
वाचतो - क्रियापद

बुधवार, २२ ऑक्टोबर, २०१४

श्रीनिवास रामानुजन

      रामानुजन यांना कसेबसे प्राथमिक शाळेत दाखल करण्यात आले. आपल्या वर्गात ते सर्वात हुशार विद्यार्थी होते. गणितावर त्यांचे कल्पनातीत प्रभुत्व होते. ते मनातच गणित करून उत्तर शोधात. रामानुजन विलक्षण प्रतिभाशाली होते. कधी कधी ते असे प्रश्न विचारात की, त्यांचे शिक्षकही कोड्यात पडत. संध्याकाळी शाळा सुटल्यावर इतर मुले खेळत असत, तेव्हा ते पाटी व खडू घेऊन प्रश्न सोडवण्यात मग्न होत.
    नोव्हेंबर, १८९७ मध्ये, दहा वर्षांचे असताना संपूर्ण तंजावर जिल्ह्यात प्राथमिक शाळेच्या परीक्षेत ते प्रथम आले. यामुळे कुंभकोणम हायस्कूलमध्ये मोफत शिक्षण मिळण्याचा त्यांचा मार्ग मोकळा झाला. माध्यमिक शाळेत देखील गणिताच्या सर्व परीक्षांत त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला व अनेक पारितोषिकेही मिळवली. त्यांच्या या यशामुळे त्यांचे शिक्षक प्रभावित झाले.
    रामानुजन यांच्या शेजारी महाविद्यालयात शिकणारा एक मुलगा राहत होता. एकदा रामानुजन यांनी त्याचे गणिताचे पाठ्यपुस्तक मागितले. त्या मुलाने रामानुजनना पुस्तक तर दिले; पण शाळेतल्या विद्यार्थ्याला महाविद्यालयाच्या पुस्तकाची काय गरज, याचे त्याला नवल वाटले. रामानुजनने पुस्तकातील सर्व प्रश्न सोडवले, हे पाहून तर त्याला फारच आश्चर्य वाटले. नंतर त्याला गणितात कोणतीही शंका आली की, तो रामानुजन यांना विचारात असे. आता तो रामानुजनसाठी महाविद्यालयातून गणितविषयी आणखी इतर पुस्तकेही आणू लागला. वयाच्या तेराव्या वर्षी रामानुजनने ग्रंथालयातील त्रिकोणमितीवर (ट्रिग्नॉमिट्री) एक पुस्तक वाचले. पुस्तकातील प्रमेये त्यांनी आपल्या वहीत सोडवली. १५ व्या वर्षी त्यांनी जॉर्ज शुब्रिज कार यांच्या 'विशुद्ध व उपयोजित गणितातील प्रारंभिक निष्कर्षांचा सारांश' (सिनॉप्सिस ऑफ एलिमेंटरी रिझल्ट्स इन प्युअर अँड अप्लाइड मॅथेमॅटिक्स) या ग्रंथाची दोन खंडांत उपलब्ध असलेली (१८८० - ८६) प्रत मिळाले. कार यांच्या पुस्तकातील उत्तरे आपल्या उत्तराशी त्यांनी ताडून पहिली. स्वतःची प्रमेये व मते विकसित करून ते कार यांच्याही पुढे गेले.
    इ.स. १९३० मध्ये, १६ वर्षांचे असताना त्यांनी मॅट्रिक परिक्षा उत्तीर्ण केली. गणितात त्यांनी प्रथेम श्रेणी प्राप्त केली व त्यांना शिष्यवृत्तीही मिळाली. पुढे त्यांनी शासकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला. महाविद्यालयातही ते गणिते सोडवण्यातच तल्लीन होत व इतर विषयांकडे दुर्लक्ष करीत. याचा परिणाम असा झाला की, गणितात त्यंना पूर्ण गुण मिळाले; पण इतर विषयांत ते अनुत्तीर्ण झाले. त्यांची शिष्यवृत्ती बंद झाली. यामुळे त्यांच्या वडिलांना वाईट वाटले. परिणामी, त्यांना महाविद्यालय सोडावे लागले. अशा प्रकारे इ.स. १९०६ साली त्यांचे औपचारिक शिक्षण समाप्त झाले.
    रामानुजनना असणारी गणिताबद्दलची ओढ पाहून रामानुजन यांचे वडील चिंतित झाले होते. रामानुजनना आपल्या जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी २२ व्या वर्षी त्यांचे लग्न लावून देण्यात आले. त्यावेळी त्यांच्या पत्नी जानकी यांचे वय नऊ वर्षांचे होते. रामानुजन यांनी जबाबदारी वाढल्याने नोकरी शोधण्यास सुरुवात केली. या कामी त्यांना यश मिळाले नाही; तरी शेवटी गणितच त्यांच्या उपयोगी पडले. इ.स. १९०३ पासून रामानुजन यांनी आपल्या वहीत गणिते सोडवण्यास सुरुवात केली होती. इ.स. १९१० पर्यंत त्यांनी केलेल्या संशोधनावरील कामांच्या तपशिलाने दोन मोठ्या वह्या पूर्ण भरल्या. आपल्या वह्या घेऊन ते भारतीय गणित मंडळाचे (इंडियन मॅथेमॅटिकल सोसायटी) संस्थापक पी. रामास्वामी अय्यर यांच्याकडे गेले. या वह्या पाहून रामास्वामी अतिशय प्रभावित झाले. त्यांनी रामानुजन यांना प्रेसिडेन्सी महाविद्यालय, मद्रास (चेन्नई) येथील गणिताच्या प्राध्यापकांच्या नावे एक पत्र दिले. सुदैवाने त्या प्राध्यापकांनी यापूर्वी त्यांच्या महाविद्यालयात शिकवले होते. रामानुजन त्यांना भेटले तेव्हा, त्यांनी रामानुजनना पटकन ओळखले. नेल्लोराचे जिल्हाधिकारी (कलेक्टर) रामाराव यांच्या नावे एक शिफारस पत्र त्यांनी रामानुजन यांना दिले. व्यक्तिशः रामाराव यांना गणिताची खूप आवड होती. त्यामुळे त्यांनी ठरवले की, रामानुजन यांना मद्रास येथे महालेखापालांच्या कार्यालयात नोकरी मिळावी. कालांतराने त्यांना मद्रासच्या पोर्ट ट्रस्टच्या लेखा विभागात लिपिक म्हणून नोकरी मिळाली. त्यावेळी त्यांचा महिन्याचा पगार ३० रु. होता. त्यामुळे त्यांच्या आर्थिक स्थितीत थोडीफार सुधारणा झाली.
    कार्यालयातून वेळ मिळाला की ते संशोधनपर लेख लिहीत. त्यांचे ते लेख इंडियन मॅथेमॅटिकल सोसायटीच्या नियतकालिकात प्रकाशित झाले. मद्रास येथील गणिताच्या क्षेत्रात त्यांना प्रसिद्धी मिळाली. लवकरच काही प्राध्यापकांना व शिक्षणतज्ज्ञांना त्यांचे काम व बैद्धिक कैशल्य ज्ञात झाले. त्यांच्या शिफारशीमुळे १ मे, १९१३ पासून गणितातील आपले संशोधन चालू ठेवण्यासाठी त्यांना मद्रास विद्यापीठाकडून मासिक ७५ रु. शिष्यवृत्ती देण्यात आली. तोपर्यंत त्यांच्याकडे कोणत्याही विद्यापीठाची कोणतीच पदवी नव्हती. काही हितचिंतकांच्या सल्ल्यानुसार त्यांनी काही महान गणितज्ञांकडून मार्गदर्शन घेण्याचा निर्णय घेतला. त्या काळी इंग्लंड हे गणिताचे केंद्र मानले जाई. रामानुजन यांनी आपली १२० प्रमेये व सूत्रे (थिअरम्स व फॉर्म्युले) केंब्रिज विद्यापीठाच्या ट्रिनिप्टी महाविद्यालयातील फेलो, प्रसिद्ध गणितज्ञ प्रा. गॉडफ्रे एच. हार्डी यांना पाठवली. पोस्टाने मिळालेल्या या वह्या न्याहाळल्यावर त्यांनी आपले सहकारी प्राध्यापक लिटलवुड यांच्याशी याविषयी चर्चा केली. या वह्या लिहिणाऱ्या लेखकाची प्रतिभा त्यांना जाणवली. लवकरच हार्डी व रामानुजन यांच्यात पत्रव्यवहार सुरू झाला. हार्डी यांनी रामानुजन यांच्या इंग्लंड दौऱ्याची व्यवस्था केली. याच दरम्यान केंब्रिज विद्यापीठाचे प्रा.ई. एच. नेविले मद्रास विद्यापीठाच्या दौऱ्यावर आले. हार्डी यांनी त्यांना रामानुजन यांची भेट घेऊन त्यांना इंग्लंडला येण्यास तयार करण्यास सांगितले. स्थानिक मित्र आणि हितचिंतक रामानुजन यांना इंग्लंड दौऱ्यासाठी सर्व प्रकारची मदत करण्यास तयार होते.
    अशा संयुक्त प्रयत्नांमुळे मद्रास विद्यापीठ रामानुजन यांना दोन वर्षांसाठी २५० पौंडांची शिष्यवृत्ती देण्यास राजी झाले. हार्डी यांनी रामानुजन यांचा प्रवास खर्च व इंग्लंड मधील वास्तव्याचा खर्च यांची जबाबदारी घेतली होती. परंतु त्यांच्या आई-वडिलांनी त्यांच्या या निर्णयावर आक्षेप घेतला. परंपरावादी वैष्णव कुटुंबातील मुलाने समुद्र ओलांडण्यास धर्माची अनुमती नव्हती. अखेरीस, हितचिंतकांनी समजावून सांगितल्यामुळे रामानुजन यांचे पालक सहमत झाले व त्यांना परदेशी जाण्याची परवानगी दिली. १७ एप्रिल, १९१४ रोजी ते इंग्लंडला पोहोचले. नंतर हार्डी व लिटलवुड यांच्या मार्गदर्शनाखाली रामानुजन यांनी पद्धतशीर अभ्यास व संशोधनास सुरुवात केली. याच दरम्यान पहिल्या जागतिक महायुद्धाला सुरुवात झाली. लिटलवुड युद्धक्षेत्रावर गेल्या नंतर प्राध्यापक हार्डी यांनी त्यांची देखभाल करण्याचे काम सांभाळले व मार्गदर्शन केले.
    हिवाळा सुरू झाल्यावर रामानुजन यांना इंग्लंडची कडाक्याची थंडी सहन करणे कठीण झाले. ते रुढीप्रिय ब्राह्यण व कट्टर शाकाहारी असल्याने स्वतःचे जेवण स्वतः बनवत. त्यांना एकटेपणाही जाणवू लागला. हार्डी यांना त्यांच्यात प्रतिभाशाली गणितज्ञ दिसला. केवळ त्यांची इच्छा आणि उत्तम काळजी यामुळे रामानुजन इंग्लंडमध्ये पाच वर्षे राहिले. हार्डी त्यांचे खरे मित्र, मार्गदर्शक व तत्त्वज्ञ होते. त्यानंतर काही काळाने हार्डी यांनी मद्रास विद्यापीठास एक पत्र लिहिले. त्यात त्यांनी लिहिले की, रामानुजन हे फार मोठे गणितज्ञ आहेत आणि इतकी प्रतिभावान व्यक्ती त्यांना पूर्वी कधी भेटली नाही. त्यांचे प्रशंसापत्र मिळाल्यावर मद्रास विद्यापीठाने रामानुजन यांची दोन वर्षांसाठी असणारी शिष्यवृत्ती पाच वर्षांपर्यंत म्हणजे मार्च, १९१९ पर्यंत वाढवली. केवळ मॅट्रिक झालेल्या रामानुजन यांना इ.स. १९१६ साली बी.ए. पदवी प्रदान करण्यात आली.
    इंग्लंडच्या पाच वर्षांच्या वास्तव्यात त्यांचे २५ शोधनिबंध प्रकाशित केले गेले. यामुळे गणिताच्या विश्वात ते लोकप्रिय झाले. रामानुजनना त्या काळातील महान गणितज्ञांमधील एक मानण्यात येई. ऑक्टोबर, १९१८ मध्ये लंडनच्या रॉयल सोसायटीने त्यांना फेलो करून घेतले. हा सन्मान मिळवणारे ते दुसरे भारतीय होते. फेब्रुवारी १९१८ साली नौदल अभियंता आरदेशजी यांना ट्रिनीटी महाविद्यालयाकडून असा सन्मान मिळाला होता. ते पहिले सन्मानित भारतीय होते.
    इ.स. १९१७ साली रामानुजन आजारी झाले. त्यांना एका इस्पितळात दाखल करण्यात आले. प्रारंभिक तपासण्यांत आजार टी.बी.चा असल्याचे वाटले; परंतु नंतर समजले की, पोषणमूल्ये नसलेला आहार व जीवनसत्त्वांची कमतरता यामुळे ते आजारी झाले. डॉक्टरांच्या मते, त्यांच्या प्रकृतीला कोरडे हवामानाच अनुकूल असल्याने त्यांनी भाटतात जावे. शेवटी मार्च, १९१९ मध्ये ते भारतात परतले. मित्र व हितचिंतकांनी उपचार करूनही २६ एप्रिल, १९२० रोजी त्यांचे कुंभकोणम येथे अकाली निधन झाले. एक उज्ज्वल तारा क्षितिजावर अचानकच निखळला. त्यावेळी त्यांचे वय केवळ ३२ वर्षांचे होते. गणितज्ञांकडून त्यांना असामान्य व विलक्षण प्रतिभावंतांसारखी प्रतिष्ठा मिळाली, की जी केवळ स्वीस गणितज्ञ लियोनहार्ड यूलर (इ.स. १७०७-८३) व जर्मन गणितज्ञ कार्ल जैकोबी (इ.स. १८०४-५१) यांच्याशिवाय कोणाला मिळाली नाही.
    जाडजूड अशा तीन वह्यांमध्ये असणारे गणितातील त्यांचे संशोधन कार्य आज 'रामानुजन्स नोटबुक्स' या नावाने ओळखले जाते. त्यांचे हे साधन नंतर तर प्रगाढ अभ्यासाचा विषय ठरले. इ.स. १९२७ मध्ये केंब्रिज विद्यापीठाने या संशोधन कार्याचे हार्डी यांच्याकडून संपादन करवून घेऊन ते प्रकाशित केले. त्यांचे काही संशोधन अजूनही अप्रकाशित आहे. रामानुजन यांच्या जन्मशताब्दीच्या वेळी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रीसर्च, मुंबई यांच्या गणित विभागाने त्यांच्या अनेक कृती संपादित व प्रकाशित केल्या. त्यांची एक वही गहाळ झाली होती. नंतर ती प्रा. जॉर्ज अॅन्र्डूज यांना सापडली. ते अमेरिकेत संशोधन कार्य करत आहेत व तेथेच ते संपादित प्रकाशित करू इच्छित आहेत.
    विद्यापीठात त्यांनी केलेल संशोधन, संस्थांना दिलेली अमूल्य सेवा व गणिती विश्वाला दिलेले संशोधनासंबंधीचे योगदान यासाठी केंब्रिज विद्यापीठ व ट्रिनीटी महाविद्यालय यांनी या विश्वप्रसिद्ध गणितज्ञाच्या पत्नी जानकी अम्मा यांना इ.स. १९८८ साली २००० पौंड वार्षिक निवृत्तिवेतन देण्याचा निर्णय घेतला.गणितज्ञ म्हणून प्रसिद्धीस पावलेले महान भारतीय वैज्ञानिक श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म २२ डिसेंबर, १८८७ रोजी तमिळनाडूच्या तंजावर जिल्ह्यात कुंभकोणम् जवळील इरोड नावाच्या छोट्याशा गावात झाला. त्यांचे वडील कुप्पुस्वामी श्रीनिवास एका गरीब व परंपराप्रिय अय्यंगार ब्राह्यण परिवारातील होते. ते एका स्थानिक व्यापाऱ्याकडे वर्धवेळ लिपिक म्हणून काम करीत. त्यांची आई कोमलतम्मा विनयशील, आचारसंपन्न व धार्मिक विचारांची होती. कुटुंबाची आर्थिक स्थिती इतकी वाईट होती की, एका अपत्याचे पालनपोषणही करणे त्यांना अवघड होते.

बुधवार, १५ ऑक्टोबर, २०१४

दिवाळी

१) गोवत्स व्दादशी
गायीच्या पूजनाव्दारे तिच्या सात्त्विक गुणांचा स्वीकार करणे. यालाच वसुबारस असेही म्हणतात या दिवशी गाय-गोऱ्या ला गुळ भाकर खाऊ घालतात.
२) धनत्रयोदशी
संध्याकाळी दिव्यामध्ये धने, मुंग आणि तेल टाकून दिवे लावतात. धने - धनवान, मुंग - नवीन धान्य म्हणून धन आणि धान्याची त्या घरात भरभराट राहते. एखादी नवीन वस्तू किंवा दागिने यांची हळद, कुंकू, अक्षदा, फुले वाहून पूजा करतात. त्यानंतर धने आणि गुळ याचा प्रसाद वाटतात.
३) नरक चतुर्दशी
पहाटेस लवकर उठून जिकडे तिकडे दिवे लावतात. नंतर घरातील सर्व लहानथोर मंडळी स्नान करतात. स्नान आटोपताच डाव्या पायाने नरकासुर म्हणून करांटे फोडतात. लहान मुले स्नान करीत असताना फटाके उडविले जातात. इष्टमित्रांसह उत्तम प्रकारचा फराळ करतात. भोजन झाल्यावर करमणूक करून सर्व दिवस आनंदात घालवितात. रात्री दिवे लावून आरास करतात.
४) लक्ष्मीपूजन
श्रीलक्ष्मी ही ऐश्वर्य-वैभव-समृद्धीची अधिष्ठात्री देवता आहे. ती संपत्ती-स्वरूप आहे.
श्रीलक्ष्मी ही आदिशक्ती आहे. तिचे रूप लक्ष वेधून घेणारे, आकर्षित करणारे, आल्हाद देणारे म्हणून तिला 'लक्ष्मी' म्हटले आहे. श्रीलक्ष्मीचे पूजन केल्याने दैन्य, दारिद्र्य दूर होते. ऐश्वर्य, वैभव, श्रीमंती, सुखशांती घरात येते. धंदा-व्यवसायात भरभराट होते.
त्यासाठी श्रीलक्ष्मीपूजन घरात, दुकानात, पेढीवर, कचेरीत, कारखान्यात व बँकेत भक्तिभावे करतात. आश्विन कृष्णपक्ष अमावस्येला दीपावलीच्या रात्री श्रीलक्ष्मी-पूजन सर्वत्र मोठ्या श्रद्धेने केले जाते. तिच्या कृपेने यथोच्छित धनसंपदा प्राप्त होते. घरात लक्ष्मी अखंड नांदते, असे शास्त्रपुराणे सांगतात.
५) बलिप्रतिपदा दिवाळी पाडवा अभ्यंगस्नानअत्यंत दानी असणाऱ्या बळीराजाची आठवण करणे. हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. या दिवशी बलीचे स्त्रीसह चित्र काढून त्यांची पूजा करतात. विक्रमसंवत सुरू असल्यामुळे व्यापारी लोक नवीन वर्षारंभ समजतात. आणि नवीन कीर्दखतावणी सुरू करतात.
६) भाऊबीज
भाऊबीजेला संध्याकाळी बहिणी चंद्राची पूजा करतात व भावाच्या आयुष्यासाठी उपवास करतात. या दिवशी बहिणीकडून ओवाळून घेऊन ओवाळणी घालावी. व्देष आणि असूया नष्ट करून वात्सल्यभाव जागृत करणे.

मंगळवार, १४ ऑक्टोबर, २०१४

सारांशलेखन

पुस्तकासारखा मित्र नाही असे म्हणतात. इतर मित्र आहेत, पण ते कधी रागावतात, कधी चिडतात तर कधी चेष्टा करतात. कधी वेळेच्या अभावी उपयोगी पडत ना
पुस्तकांचे पुष्कळ प्रकार असतात. काही पुस्तके अल्पायुषी तर काही दीर्घायुषी असतात. त्यांचे आयुष्य त्यांच्यामधील विचारांवर अवलंबून असते. विचार जितके स्थायी, तितकी पुस्तके स्थायी. वर्तमानपत्राचे आयुष्य एक दिवस. सकाळी उत्साहाने व आतुरतेने आपण ते वाचतो. पण त्याचे पारायण करत नाही. मासिकाचे आयुष्य एक महिना. परंतु, काही पुस्तके सदासर्वकाळ बहुमोल असून तप्त मनाला समाधान देतात. भगवद्गीरा, बायबल, कुरण, वेद वगैरे ग्रंथ ह्या प्रतीचे होत.

सारांश :
माणसांच्या सेवेस नित्य तयार असलेली पुस्तके हेच माणसांचे खरे मित्र, कारण ते काही हातचे राखून ठेवत नाहीत वा माणसाला फसवत नाहीत. ज्या पुस्तकांतील विचार चिरकाल टिकणारे असतात तीच पुस्तके चिरंजीव होतात. अशी पुस्तके त्रासलेल्या मनाला समाधान देतात.
हीत. कधी ते आपले अंतरंग खुले करत नाहीत. ते आपणापासून काहीतरी लपवून ठेवतात. परंतु पुस्तकाचे तसे नाही. त्याला जवळ करण्याचा अवकाश की ते अंतरंग खुले करतात. ते कधी फसवत नाही, कधी चुकवत नाही. नेहमी आपल्या सेवेस तयार असते.

मंगळवार, ७ ऑक्टोबर, २०१४

चला चला रे शाळेत

चला चला रे शाळेत आपुल्या सुंदर दुनियेत।।धृ।।
आहे शाळा आपली छान
स्वच्छ ठेवण्या राखू भान
भिंती चित्रांनी सजवू
सभोवती झाडे लावू
नीटनेटके राहून सारे आपण मिरवू ऐटीत।।१।।
परिपाठाचा महिमा थोर
आदर्शांना ठेवू समोर
गुरुजनांचा ठेवू मान
मुलगी मुलगा एक समान
खेळ खेळता फेर धरू या रंगून जाऊ गाण्यात।।२।।
अमोल धन हे ज्ञानाचे
लक्षण असे हे प्रगतीचे
सृष्टीच्या पुस्तकात जाऊ
पुस्तकातली सृष्टी पाहू
आनंदाचा ठेवा सारा दडला पानापानांत।।३।।
मोठे होऊन कसे जगावे
अभ्यासातून हेच शिकावे
शिकता शिकता ज्ञान आपुले
कृती कराया सिद्ध असावे
तनात शक्ती मना युक्ती प्राप्त करू या जोषात।।४।।
मानवतेचा धर्म महान
समभावाचे गौरवगान
विज्ञानाचा मंत्र स्मरू
सारे मिळून कष्ट करू
वैभवशाली या देशाला नेऊ पुढे अभिमानात।।५।।

दूर्वांचे महत्त्व (durvanche mahatva)

दूर्वां
श्री गजाननाच्या पूजेमध्ये रोज २१ किंवा २१ च्या पटीत दूर्वा पवित्र मानल्या आहेत. ऋग्वेद व नंतरच्या ग्रंथांत दूर्वांचा उल्लेख आला आहे. मराठीत हरळी, हिंदीत दूब, गुजरातीत दरो, कन्नडमध्ये गिरके हळळू, तर संस्कृत भाषेत शतग्रंथा असे म्हटले जाते. वैज्ञानिक भाषेत 'सायनोडॉन डॅक्टिलॉन' असे म्हटले जाते. ही वनस्पती जननक्षम असून संघ करून वाढणारी आहे. हे एक परिचित, उपयुक्त, बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारे) गवत बहुतेक उष्ण देशांत सर्वत्र आढळते. हिमालयात २,४०० मी. उंचीपर्यंत व अनुकूल परिस्थितीत इतरत्र शेतात व बागेत तानासारखे वाढते. संस्कृत भाषेत याला सुमारे चाळीस नावे आहेत, वैदिक वाड्मयात शाण्डदूर्वा व पाकदूर्वा असे दोन प्रकार सांगितले आहेत. कौटिलीय अर्थशास्त्रात ताग, रुई, अळशी यांच्याबरोबर तिचा अंतर्भाव तृनावार्गात केला आहे. हिचे खोड जमिनीवर किंवा थोडे पृष्ठभागाखाली आडवे वाढून खूप लवकर पसरते, पेर्यांपासून लहान उभ्या फांद्या व त्यावर हिरवीगार, रेषाकृती, साधी, बारीक, गवतासारखी पणे येतात तसेच फांद्यांच्या टोकास पुढे २ - ६ कणिसांचा चवरीसारखा फुलोरा येतो. त्यावर बिनदेठाचे कणिस येते. त्या प्रत्येकात तुसांनी वेढलेले एक व्दिलिंगी फूल असते. साधारणपणे पावसाळ्यानंतर फुले येतात. फुलात तीन केसरदले किंजल्क येतो. तर फळ शुष्क, एकबीजी व न तडकरणारे असते. इतर शारीरिक लक्षणे तृण कुंलात वर्णिल्याप्रमाणे असतात. नवीन लागवड तुकडे लावून किंवा बिया फोकून करता येते. जमिनीची धूप थांबवण्यास व खेळाच्या मैदानांवर याची लागवड करतात. बंगल्याच्या आवारात, सार्वजनिक बागेत याचीच हिरवळ करतात. गुरांना, सशांना, सशांना व मेंढ्यांना याचा चारा आवडतो. हे गवत स्तंभक म्हणजे आकुंचन करणारे. लघवी साफ करणारे असून जखमेवर पानांचा रस लावतात. याच्या मुळचा थंड पाण्यात भिजवून काढलेला रस रक्ती मुळव्याधीवर देतात. मुळांचा काढा मुत्रल असून उपदंशात देतात. वेदनादायी सूज, अतिसार, अपस्मार, आमांश इत्यादींवरही दूर्वांचा रस उपयुक्त असतो. उचकी थाबवण्यास दूर्वांच्या ताज्या मुळ्यांचा रस आणि मध एकेक चमचा एकत्र करून चटण्यास देतात, तर अशी ही बहुगुणी दूर्वा फक्त पुजेसाठीच नाही, आरोग्यासाठी देखाल अत्यंत फलदायी आहे.

रविवार, २८ सप्टेंबर, २०१४

झुकझुक झुकझुक आगीन गाडी zukzuk zukzuk aagin gadi

झुकझुक झुकझुक आगीन गाडी
धुरांच्या रेषा हवेत काढी, पळती झाडे पाहू या
मामाच्या गावाला जाऊयाऽऽ जाऊयाऽऽ II१II
मामाचा गाव मोठा
सोन्या चांदीच्या पेठा, शोभा पाहून घेऊ या
मामाच्या गावाला जाऊ याऽऽ जाऊ याऽऽ II२II
मामाची बायको गोरटी
म्हणेल कुठली चोरटी, भाच्यांची नावे सांगू या
मामाच्या गावाला जाऊ याऽऽ जाऊ याऽऽ II३II
मामाची बायको सुगरण
रोज रोज पोळी शिकरण, गुलाब जाम खाऊया
मामाच्या गावाला जाऊ याऽऽ जाऊ याऽऽ II४II
मामा मोठा तालेवार
रेशीम घेईल हजार वार, कोट विजारी घेऊ या
मामाच्या गावाला जाऊ याऽऽ जाऊ याऽऽ II५II

मंगळवार, २३ सप्टेंबर, २०१४

मदर तेरेसा

गरिबांची आई
१९७९ साल. मदर तेरेसांना त्या वर्षीचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला होता. या प्रतिष्ठित पुरस्काराचा स्वीकार करायला मदर तेरेसा विनम्र वृत्तीने गेल्या. जगात शांतता प्रस्थापित करण्याचा मानवतेची सेवा हाच राजमार्ग असतो. मदर तेरेसांनी हे सिद्ध केले होते, त्यामुळे त्यांची निवड निर्विवाद आणि पारितोषिकाचीच शान वाढवणारी ठरली; कारण गेल्या काही वर्षांत हा बहुमान मिळालेल्या व्यक्तींमध्ये राजकारणी नेते, पुढारी किंवा मुत्सद्दी होते. सतत ३१ वर्षे कोलकात्याच्या झोपडपट्टयांमध्ये काम करणारी स्त्री नव्हती! मदर तेरेसांमुळे भारतातल्या एकाच शहराचे नाव नोबेल पुरस्कारसाठी दुसऱ्यांदा जोडले गेले. देशोदेशीचे उच्च पदाधिकारी, मुत्सद्दी, विचारवंत यांच्या उपस्थितीत एका लहानखुऱ्या, कृश, खादीधाऱ्या मदरनी, जेव्हा एक लाख नव्वद हजार डॉलर्सचा तो पुरस्कार स्वीकारला, तेव्हा खूप वेळ टाळ्यांचा गगनभेदी कडकडात होत राहिला!
त्यानंतर मदर तेरेसा बोलायला लागल्या. एक स्मितवदन आणि काळजाला हात घालणारे साधेसे भाषण. त्या भाषणामागे आयुष्यभराची साधना होती. ते विद्वत्ताप्रचुर नव्हते; पण भावनांनी ओतप्रोत होते. सुमारे वीस मिनिटे चाललेच्या आभाराच्या भाषणाचा प्रारंभ मदरनी प्रार्थनेने केला. बोलताना त्या कितीदा गहिवरल्या. श्रोत्यांचे डोळेही ओले झाले.
मदर तेरेसा म्हणाल्या, ''व्यक्तिश: मला असं वाटतं, की मी या पुरस्कारासाठी पात्र नाही; पण माझ्या गरीब बांधवांच्या वतीनं मी त्याचा स्वीकार करते. मला हा पुरस्कार देऊन नोबेल कमिटीनं एक प्रकारे गरीब देशांचाच गौरव केला आहे. जगातल्या गरिबांना मान्यता मिळाली आहे." "आपण या जगात प्रेम करायला आलो आहोत. एक वेळ पोटाची भूक भागवता येईल; पण प्रेमाची भूक भागणं फार कठीण. आपल्या कुटुंबातच अशी एखादी व्यक्ती असेल, जी प्रेमाची भुकेली असेल, तिला प्रेम द्या. घरातून सुरू झालेलं प्रेम जगभर पसरू शकेल."
शांतता तरी का नष्ट होते? माणसाच्या किमान गरजाही पूर्ण होऊ शकत नाहीत, म्हणून आज जगभरात लाखो मुलं मरताहेत. भूक, दैन्य अशा अनेक कारणांनी. मला माझ्या गरीब आणि अनाथबांधवांनी अमाप प्रेम दिलं आहे. तुम्हीही तुमच्या देशापासून सुरुवात करा. गरीब शोधा आणि प्रेम करायला लागा. तुम्ही कधी भूक जवळून पाहिली आहे की नाही मला माहीत नाही. मी ती पाहिली आहे. भूक शरीरावर, डोळ्यांतून फार दारुण तऱ्हेने व्यक्त होते. अशांच्या तोंडी एक घास घातला, तरी ते लोक जन्मभर पुरेल इतकं प्रेम मला देतात. हे माझं केवढ भाग्य! छोटस हसू. मनापासून आलेलं. ती प्रेमाची सुरुवात असते. या हसण्यानं आपण स्वत:च आणि दुसऱ्याच आयुष सुखी करू शकतो. कुटुंबातसुद्धा एकमेकांना अस प्रेमाच हसू द्या. जीवन सुंदर होऊन जाईल. नोबेल प्राईझ ही नॉर्वेजियन लोकांनी मला दिलेली सुंदर भेट आहे. या रकमेतूनमी घर नसलेल्या लोकांसाठी घर बांधून घेणार आहे. प्रेम घरापासूनच सुरू होतं अशी माझी श्रद्धा आहे. घरच नसेल, तर प्रेम कुठून येणार? म्हणूनच गरिबांना घर द्यायची." जगभर केवळ गरीब देशातच नव्हे, तर पाश्चिमात्य देशामध्येही मला दूर करायला अतिशय अवघड अशी गरिबी आढळली. रस्त्यावरच्या एखाद्या उपाशी भिकाऱ्याला उचलून आणून मी त्याला बशीभर भात देते, तेव्हा त्याची भूक मिटते; पण जी व्यक्ती नकोशी आहे, एकटी आहे. समाजानं जिला टाकून दिलेल आहे, त्या व्यक्तीची गरिबी फार क्लेशकारक आहे.
मदर तेरेसांचे भाषण संपले, तेव्हा प्रत्येक व्यक्ती विचारात बुडून गेली होती. मदरनी नोबेल कमिटीला असे आवाहन केले, की वितरण सोहळ्यानंतरची रद्द करावी. त्या वाचलेल्या पैशांतून गरिबांना जेवण द्यावे. या विनंतीने सर्वांच्या हृदयांना उदात्ततेचा स्पर्श झाला. भावनांचा एकच कल्लोळ उमटला. नॉर्वे, स्वीडन, युरोपमधल्या सामान्य माणसांनी पैसे दिले. लहान मुलांनी आपला पॉकेटमनी दिला. बघता बघता ३६ हजार पौंड जमले. मेजवानीचे जे पैसे वाचले होते, ते तीन हजार पौंड त्यात घातल्यावर ती रक्कम नोबेल पारितोषिकाच्या रकमेच्या जवळ जवळ निम्मी झाली. अनेक देशांना त्यांच्यावर चित्रपट करायचे होते. जपानी टेलिव्हिजनचे एक पथक आले होते. मदर त्यांना म्हणाल्या, "नो सॉरी. आता पुरे झालं ते. नो मोअर ग्लॅमर अॅण्ड पब्लिसिटी. मला माझ्या सेवेच्या साध्या आयुष्याकडे परत वळू द्या. आपले खरे काम कोणते हे एकदा पक्के झाले, की त्या खऱ्या कामापासून दूर नेणारे काहीही अशा थोर व्यक्तींना आवडत नसंते. मग ती कीर्ती असो, की पैसा.

बुधवार, १७ सप्टेंबर, २०१४

मायबोली

लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी
 

आमुच्या मनामनांत दंगते मराठी                  
आमुच्या उराउरांत स्पंदते मराठी                 
 आमुच्या नसानसांत नाचते मराठी                 
 आमुच्या रगारगांत रंगते मराठी
 

आमुच्या पिलापिलांत जन्मते मराठी
आमुच्या लहानग्यांत रांगते मराठी
आमुच्या मुलामुलींत खेळते मराठी
आमुच्या घराघरांत वाढते मराठी
                  

आमुच्या कुलाकुलांत नांदते मराठी                 
येथल्या फुलागुलांत हासते मराठी                 
येथल्या दिशादिशांत दाटते मराठी                 
येथल्या नगनगांत गर्जते मराठी
 

येथल्या दरीदरींत हिंडते मराठी
येथल्या वनवानांत गुंजते मराठी
येथल्या तरुलतात साजते मराठी
येथल्या कळीकळींत लाजते मराठी
                 

 येथल्या नभामधून वर्षते मराठी                  
येथल्या पिकामधून डोलते मराठी                  
येथल्या नद्यांमधून वाहते मराठी                  
येथल्या चराचरांत राहते मराठी

शनिवार, १३ सप्टेंबर, २०१४

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन्

डॉ. राधाकृष्णन् तत्त्वज्ञानात निपुण होते. ते फार विव्दान होते. इंग्रजी भाषेवर त्यांचा प्रभुत्व होतं. तत्त्वज्ञान हा विषय तसा शुष्क आहे; परंतु ते आपल्या प्रभावी इंग्रजी भाषणानं करून सांगत. ऐकणाऱ्याला असं वाटे की ह्या व्यक्तीनं इंग्लंडच्या  ऑक्सफर्ड किंवा केंब्रिज विश्वविद्यायलात शिक्षण घेतलंय. डॉ. राधाकृष्णन काही शिकण्यासाठी कधीही परदेशात गेले नाही; परंतु त्यांनी राजनीती, शासन, शिक्षण आणि आध्यात्मिक क्षेत्रांव्दारे केवळ भारतातच नव्हे; तर साऱ्या जगाला प्रभावित केलं. डॉ. राधाकृष्णन् याचं खरं गाव 'सर्वपल्ली' हे होतं; परंतु त्यांच्या यापूर्वीच्या दोन पिढ्या तिरुतणी गावाला गेल्या. नंतर ते मद्रासचे निवासी झाले. त्यांचे वडील पौरोहीत्याबरोबरच शिक्षकाचंही कार्य करत. त्यांचा जन्म ५ सप्टेंबर १८८८ ला झाला. वयाच्या बाराव्या वर्षापर्यंत हे आपल्या गावातच राहिले. त्यांच्या वडिलांनीच त्यांना प्राथमिक शिक्षण दिलं. नंतर एफ. ए. र्यंतच शिक्षण वेल्लोर येथे घेतल. नंतर मद्रासच्या ख्रिश्चन कॉलेजमध्ये शिकले. डॉ. राधाकृष्णन् याचं कुटुंब फार गरीब किंवा फार श्रीमंत नव्हतं; परंतु कॉलेजच शिक्षण घेणं कठीण होतं. त्यांसाठी तरुण राधाकृष्णन् ट्युशन्स घ्याव्या लागत. शिक्षणानंतर ते १९०८ मध्ये मद्रासच्या प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर झाले.
डॉ. राधाकृष्णन् यांनी १९१७ पर्यंत मद्रास प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये अध्यापनाचं कार्य केलं. ह्याच काळात त्यांनी अनेक भाषणं दिली. अनेक देशी-विदेशी वृत्तपत्रांमध्ये विव्द्त्तापूर्ण लेख लिहिण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्यांची व्याप्ती देश-विदेशात पसरू लागली. त्या दिवसांमध्ये म्हैसूर संस्थानात एक व्यक्ती दिवण होती. भारत सरकारच्या उच्च अधिकाऱ्यांशी तिची घनिष्ठ ओळख होती. ह्याशिवाय ती व्यक्ती परदेशातही आपल्या योग्यतेमुळे प्रसिध्द होती. त्या व्यक्तीचं नाव होतं डॉक्टर विश्वेश्वरैया. जेव्हा त्यांनी साऱ्या भारतातून विव्दान वक्ती निवडून, पारखून एकत्र केल्या, त्यात राधाकृष्णनही होते. डॉ. राधाकृष्णन् यांची म्हैसूरच्या महाराजा कॉलेजमध्ये तत्त्वज्ञानाचा प्रोफेसर म्हणून नियुक्ती केली. डॉ. राधाकृष्णन् यांनी पीएच.डी. केलेली नव्हती. ह्याचं कारण कदाचित गरिबी असू शकेल. पण पुढे जगभरातील सगळ्या प्रमुख विद्याकृष्णनना सन्मान आणि प्रेम दिलं. म्हैसूरमध्ये त्यांना तीन वर्षे राहता आलं. नंतर ते कलकत्त्याला जाण्यास निघाले तेव्हा म्हैसूरच्या रस्त्यांवर एक अनोखं दृश्य दिसलं, विद्यार्थ्यांनी आपल्या प्रिय अध्यापकाला गाडीत बसवलं आणि हातानं ती ओढत रेल्वेस्टेशनपर्यंत नेलं. म्हैसूरच्या डॉ. विश्वेश्वरैयांप्रमाणेच कलकत्त्यात आशुतोष मुखर्जी होते, त्या दिवसात कलकत्ता म्हणजे विद्या, कला आणि व्यवसायाचं केंद्र होतं, सर मुखर्जी कलकत्ता युनिव्हर्सिटिक प्राण होते. त्यांनी डॉ. राधाकृष्णन् यांची पोस्ट ग्रॅज्युएट विभागात तत्त्वज्ञानाचा प्रोफेसर म्हणून नियुक्ती केली. त्या दिवसांमध्ये कलकत्ता विद्यापीठ फार श्रेष्ठ विद्यापीठ मानलं जाई. आंध्र विद्यापीठाची स्थापन १९२६ मध्ये झाले. तेथील सिनेट राधाकृष्णन् कुलपती बनवण्याचा विचार करत होती. त्यांना आंध्रमध्ये आणण्यात तिला यश मिळालं. १९३१ मध्ये राधाकृष्णन् यांनी आपला नवीन कार्यभार सांभाळला. तिथे त्यांनी प्रयोगशाळा, विद्यार्थी-निवास, पुस्तकालय, विद्यालयभवन काही काळातच उभारले. डॉ. राधाकृष्णन् १९१८ मध्ये सेवाग्राम येथे गांधीजींना भेटले. ह्याआधी ते गांधीजींच्या संपर्कात आले होते. सेवाग्राममध्ये राधाकृष्णन् यांना अभिनंदन ग्रंथ भेट देण्याची योजना आखली. नंतर ती भेट त्यांना देण्यात आली.
डॉ. राधाकृष्णन् यांना नेहमीच 'शिक्षक' म्हटलं गेलंय; परंतु त्यांनी शिक्षणक्षेत्रात ४० वर्षे घालवली. त्यांनी शिक्षण, लेखन, व्यवस्था, राजनीती आणि शासन ह्या सगळ्याच क्षेत्रात कार्य केलेलं आहे. शिक्षकापासून ते शिक्षण संस्थाचे व्यवस्थापक, कुलपती म्हणून त्यांनी काम केल. शिक्षकाच्या रूपात त्याचं योगदान फार मोठ आहे. तसे कलकत्त्याला ते क्वचितच प्रोफेसर होते. ऑक्सफर्डमध्ये ते प्रोफेसर होते. क्वचितच एखादी व्यक्ती दोन देशांमध्ये प्रोफेसर राहिली असेल. रशियात राजदूत राहूनही ते लंडनला अध्यापनासाठी जात होते. त्यांना कोणाच्या शिफारशीची गरज नव्हती. १९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळालं. शिक्षणमंत्री होते अबुल कलम आझाद. त्यांनी भारतात शिक्षणाच्या नवीन व्यवस्थेकरिता एका आयोगाची नियुक्ती केली. राधाकृष्णन् ह्या आयोगाचे अध्यक्ष होते. शिक्षण शास्त्रज्ञाचा रूपात त्यांनी कित्येक राष्ट्रीय एशियेटिक, तसंच आंतरराष्ट्रीय संमेलनांमध्येअध्यक्षपद भूषविलं, काशीत पाहिलं आशियाई संमेलन भरलं. त्याचेही ते अध्यक्ष होते. १९३७-३८ मध्ये लखनौ येथे दुसरं अधिवेशन झालं, त्याचेही ते अध्यक्ष राहिले. डॉ. राधाकृष्णन् यांनी आंतरराष्ट्रीय बौध्दिक सहयोग, विश्वशांती आणि विश्वबंधुत्वासाठी फार मोठं कार्य केलं. युनेस्कोच अधिवेशन त्यांच्याच प्रयत्नांनामुळे दिल्लीत झालं.
मास्को येथून राजदूत म्हणून काम केल्यावर ते जेव्हा १९५२ मध्ये भारतास येण्यास निघाले तेव्हा रशियाचे अध्यक्ष स्टॅलिन यांचे डोळे भरून आले. ते म्हणाले, ''आपण पहिली व्यक्ती आहात, जिनं मला मानव समजून माझ्याशी व्यवहार केला.'' राज्यसभेत तेव्हा कॉंग्रेसचं बहुमत होतं. डॉ. राधाकृष्णन् त्यावेळी निर्विरोध भारताचे उपराष्ट्रपती म्हणून निवडून आले. उपराष्ट्रपती होण्याबरोबरच ते दिल्ली विद्यापीठाचे कुलपती आणि साहित्य अॅकेडेमीचे उपाध्यक्षही झाले. १९६१ मध्ये डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या निधनानंतर ते भारताचे राष्ट्रपती झाले, पण त्यांनी राष्ट्रपतीपदाचं वेतन घेतलं नाही, पोषाख पूर्वीचाच ठेवला. त्यांच्या एकेक अफाट कार्यामुळेच त्यांना 'भारत-रत्न' हा सन्मान मिळाला. डॉ. राधाकृष्णन् यांना १७ एप्रिल १९७५ ला देवाज्ञा झाली.

बुधवार, १० सप्टेंबर, २०१४

वर्ण

आपण बोलतो म्हणजे एकामागून एक असे विचार मांडतो. प्रत्येक पुऱ्या पुर्थाच्या विचाराला 'वाक्य' असे म्हणतात. 'मुले अभ्यास करतात' हे एक वाक्य आहे. या वाक्यात तीन शब्द आहेत. 'मुले' हा एक शब्द आहे. या शब्दात 'मु' व 'ले' अशी दोन अक्षरे आहेत. अक्षर म्हणजे आमच्या आवाजाच्या खुणा होत. त्यांना 'ध्वनिचिन्हे' असेही म्हणतात. 'मु' हा एक ध्वनी असला तरी तो मूलध्वनी नव्हे. त्यात 'म्' व 'उ' असे दोन मूलध्वनी आहेत. आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या अशा मूलध्वनींना 'वर्ण' असे म्हणतात.
'अ, आ, इ, ई...... पासून ह्, ळ्' पर्यंत असे एकूण ४८ वर्ण मराठीत मानतात. वर्णांच्या या मालिकेला 'वर्णमाला' किंवा 'मुळाक्षरे' म्हणतात.

सोमवार, ८ सप्टेंबर, २०१४

संधी विग्रह

अद्ययावत् (अद्य + यावत्)
अनसूया (अन् + असूया)
अभीष्ट (अभि + इष्ट)
अत्युत्तम (अति + उत्तम)
अत्यल्प (अति + अल्प)
अत्याचार (अति + आचार)
अन्वर्थ (अनु + अर्थ)
इयत्ता (इयत् + इतके + ता)
ईश्वरेच्छा (ईश्वर + इच्छा)
उज्ज्वल (उत् + ज्वल)
उष्ण (उष + न)
एकैक (एक + एक)
कवीश्वर (कवि + ईश्वर)
कवीच्छा (कवि + इच्छा)
कोट्यधीश (कोटि + अधीश)
कित्येक (किती + एक)
गणेश (गण + ईश)
गंगोदक (गंगा + उदक)
गांगोर्मी (गंगा + ऊर्मी)
गंगौघ (गंगा + ओघ)
गिरीश (गिरि + ईश)
गुरुपदेश (गुरू + उपदेश)
गुर्वैश्वर्य (गुरू + ऐश्वर्य)
तत्त्व (तत् + त्व)
चतुरस्र (चतुर + अस्र)
देवर्षी (देव ॠषी)
देव्यैश्वर्य (देवी + ऐश्वर्य)
धारोष्ण (धारा + उष्ण)
जलौघ (जल + ओघ)
जलोर्मी (जल + ऊर्मी)
जनैक्य (जन + ऐक्य)
त्र्यंबक (त्रि + अंबक + डोळे)
नयन (ने + अन)
नद्योघ (नदी + ओघ)
गवीश्वर (गो + ईश्वर)
गायन (गै + अन)
नाविक (नौ + इक)
गोलाकार (गोल + आकार)
गोमतीच्छा (गोमती + इच्छा)
निर्भर्त्सना (निर् + भर्त्स् + अन)
निसर्गोपचार (निसर्ग + उपचार)
नैॠत्य (नैॠति + य)
परीक्षा (परि + ईशा) इ+ई+ई
पार्वत्तीश (पार्वती + ईश)
प्रतीक्षा (प्रति + ईक्षा) इ+ई+ई
प्रजैक्य (प्रजा + ऐक्य)
प्रीत्यर्थ (प्रीति + अर्थ)
प्रित्राज्ञा (पितृ + आज्ञा)
पित्रर्थ (पितृ + अर्थ)
बालौत्सुक्य (बाल + औचित्य)
ब्रह्यर्षी (ब्रह्य + ॠषी)
भान्वीश्वर (भानू + ईश्वर)
भानूद्य (भानु + उत्कर्ष)
भ्रात्रिच्छा (भ्रातृ + इच्छा)
भूद्धार (भू + उद्धार)
भूर्जा (भू + ऊर्जा)
महर्षी (महा + ॠषी)
महेंद्र (महा + इंद्र)
मथितार्थ (मथित + घुसळलेला + अर्थ)
महत्तम (महत् + तम)
महीश (मही + ईश)
महौदार्य (महा + औदार्य)
मातृण (मातृ + ॠण)
मतैक्य (मत + ऐक्य)
महर्षी (महा + ॠषी)
मन्वंतर (मनु + अंतर)
मध्वोज (मधु + ओज)
यथेष्ट (यथा + इष्ट)
यामुनौघ (यमुना + ओघ)
यव्दिन्द्र (यदु + इन्द्र)
रमेश (रमा + ईश)
रवींद्र (रवि + इंद्र) इ+इ+ई
रंभोरू (रंभा + ऊरू)
राजाज्ञा (राजा + आज्ञा)
रामेश्वर (राम + ईश्वर)
लघुतम (लघु + तम)
लोकेच्छा (लोक + इच्छा)
वधूत्कर्ष (वधू + उत्कर्ष)
वाङ्.मय (वाक् + मय) क् + म ङ्.म
विध्यर्थ (विधि + अर्थ)
विद्यार्थी (विद्या + अर्थी)
विद्यालय (विद्या + आलय)
विद्यामृत (विद्या + अमृत)
विद्यैश्वर्य (विद्या + ऐश्वर्य)
वृक्षौदार्य (वृक्ष + औदार्य)
शरच्चंद्र = शरद् + चंद्र (शरत् + चंद्र)
समुद्रोर्मी (समुद्र + ऊर्मी)
सदैव (सदा + एव)
सुशीला (सु + शीला)
सुज्ञ (सुज्ञ + ज्ञ = जाणणारा)
सूर्यास्त (सूर्य + अस्त)
सूर्योदय (सूर्य + उदय)
स्वल्प (सु + अल्प)
हत्या (हत् + या)
हेत्वाभास (हेतु + आभास)
हिमालय (हिम + आलय)
क्षणैक (क्षण + एक)
क्षमौचित्य (क्षमा + औचित्य)

शुद्धलेखन म्हणजे काय?

आपण आपले विचार बोलून किंवा लिहून दाखवितो. आपल्या या बोलण्याला म्हणतात 'भाषा', व तेच लिहून दाखविण्याला म्हणतात 'लेखन'. आपण बोलताना शब्दांचे उच्चार करतो. त्यांतील काही अक्षरे -हस्व असतात, काही दीर्घ असतात, तर काहींचा उच्चार नाकातून होतो. शब्दांतील या -हस्व - दीर्घ व सानुस्वार अक्षरांच्या उच्चाराप्रमाणे बोलणे म्हणजे शुद्ध बोलणे; व बोलण्यातील शुद्ध उच्चाराप्रमाणे ते अक्षरांत लिहून दाखविणे याला स्थूलमानाने 'शुद्धलेखन' म्हणायला हरकत नाही. आपण जे लिहितो ते शुद्ध म्हणजे निर्दोष असावे असे सर्वांना वाटते. हे लेखन शुद्ध व बिनचूक असावे याबद्दल काही नियम घालून देण्यात आलेले असतात. यांनाच 'शुद्धलेखनविषयक नियम' असे आपण म्हणतो. शुद्धलेखनाबाबतचे आजचे नियम पूर्वीपेक्षा कितीतरी सोपे झालेले आहेत. ते नीट समजावून घेतले की आपले लेखन निश्चित सुधारते.
आपले विचार जसे इतरांना समजले पाहिजेत, तसे इतरांचे विचार आपल्याला समजायला हवेत. यासाठी आपली भाषा एका विशिष्ट ठरलेल्या पद्धतीनेच बोलली किंवा लिहिली गेली तरच ती 'शुद्ध' समजली जाते. त्यात काही चूक झाली तर ती अशुद्ध ठरते. जसे 'तो पुस्तक वाचतो', 'त्याने पुस्तक वाचले', 'त्याने पुस्तके वाचली' अशा ठरावीक पद्धतीनेच आपण बोलायला हवे. याऐवजी 'तो पुस्तक वाचला', 'त्याने पुस्तक वाचली', 'त्याने पुस्तके वाचतो' अशा पद्धतीने जर आपण बोललो तर ते चुकीचे ठरते. आपण लिहितो त्या शब्दाचे किंवा वाक्याचे शुद्ध स्वरूप कोणते व अशुध्द स्वरूप कोणते यांबाबत काही नियम ठरविण्यात आले आहेत. हे नियम हाच व्याकरणाचा विषय, व्याकरणातील नियमांना अनुसरून केलेले निर्दोष लेखन म्हणजेच शुद्धलेखन. 'शुध्दलेखन' हा वेगळा असा विषय नाहीच. व्याकरणाचाच एक भाग आहे.
शुद्धलेखनात शब्दांतील -हस्व - दीर्घ अक्षरे व अनुस्वार यांचाच आपण प्रामुख्याने विचार करतो; पण शुद्धलेखन याचा एवद्याचाच विचार करतो; पण शुद्धलेखन याचा एवढाच मर्यादित अर्थ नाही. शब्दांतील अक्षरांचे लेखन एवद्याचाच विचार यांच्याही शुद्धलेखनात कारवायचा नसून वाक्यात येणाऱ्या शब्दांचा क्रम व त्यांची अचूक योजना, जोडाअक्षरातील वर्णांची अचूक रचना, विरामचिन्हाचा योग्य वापर यांच्याही शुद्धलेखनात समावेश होतो. तसेच जोडशब्द तयार करताना शेजारचे वर्ण एकमेकांत मिसळतात; अनेक शब्दांचा एक शब्द करताना त्यातले काही शब्द कसे गळतात; व नवीनच शब्द कसे तयार केले जातात ( म्हणजेच संधी, समास व शब्दसिद्धी)   यांच्याही विचार शुद्धलेखनात अवश्य करावा लागतो.
आधी भाषा, मग व्यकरण : 'शुद्धलेखन' हा शब्दच थोडा फसवा आहे. आपले लेखन कशा प्रकारे करावे याबद्दल प्रारंभीच्या व्याकरणकारणी काही नियम ठरविले. त्याप्रमाणे जे लिहिले जाई ते त्या वेळी शुद्ध समजले जात असे. पूर्वी मराठीत अनुस्वार बऱ्याच ठिकाणी दिले जात. उदा. 'नाही' वर अनुस्वार द्यावा लागे. 'काही' मधल्या दोन्ही अक्षरांवर अनुस्वार देत. 'मी कामे केली' हे वाक्य 'मी कामें केली' असे सानुस्वार लिहावे लागे. याचे कारण त्या वेळच्या लोकांच्या बोलण्यात नासोच्चार खूप होते. त्यास अनुसरून, त्यात व्याकारणीक अनुस्वरांची भर घालून, तसेच अर्थभेद, व्युत्पत्तीने व परंपरा यांचाही विचार करून अनुस्वार कोठे द्यावेत व -हस्व - दीर्घ केव्हा लिहावे हे ठरविण्यात आले होते. आता आपण तसा उच्चार कलारत नाही. आपल्या उच्चारात आता खूप बदल झाला आहे. म्हणून हे अनुस्वार आजच्या लेखनातून नाहीसे झाले आहेत. पूर्वीच्या लेखनावर संस्कृतचा पगडा विशेष होता. त्यामुळे शब्दामध्ये येणारे इ-कार व उ-कार संस्कुतपामने -हस्व लिहिले जात. आता आपण मराठीचे लेखन मराठीच्या उच्चारानुसार लिहू लागलो आहे. प्रारंभी केलेल्या नियमांत आतापर्यंत वेळोवेळी बदल होत राहणार. भाषा बदलत चालली म्हणजे तिच्या लेखनपध्दतीतही बदल होणे साहजिक आहे. आधी भाषा बनते; मग तिचे व्याकरण ठरते. भाषेत बदल होत गेला की व्यकरणकारकाला शरणागती पत्करावी लागते व पूर्वीच्या नियमांना मुरड घालावीच लागते. परिणामतः लेखनविषयक ठरलेल्या नियमांतही बदल करावाच लागतो. लिहिण्याची शास्त्रशुद्ध पद्धत म्हणजे आपण बोलताना वर्णाचा जसा उच्चार करतो तसे लिहिणे. पण बोलण्यातील उच्चाराप्रमाणे लेखन करावयाचे तर आपली वर्णमाला अपुरी पडते. मराठीतील सगळे उच्चार लिहून दाखविण्याची सोय आपल्या वर्णमालेत नाही. तसेच, प्रत्येकजण आपल्या स्वतःच्या उच्चारपद्धतीप्रमाणे लिहू लागला तर मोठा कठीण प्रसंग निर्माण होईल. एकमेकांचा विचार एकमेकांना समजायला हवा असेल तर एक विशिष्ट लेखनपध्दतीचा अनुसरणे भाग आहे. म्हणजेच लेखनाबाबत काही नियम ठरवून ते सर्वांनी आचरणात आणणे योग्य ठरते. अशा नियमांचा आपण 'शुद्धलेखनाचे नियम' म्हणत आलो. पूर्वी अनुस्वार तहेने हे 'शुद्ध' समजले जाई. आज त्यांतले बरेच अनूस्वर कमी झाले आहेत. पूर्वीचे जे 'शुद्ध' होते ते 'अशुद्ध' झाले असा त्याचा अर्थ नव्हे. पूर्वी बोलण्याची तशी पद्धत होती; त्या वेळी तसे लिहिणे शुध्द म्हणजे शिष्टमान्य व व्याकारनासंमत मानले जात असे. म्हणजे त्या वेळच्या सुविद्य व सुसंस्कृत व्यक्तींना मान्य असलेले व व्याकरणाच्या नियमांस वनुसरून केलेले असेच ते लेखन असे. आज आपली लेखनपद्धती बदलली; त्यामुळे आजच्या लेखनविषयक नियमांत बदल करावा लागला म्हणून या नियमांना 'शुद्धलेखनाचे नियम' असे न म्हणता 'लेखनविषयक नियम' म्हणणे अधिक समर्पक होईल. काहींनी या शुद्धलेखन-विचारला 'लेखनशुद्धी', 'लेखननियाम', 'लेखनपद्धती' अशी विविध नावे सुचविली आहेत. पण शास्त्रापेक्षा रूढी श्रेष्ठ या न्यायाने लेखनातील शुध्दस्वरूपविषयक चर्चेला आपण आजवर 'शुद्धलेखन' असेच संबोधित आलो आहोत. सोय म्हणून आपण तोच शब्द वापरू. पण त्याचा खरा अर्थ 'लेखनविषयक आजचे नियम' असा आहे, हे विसरता कामा नये. आजचे हे नियम पुढे असेच राहतील असे नाही. कालांतराने त्यात बदल होणे शक्य आहे. त्या त्या वेळच्या लेखनविषयक, शिष्टमान्य व व्याकरणसंमत नियमांना अनुसरून लेखन करणे याचे नाव 'शुद्धलेखन.'

गुरुवार, ४ सप्टेंबर, २०१४

गोपाळ कृष्ण गोखले

महात्मा गांधीजींचे राजकारणातील गुरू म्हणून त्यांचे नाव घेतले जाते, ते भारतसेवक गोपाळ कृष्ण गोखले होते. बालपणापासूनच जे काम समोर असेल ते तादात्म्याने करायचे, असा गोपाळरावांचा स्वभाव होता. त्यांची बुद्धिमत्ता विलक्षण होती. स्मरणशक्तीसारख्या गुणाला त्यांनी अभ्यासाने पराकाष्ठेला पोहोचवले होते. सुरुवातीस त्यांनी इंग्रजी भाषेचे अध्यापन केले. त्यानंतर फर्ग्युसन कॉलेजात त्यांनी इंग्रजीचे अध्यापन केले. डेक्कन एज्युकेशन सोसायटीला आर्थिकदृष्ट्या स्थैर्य आणण्याचे काम गोपाळ कृष्ण गोखले यांनी केले.
गोपाळ कृष्ण गोखले यांना राजकारणाची स्वयंभू अभिरुची होती व ह्यादृष्टीने राजकारणाचे अध्ययन करीत. त्या अध्ययनाला निश्चित दिशा देण्याचे कार्य हे न्या. महादेव गोविंद रानडे यांनी केले. पुढे 'सार्वजनिक सभेचे' ते चिटणीस झाले. ह्या सभेच्या त्रैमासिकात त्यांनी खूप लेख लिहिले. इ.स. १८९७ साली ते इंग्लंडला गेले. तेथे वेल्बी कमिशनसमोर त्यांनी भाषण केले. राज्यकारभारात मोठ्या पगाराच्या सर्व जागांवर गोऱ्यांची नेमणूक होते, ही हिंदी पुढाऱ्यांच्या मनात सलणारी बाब त्यांनी मोलेंसाहेबांशी चर्चा केली. त्यानंतर ते भारतात परत आले.
तरुण होतकरू माणसे घेऊन त्यांना देशसेवेला लावायचे ही गोपाळरावांची आकांक्षा होती. तरुण आस्थेवाईक देशासेवाकांची संस्था म्हणून त्यांनी या संस्थेत ''सर्व्हट्स ऑफ इंडिया'' हे नाव दिले. मराठी 'भारत सेवक समाज' या नावाने ती संस्था ओळखली जाऊ लागली. देशसेवेची जी शाखा ज्याला रुचेल, झेपेल त्यांनी तिला आमरण वाहून घ्यावे, असा या संस्थेचा उद्देश होता.
"सार्वजनिक जीवन हाच धर्म. देशप्रेम असे असावे की, त्यापुढे इतर कशाचीच मातब्बरी वाटू नये. उलट देशभक्ताला स्वार्थत्यागाचा प्रत्येक प्रसंग हा मंगल समारंभासारखा आनंदाचा वाटला पाहिजे संकटाची मात्रा चालू न देणारे पाहिजे."असे ते म्हणत.
महात्मा गांधी, गोपाळ कृष्ण गोखले यांना आपले राजकीय गुरू मानीत. 'राजकीय क्षेत्रात गोपाळराव पूर्ण पुरुष होते,' असे गांधीजींनी त्यांच्याबद्दल उद्गार काढले आहेत. गांधीजी त्यांना 'महात्मा', 'धर्मात्मा' असे संबोधीत. सत्य आणि न्याय या तत्वासाठी चाललेल्या गांधीजींच्या सत्याग्रहात गोपाळ कृष्ण गोखले यांनी बरीच मदत केली होती.
आपल्या जीवनात त्यांनी हिंदी राजकरणाचा अभ्यास केला, तसेच इंग्रजी राजकारणातले दोषही दाखविले. आपल्याजवळ उपजत असेलल्या कुशाग्र बुद्धीला पाठांतराने त्यांनी भर चढविला. कीर्ती, लोकप्रियता यांच्यामागे ते कधी धावले नाहीत. डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे काम पाहताना, जरुरीपुरतेच वेतन ते घेत असत. निःस्पृहतेचा आदर्श त्यांनी निर्माण केला जातो. गोपाळरावांच्या निःस्वार्थ देशभक्तीचा गुण लक्षात घेऊन इंग्रज सरकारने त्यांना 'सर' हा किताब देणाऱ्या देऊ केला होता. पण तो त्यांनी नाकारला. पण तो किताब दिल्याबद्दल बादशहा भारतमंत्री, आणि व्हाइसराँयबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. देशहितार्थ वाटेल ते कष्ट पेलण्याची व त्रास सोसण्याची तयारी हा त्यांचा स्वाभवविशेष होता. कोणतेही स्वीकारलेले काम हे निर्दोष व परिपूर्ण व्हावे अशी त्यांची इच्छा असे. कमालीचा साधेपणा, सत्याचे प्राणातिक प्रेम, विनय, मार्दव हे त्यांचे सद्गुण होते. देशाच्या उध्दाराच्या तळमळीने ते झपाटलेले असत. देशाच्या उत्कर्षचा विचार व आचार यात त्यांना आनंद वाटत असे.
गोपाळरावांनी स्वतःकरिता देशभक्तीची भूमिका निवडली व ती आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत निभावली. या भूमिकेला माणुसकीचे अधिष्ठान होते. राजकारणाला अध्यात्माचे रूप द्दावे, हा त्यांचा सिद्धान्त प्रसिद्ध आहे. ते खऱ्या अर्थाने  'भारतसेवक' होते.
बोधवाक्य - "सार्वजनिक जीवन हाच धर्म. देशप्रेम असे असावे की, त्यापुढे इतर कशाचीच मातब्बरी वाटू नये."  

बुधवार, २७ ऑगस्ट, २०१४

सावित्रीबाई फुले

सावत्रीबाई फुले यांचे नावही आदराने घेतले जाते. कारण स्त्री-शिक्षणाच्या त्या आद्य क्रांतिकारक होत्या. पुण्यात स्त्री-शिक्षणाची सोय नव्हती. तेव्हा जोतिबांनी इ.स. १८४८ मध्ये मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. मुलींच्या शाळेत काम करण्यासाठी शिक्षिकाही मिळत नसत. तेव्हां जोतिरावांनी आपल्या अशिक्षित पत्नीला घरी लिहायला व वाचायला शिकविले व तिची शिक्षिका म्हणून नेमणूक केली.
सावित्रीबाईंना स्वतःचे अपत्य झाले नाही, पण सर्व दीनदलितांना व अनाथांना जवळ करून त्यांच्यावर सावित्रीबाईंनी पोटच्या मुलाप्रमाणे प्रेम केले व त्यांना अनेक दुःखांपासून मुक्त करण्यासाठी, स्वतःच्या रक्ताचा थेंब व क्षण वेचला. सावित्रीबाईंनी आपल्याला मूल न झाल्यामुळे जोतिबांना दुसरे लग्न करण्याचा आग्रह केला, पण जोतिबांवर त्याचा काहीही परिणाम झाला नाही. कारण त्यांचे पत्नीवर अढळ प्रेम होते. सावित्रीबाईंनी जोतिबांच्या कार्यात उत्तम साथ दिली. सर्व टीका, छळ सहन करून एका थोर समाजसुधारकाची जीवनसहचरी म्हणून, धैर्याने वागून जोतिबांचे जीवन धन्य करण्यास त्यांना सर्वतोपरी साह्य केले. सावित्रीबाईंना उत्तम शिक्षण मिळाले. जोतिबा फुले व सावित्रीबाईंचे शिक्षणाचे हे पवित्र कार्य चालू असताना, त्यांच्या पवित्र कार्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न जोतिबांच्या वडिलांनी केला. त्या काळात स्त्रियांना शिकविले जात नसे. जोतिबांच्या वडिलांना असे वाटले की, त्यांच्या समाजसुधारणेच्या कार्यामुळे धर्माला काळिमा लागेल, ४२ पिढ्या नरकात जातील. पण सावित्रीबाई डगमगल्या नाहीत. जोतीबाही स्त्री-शिक्षण चळवळीचे नेते होते.
त्यांच्या मुलींच्या शाळेत, मुलींची संख्या हळूहळू वाढू लागली. पुण्यामध्ये त्या काळात हे कार्य म्हणजे एक चाचेंचा विषय झाला होता. पण आपल्या कार्यामुळे जोतिबा व सावित्रीबाईंनी एक प्रकारचा दरारा निर्माण केला होता. सावित्रीबाईंजवळ विलक्षण चिकाटी व कठोरपणा होता. संत चोखामेळा मंदिरात सावित्रीबाईंनी महार-मांग, कुणबी इ. लोकांच्या मुलींसाठी शाळा काढली. त्यांच्या सेवावृत्तीने केलेल्या कामाचा गौरव इंग्रज सरकारने पुण्याला विश्रामबागवाड्यात केला. स्त्री-शिक्षिकेचा हा पहिला गौरव होता. असा मान आतापर्यंत कोणालाही मिळाला नव्हता. सावित्रीबाईंनी जे विचार मांडले, ते प्रत्यक्ष कृतीत आणले. शाळेमध्ये सावित्रीबाईं मुख्याध्यापिका झाल्यावर त्या पवित्र ध्येयाने अध्यापनाचे काम करीत. सावित्रीबाईंचा मानसिक छळ नातेवाईकांनी, समाजाने व सनातन्यांनी केला. तसाच शारीरिक छळ करण्याचा विचारही काहींनी केला.
रस्त्यातून जात असताना एखादी कर्मठ बाई शिव शिव करीत, तिच्या अंगावर शेणाचा गोळा भिरकावून मारी. त्या शेणाची घाण, सावित्रीबाई न रागावता स्वच्छ करीत. थोडे पुढे गेल्यावर कोणीतरी भगिनी झाडलेला कचरा माडीवरून त्यांच्या अंगावर पडेल, अशा बेताने टाकीत. तेव्हा हसून सावित्रीबाई म्हणत, 'बरे झाले बाई, तुम्ही ही फुले टाकलीत, ही फुले उधळून तुम्ही माझा सत्कारच केला, ही फुलेच मला माझ्या विद्यार्थिनींना शिकविण्यासाठी उत्तेजन देतील.' आणि ती भरभर शाळेकडे निघून जाई. एकदा शाळेकडे जाताना, चौकात चार-पाच गुंड मुले बसली होती. सावित्रीबाई तिथे आल्यावर त्यांच्यापैकी एकजण पुढे येऊन म्हणाला, "मुलींना आणि महार-मांगांना शिकविणे तू बंद करा. नाहीतर तुझी अब्रू शाबूत राहणार नाही." हे शब्द ऐकताच त्या गुंडाला तिने ताड ताड अशा तीन मुस्काटीत ठेवून दिल्या. तो गुंड मुलगा गाल चोळतच राहिला. अशा संकटांना तोंड देण्यास सावित्रीबाई समर्थ होत्या, तरी जोतिरावांनी एक पट्टेवाला त्यांच्यासोबत दिला. जोतिरावांनी काढलेल्या सर्व शाळांचा खर्च ते पदरमोड करून करीत असत.
दादोबा पांडुरंग तर्खडकर हे सरकारी देशी शाळांचे पर्यवेक्षक असताना, त्यांनी "इतक्या थोड्या वेळात शाळेने चांगली प्रगती केली, हे त्या चालकांना भूषणावह आहे" असा शेरा दिला होता. त्या काळात विधवा महिलांचे केशवपन होत असे. कारण विधवा स्त्रीने संन्यासिनीसारखे जीवन जगावे, अशी रूढी होती. तिला अपशकुनी समजले जाई. तिला पांढरे वस्त्र परिधान करून घरातच कोंडून ठेवले जाई. सावित्रीबाईंनी स्त्रियांचे हे दुःख जवळून पाहिले केशवपनाची दुष्ट रूढी नष्ट झाली पाहिजे, असे त्यांनी ठरविले. परंतु लोक ऐकनात. तेव्हा जोतिबा आणि सावित्रीबाईंनी सर्व न्हाव्यांची एक सभा बोलाविली आणि आपण आपल्या भगिनींवर वस्तरा चालवितो, हे केवढे पाप आहे, याची जाणीव त्यांना करून दिली व त्यांना केशवपनस जाऊ नका असे सांगितले. न्हाव्यांच्या हे लक्षात येताच त्यांनी संप पुकारला. तो खूप गाजला.
सावित्रीबाईंनी बालहत्या प्रतिबंधक गृह २८ जानेवारी १८५३ ला सुरू केले. बालविधवांचे दुःख त्यांनी जाणले. भ्रूणहत्येचा प्रकार रोजच घडत आहे, असे त्यांनी पाहिले. विधवांसाठी सुरक्षीतपणे बाळंतपण व्हावे, म्हणून बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन केले. सावित्रीबाई शेकडो विधवांच्या माता झाल्या.
अस्पृस्यांसाठी जोतिबांनी पाण्याचे हौद खुले केले. त्यात सावित्रीबाईंचा वाटा फार मोठा होता. इ.स. १८९३ साली सत्यशोधक समाजाचे मोठे अधिवेशन सासवडला भरले होते. त्याच्या अध्यक्षा सावित्रीबाई होत्या. तेव्हा त्यांनी आपले विचार परखडपणे मांडले.
सावित्रीबाईंचा पहिला काव्यसंग्रह १८५० साली तर दुसरा काव्यसंग्रह १८९० साली प्रसिद्ध झाला. १० मार्च १८९७ साली पुण्याला प्लेगची साथ आली. सावित्रीबाईंनाही प्लेगने घेरले. आणि त्या क्रांतिकारक स्त्रीने जगाचा निरोप घेतला. स्त्री ही मानव आहे आणि ती पुरुषांइतकेच काम करू शकते, हे त्यांनी स्वतःच्या कृतीने सिध्द करून दाखविले.

सोमवार, २५ ऑगस्ट, २०१४

स्वामी विवेकानंद

भारताच्या पुनरुत्थानाच्या काळात आणि हिंदुधर्माच्या पुनरुज्जीवनाच्या काळात स्वामी विवेकानंदाचे स्थान अनन्यसाधारण आहे. भारतीय सामान्य जनतेला दैन्यावस्थेतून आणि अज्ञानातून सोडवण्यासाठी त्यांनी शिक्षण प्रसाराचे कार्य केले.
स्वामीजींचा जन्म कलकत्ता येथे १२ जानेवारी १८६३ रोजी झाला. त्यांच्या मातेचे नाव होते भुवनेश्वरी व पित्याचे नाव विश्वनाथबाबू दत्त. त्यांचे पाळण्यातील नाव विरेश्वर असे होते. बिले, नरेंद्र अशा नावानेही त्यांना हाक मारली जाई. बालपणी त्यांची वृत्ती खोडकर होती. बालवयातच त्यांचे चित्त एकाग्र होत असे. बालपणापासून कोणतीही गोष्ट ते पारखून घेत. बालपणापासून कोणतीही गोष्ट ते पारखून घेत. झाडावर ब्रह्यराक्षस वगैरे कोणी राहत नाही. हे सगळे खोटे आहे त्यांनी लहानपणी झाडावर चढून सिध्द करून दाखविले. भगवान श्रीकृष्ण आणि हनुमंत हे त्यांचे आदर्श होते. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण कलकत्ता येथे झाले. शाळेत असतानाच त्यांचे वडील अभ्यासाबरोबर साहित्य, तत्त्वज्ञान इ. चा अभ्यास त्यांच्याकडून करून घेत. ईश्र्वरचंद्र विद्यासागरांनी त्यांचे वक्तृत्वाबद्दल खूप कौतुक केले होते. जनरल असेंब्ली या कॉलेजातून तत्त्वज्ञान हा विषय घेऊन ते बी.ए. झाले. प्राचार्य हेस्ट्री हे इंग्रजी शिकवीत असताना Ecstasy ह्या शब्दाचा उच्चार त्यांच्याकडून झाला. त्याचा अर्थ समाधी. त्यांची खरोखरच समाधी लागली. नरेंद्राने तेव्हापासून समाधी, ईश्वराचा शोध इ. विषयी चिंतन सुरू केले आणि ते रामकृष्ण परमहंसांकडे आले.
रामकृष्ण परमहंसांकडे आल्यावर त्यांच्या जीवनाला एक वेगळीच कलाटणी मिळाली. आपण ईश्वर पहिला आहे काय? असा प्रश्न रामकृष्णांना विचारताच त्यांनी 'हो' उत्तर दिले. मलाही ईश्वर पाहायचा आहे, ही तळमळ नरेंद्राला लागली. नरेंद्र चिंतन, मनन, ध्यान-धारणा करू लागला. योग्य वेळ येताच रामकृष्णांनी त्यांना आपले आध्यात्मिक धन संक्रमित केले. "मानव सेवा हीच ईश्वरसेवा" हे रामकृष्णांचे शब्द त्यांच्या कानात घुमू लागले आणि मनुष्यसेवा करण्यासाठी संपूर्ण भारतभर भ्रमण करण्याचे त्यांनी ठरवले. नदी, नाले, वाळवंट, पर्वत तुडवीत ते फिरत राहिले. लोकांचे दुःख, दैन्य, अज्ञान, रोगराई, उपासमार, इ. निरीक्षण केले. देशाची सर्व दृष्टीने सुधारणा करण्याच्या व प्रगतीच्या दृष्टीने नि:स्वार्थ भावनेने वाहून घेणारे नवे संन्यासी तयार व्हावयास हवे असे त्यांना वाटले. त्यांच्यामधील पुरुषार्थ जागरूक झाला. भारतभ्रमणात ते कन्याकुमारीला पोहोचले. २५ ते २७ डिसेंबर १८९२ असे तीन दिवस त्यांनी खडकावर राहून चिंतन केले आणि लोकांना दैन्यावास्थेतून बाहेर काढले पाहिजे असे जीवितकार्य त्यांनी ठरविले.
"उठा, जागे व्हा चांगले कार्य करा, थांबू नका". हा अमृत बोध त्यांना झाला. अमेरिकेत सर्वधर्मपरिषद भरवली जात आहे, असे त्यांना समजले. त्यासाठी तिथे जाण्याचे त्यांनी ठरविले. ११ सप्टेंबर १८९३ ला ते शिकागोला पोहोचले. विवेकानंदांची भाषणाची वेळ आल्यावर आपल्या तुरुंचे स्मरण करून त्यांनी "अमेरिकेतील माझ्या बंधुभगिनींनो" हे शब्द उच्चारले. टाळ्यांचा कडकडात झाला. अवघ्या पाच मिनिटांच्या भाषणात त्यांनी सर्व सभा जिंकली. स्वामीजींचे वक्तृत्व प्रभावी होते. त्यांच्या शब्दांनी ते सर्वांची हृदये जिंकून घेत.
पुढे इंग्लंडला गेल्यावर मागरिट नोबल त्यांच्या शिष्या झाल्या. तिचे नाव त्यांनी 'भगिनी निवेदिता' असे ठेवले. परदेशातून परतल्यावर त्यांनी १८९८ मध्ये 'रामकृष्ण मठ' उभा केला. नंतर रामकृष्ण मिशनची स्थापना केली. मठाचे ध्येयधोरण हे आध्यात्मिक व मानवसेवा स्वरूपाचे होते. त्यांच्या मते, पश्चिमेने बाह्य जग तर पूर्वेने आंतरिक जग जिंकण्याचे प्रयत्न केले होते. पण दोघांनी हातात हात घालून एकमेकांचे भले करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. भविष्यकाळाला नवे वळण दिले पाहिजे. म्हणजे पूर्व-पश्चिम हा भेद राहणार नाही. विज्ञानाच्या सहाय्याने सर्व गोष्टी तपासून पाहिल्या पाहिजेत. धर्म हा भारताचा केंद्रबिंदू आहे, गाभा आहे पण धर्मामुळे मानवाच्या चित्ताचे शुध्दीकर्म झाले पाहिजे व धर्माने संकुचित दृष्टिकोनातून बाहेर काढून उदार व व्यापक दृष्टिकोन बनविण्यास मानवाला मदत केली पाहिजे असे ते म्हणत.
स्वामीजी संपूर्ण मानवजातीच्या आध्यात्मिक उद्धाराचे कार्य करणारे मार्गदर्शक स्तंभ होते. वेदान्त हा प्रत्यक्ष मानवाच्या ऐहिक जीवनात कसा सुखकारक, समृध्द व उन्नत असू शकतो, हे त्यांनी आपल्या विचारांनी व कार्याने दाखवून दिले. त्यांच्या वेदान्ताला 'व्यावहारिक वेदान्त' म्हणतात. "जेव्हा तुम्ही सर्वांकडे आत्मौपम्य दृष्टीने पाहाल, तेव्हा ही स्त्री, हा पुरुष असा भेद तुमच्यात राहणार नाही" असे स्वामीजी म्हणत.
शेवटी असे कार्य करीत असताना आपला अंतकाळ जवळ आल्याचे त्यांना जाणवले आणि ४ जुलै १९०२ रोजी ते पंचतत्वात विलीन झाले. आपल्या तेजस्वी विचारांनी आणि कार्याने अमर झाले. "मानवसेवा हीच ईश्वरसेवा"